स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतरही देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत अजून बँकिंग सेवा पोहचल्या नव्हत्या. याचा अर्थ असा की, त्यांच्याकडे बचतीसाठी काही नाही, किंवा त्यांना संस्थात्मक पतपुरवठा या बाबीची संधी मिळाली नाही. याच प्रमुख समस्या दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट रोजी पंतप्रधान जन धन योजनेचा शुभारंभ केला. अवघ्या काही महिन्यांतच या योजनेमुळे लाखो भारतीयांच्या आयुष्यात अमुलाग्र परिवर्तन घडून आले. वर्षभरात 19.72 कोटी बँक खाती उघडण्यात आली. 16.8 कोटी रुपे कार्डचे वितरण करण्यात आले. बँकांमध्ये रु. 28699.65 कोटींचे भांडवल जमा झाले. विक्रमी अशा 1,25, 697 बँक मित्रांची (बँक दूत) नियुक्ती करण्यात आली. एका आठवड्यात1,80,96,130 बँक खाती उघडल्याच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली आहे.

हे सर्व शक्य झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य लोकांना आणि सरकारी यंत्रणेला कामासाठी प्रवृत्त केले म्हणून. हे महाकाय कार्य एका मोहिमेसारखे हाती घेण्यात आले होते, शासन आणि जनता यांच्या भागीदारीमुळे हे यश साध्य झाले.
बँक खाती उघडल्यामुळे लाखो भारतीयांना बँकिंग सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळाली. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसला. आता, सरकारकडून मिळणारी अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. पहल योजनेअंतर्गत एलपीजी लाभधारकांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेअंतर्गत, 10 कोटी लोकांना थेट रोख अनुदान मिळतील आणि 4000 कोटी रुपयांच्या सब्सिडीची बचत होईल.

सर्वसामान्य लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नागरिकांना विमा आणि निवृत्तीवेतनासारख्या सुविधा पुरवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत प्रतिमाह केवळ 12 रुपये जमा करुन दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळवण्याची सुविधा आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुमच्या योगदानावर आधारीत महिना रुपये 5000 पर्यंत निवृत्तीवेतन मिळते. योजना सुरु झाल्यापासून काही दिवसात, 7.22 लोकांनी (16/5/2015 पर्यंत) या योजनांमध्ये नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त, मुलींच्या कल्याणासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारने सुकन्या समृद्धि योजनेचा शुभारंभ केला.

More about Social Security Schemes
For more details visit: https://www.pmjdy.gov.in/




