PM Modi campaigns in Bijnor, Uttar Pradesh, urges people to vote for BJP
Shri Modi questions Samajwadi party for attacking & getting BJP workers arrested without reason
Farmer welfare is most vital for us. Our Government has brought the Pradhan Mantri Fasal Bima Yojana: PM
Chaudhary Charan Singh Kisan Kalyan Kosh would be created for farmers’ welfare, says Shri Modi
People in UP must question the SP government that what development works have been done in the state in last five years: Shri Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे प्रचार सभा घेतली. पंतप्रधान म्हणाले, लोकांचा उत्साह बघता, हे लक्षात येते की उत्तर प्रदेशातील जनतेला आता बदल हवा आहे. त्यांनी येत्या निवडणुकीत जनतेला भाजपाला मतदान करण्याचे आव्हान केले.

समाजवादी पार्टी सरकारवर टीका करत श्री मोदी म्हणाले, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काहीही चूक नसताना भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. सरकार असे चालवले जाते का? राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग केला जावा का?

त्यांनी आरोप केला की समाजवादी पार्टी सरकार राज्यातील गरीब आणि प्रामाणिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर बोलतांना श्री. मोदी म्हणाले, राज्यात घडलेल्या बलात्कारासारख्या दुर्दैवी घटने नंतर समाजवादी पक्षाचे नेते काय म्हणत होते? अशी अपमानजनक भाषा कदापी सहन केली जाणार नाही.

श्री मोदी यांनी काँग्रेसवर देखील हल्ला चढवला आणि म्हणाले की स्वतःच्या अस्तित्वासाठी हा पक्ष काहीही करू शकतो. स्वतःच्या अस्तित्वासाठी काँग्रेस पक्ष काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. इतके की अनेक वर्ष ज्या समाजवादी पक्षाशी त्यांनी संघर्ष केला, त्याच पक्षाशी आज युती केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले के उस उत्पादक शेतकऱ्यांचे कल्याण हे भाजपा सरकारसाठी सर्वोच्च आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे का मिळत नाहीत? शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही? आम्ही सत्तेत आलो तर त्यांची सर्व थकबाकी त्वरित देऊ.

पंतप्रधानांनी, पंतप्रधान विमा योजनेविषयी उपस्थित जनतेला सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांचे कल्याण आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. आमच्या सरकारने पंतप्रधान विमा योजना आणली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना कमीत कमी हफ्ते भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळत आहे.

He also said a Chaudhary Charan Singh Kisan Kalyan Kosh would be created for farmers’ welfare.

श्री मोदी म्हणाले की उत्तर प्रदेशात जनतेच्या भल्यासाठी काहीही नं करणारे नाकर्ते सरकार असणे हे येथील जनतेचे दृष्टीने दुर्दैवी आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने पूर्ण मदत करूनदेखील राज्य सरकारने जनतेच्या भल्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेने समाजवादी सरकारला गेले पाच वर्ष काय विकास केला याचा जाब विचारला पाहिजे. ते पुढे म्हणाले, राज्याच्या नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्या नेत्याबरोबर ते आपला प्रचार सुरु करतात.

असंख्य पक्ष कार्यकर्ते आणि नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sindoor and beyond: How India prepared for future wars in 2025

Media Coverage

Operation Sindoor and beyond: How India prepared for future wars in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2025
December 29, 2025

From Culture to Commerce: Appreciation for PM Modi’s Vision for a Globally Competitive India