कचरामुक्त शहरे निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार हा प्रकल्प
जैव-सीएनजी प्रकल्पामध्ये “कचऱ्यापासून संपत्ती” आणि “चक्राकार अर्थव्यवस्थे’ची तत्वे अधोरेखित
वेगळा केलेल्या ओल्या सेंद्रिय कचऱ्यावर प्रतिदिन 550 टनपर्यंत प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता
यातून दररोज 17,000 किलो सीएनजी आणि 100 टन सेंद्रिय खताचे उत्पादन होईल
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  19 फेब्रुवारी रोजी इंदूर येथे “गोबर-धन (बायो-सीएनजी) प्रकल्पाचे ”  दूरदृश्‍य प्रणालीव्दारे दुपारी 1 वाजता उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधानांनी अलिकडेच  स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 चा प्रारंभ केला, ज्यामध्ये “कचरामुक्त शहरे” निर्माण करण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन आहे. जास्तीत जास्त संसाधने  परत मिळवण्यासाठी  "कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती  " आणि  "चक्रीय  अर्थव्यवस्था" या व्यापक तत्त्वांनुसार या मिशनची अंमलबजावणी केली जात असून  या दोन्ही गोष्टी इंदूरच्या बायो-सीएनजी प्रकल्पात  आहेत.

वेगळ्या केलेल्या ओल्या सेंद्रिय कचऱ्यापैकी  दररोज 550 टनापर्यंत कचऱ्यावर  प्रक्रिया करण्याची याची  क्षमता आहे. त्यातून दररोज सुमारे 17,000 किलो सीएनजी आणि 100 टन सेंद्रिय  खताचे उत्पादन अपेक्षित आहे. हा प्रकल्प  शून्य ‘लँडफिल मॉडेल’वर आधारित आहे, ज्याद्वारे कुठलाही कचरा  शिल्लक राहणार नाही. याव्यतिरिक्त, या प्रकल्पामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात घट, सेंद्रिय खताचा वापर आणि  हरित ऊर्जा सारखे अनेक पर्यावरणीय लाभ  मिळू शकणार आहेत. 

इंदूर  महानगरपालिका (IMC) आणि इंडो एन्व्हायरो इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेड (IEISL) यांनी सार्वजनिक आणिखाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत, इंदूर क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती  प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एक ‘स्पेशल पर्पज वेहिकल’  म्हणून केली असून इंडो एन्व्हायरो इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेडची 100% म्हणजे 150 कोटी रुपये भांडवली गुंतवणुक आहे.  इंदूर महानगरपालिका या प्रकल्पात तयार झालेले  किमान 50% सीएनजी खरेदी करेल आणि अशा प्रकारच्या पहिल्या उपक्रमात, शहरात  या सीएनजीवर 250 बसेस चालवल्या जातील. उर्वरित सीएनजी खुल्या बाजारात विकला जाईल. सेंद्रिय कंपोस्टम्हणजेच खत  शेती आणि बागायती उद्देशांसाठी रासायनिक खतांऐवजी वापरण्‍यात येणार आहे.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Oman, India’s Gulf 'n' West Asia Gateway

Media Coverage

Oman, India’s Gulf 'n' West Asia Gateway
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles passing of renowned writer Vinod Kumar Shukla ji
December 23, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled passing of renowned writer and Jnanpith Awardee Vinod Kumar Shukla ji. Shri Modi stated that he will always be remembered for his invaluable contribution to the world of Hindi literature.

The Prime Minister posted on X:

"ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ल जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। हिन्दी साहित्य जगत में अपने अमूल्य योगदान के लिए वे हमेशा स्मरणीय रहेंगे। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति।"