चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आणखी एक 3Dअॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते ध्यान करताना दिसत आहेत.
ध्यानधारणा हा योगाभ्यासाचा महत्वपूर्ण भाग आहे. यामुळे मन आणि शरीर दोन्ही प्रफुल्लीत होतात, एकाग्रता वाढते आणि वर्तणुकीत चांगले बदल घडून येतात. ध्यानामुळे भय, क्रोध, काळजी आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते. यामुळे स्मरणशक्ती वाढते, इच्छाशक्ती वाढते आणि विचारांमध्ये स्पष्टता येऊन परिणामी जीवनमान सुधारते. यामुळे मन शांत आणि स्थिर होऊन आत्मज्ञान होते जे योगाभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Sharing a video this morning, on Dhyan. Practice regularly to rejuvenate the mind and body. #4thYogaDay pic.twitter.com/1tvJllqOpA
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2018


