पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018 विजेत्यांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी शिकवण्यात मदत म्हणून तंत्रज्ञान वापरण्याचे महत्व विशद केले. त्यांनी शिक्षकांना दैनंदिन विविध प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना विचार मंथन करायला प्रोत्साहित करायला सांगितले. त्यांनी पुरस्कार विजेत्यांना प्रत्येक मुलाला संधी देण्याचे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला बंधनात न अडकवण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेवर भर दिला. ते म्हणाले सर्जनशीलतेला प्रोत्साहन मुलांसाठी स्वयंप्रेरणेचे काम करेल आणि ते स्वतःशी स्पर्धा करायला सक्षम बनतील. विविध मुद्यांबाबत विद्यार्थ्यांचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. आपल्या अंतरंगातील विद्यार्थी जिवंत ठेवण्याचे आणि त्याच्याकडून शिकत राहण्याची सूचना त्यांनी शिक्षकांना केली.

पंतप्रधानांशी बोलताना पुरस्कार विजेत्यांनी शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. अटल टिंकरिंग लॅबमुळे विद्यार्थी संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करायला सक्षम झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे देखील उपस्थित होते.


