शेअर करा
 
Comments

अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांनी दिलेल्या निमंत्रणावरून   पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल  2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील.  पंतप्रधान 22 एप्रिल  2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान होणाऱ्या  पहिल्या सत्रात  “Our Collective Sprint to 2030” यावर आपले विचार मांडतील.

या शिखर परिषदेत जगातील सुमारे 40 अन्य नेते सहभागी होत आहेत.  मेजर इकॉनॉमीज फोरमचे सदस्य असलेल्या देशांचे आणि हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांचे ते प्रतिनिधित्व करतील (भारत याचा  सदस्य आहे). हवामानातील बदल, हवामानसंबंधी उपाययोजनांत वाढ,  कार्बन उत्सर्जन  कमी करण्यासाठी अर्थसहाय्य जमवणे, निसर्ग आधारित उपाय, हवामान सुरक्षा तसेच स्वच्छ उर्जेसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यावर नेते आपली मते व्यक्त करतील.

राष्ट्रीय परिस्थिती आणि शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांचा आदर करतांना  सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक विकासाशी हवामान कृतीची जग कशी सांगड घालू शकेल यावरही नेते चर्चा करतील.

नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीओपी 26 च्या अनुषंगाने हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक बैठकांच्या मालिकेचा ही  शिखर परिषद एक भाग आहे.

सर्व सत्रे थेट प्रक्षेपित  केली जातील आणि माध्यमे व लोकांसाठी खुली असतील.

 

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India breaks into the top 10 list of agri produce exporters

Media Coverage

India breaks into the top 10 list of agri produce exporters
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 23rd July 2021
July 23, 2021
शेअर करा
 
Comments

Prime Minister Narendra Modi wished Japan PM Yoshihide Suga ahead of the Tokyo Olympics opening ceremony

Modi govt committed to welfare of poor and Atmanirbhar Bharat