शेअर करा
 
Comments

24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या पहिल्या प्रत्यक्ष वैयक्तिक उपस्थितीच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या नेत्यांनी या शिखर परिषदेत संघटनेच्या सदस्य देशांमधील संबध अधिक बळकट करण्याच्या आणि 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक व्यावहारिक सहकार्यासाठी पुढाकार घेण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर भर दिला. कोविड-19 महामारीला संपुष्टात आणणे, लसींचे उत्पादन वाढवणे आणि सुरक्षित आणि प्रभावी लसी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे,उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे, हवामान संकटाचा सामना करणे, विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, अंतराळ आणि सायबर सुरक्षा आणि सदस्य देशांमधील उच्च प्रतिभासंपन्न नव्या पिढीची जोपासना करणे यांचा यामध्ये समावेश होता.

 

कोविड आणि जागतिक आरोग्य

क्वाड संघटनेचे चार सदस्य देश आणि संपूर्ण जगातील लोकांचे जीवन आणि त्यांच्या चरितार्थासाठी सर्वात मोठा धोका हा कोविड-19 महामारीचा आहे ही बाब क्वाड नेत्यांनी विचारात घेतली. आणि म्हणूनच मार्च महिन्यात क्वाड नेत्यांनी इंडो- पॅसिफिक क्षेत्र आणि जगभरात सुरक्षित आणि प्रभावी लसींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी क्वाड लस भागीदारीची सुरुवात केली. मार्चपासून आतापर्यंत क्वाडने सुरक्षित आणि प्रभावी कोविड -19 लसीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी धाडसी पावले उचलली आहेत, आमच्या स्वतःच्या पुरवठ्यामधून या लसी मोफत दिल्या आहेत आणि इंडो- पॅसिफिक क्षेत्रात या महामारीला तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम केले आहे.

क्वाडच्या लस तज्ञांचा गट आमच्या सहकार्याचा केंद्रबिंदू आहे, महामारीमधील नव्या प्रकारांच्या उदयाची माहिती देण्यासाठी आणि इंडो- पॅसिफिक क्षेत्रामध्ये एकत्रित कोविड-19 प्रतिबंधक प्रतिसादामध्ये समन्वय राखण्यासाठी आम्ही नियमित बैठका घेत असतो. यामध्ये क्वाड भागीदारी कोविड-19 डॅशबोर्डवर नियमित लक्ष ठेवण्याचाही समावेश आहे.आम्ही राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 22 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कोविड-19 परिषदेचे स्वागत करतो आणि आमचे कार्य सुरूच राहील याची ग्वाही देतो.

जगाचे लसीकरण करण्यासाठी क्वाड मदत करेलः क्वाड देश म्हणून कोवॅक्सच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केलेल्या लसींच्या मात्रांव्यतिरिक्त जगभरात लसींच्या  1.2 अब्ज मात्रा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आतापर्यंत आम्ही हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि प्रभावी लसींच्या अंदाजे 79 दशलक्ष मात्रा वितरित केल्या आहेत. 2022 च्या अखेरीस कोविड -19 लसीच्या किमान 1 अब्ज मात्रा तयार करण्यासाठी बायोलॉजिकल ई लि.मध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आमची भागीदारी योग्य मार्गावर वाटचाल करत आहे. या नव्या भागीदारीचे पहिले पाऊल म्हणून हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रात या महामारीचा शेवट करण्यासाठी तातडीने मदत होऊ शकेल, अशा प्रकारच्या धाडसी उपायांची क्वाड नेते घोषणा करतील.

लस उत्पादनासाठी  खुल्या आणि सुरक्षित पुरवठा साखळीचे महत्त्व आम्ही लक्षात घेतले आहे. ऑक्टोबर 2021 च्या पूर्वार्धात कोवॅक्ससह इतर देशांना सुरक्षित आणि प्रभावी कोविड -19 लसींची निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या भारताच्या घोषणेचे क्वाडने स्वागत केले.

आरोग्य रक्षणासाठी उत्तम सुविधांची उभारणी: क्वाड आपल्या देशांना आणि जगाला आगामी काळातील महामारींना तोंड देण्यासाठी चांगल्या प्रकारे सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रात कोविड-19 प्रतिबंधक व्यापक उपाययोजना आणि आरोग्याशी संबंधित सुरक्षा वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय निर्माण करणे सुरू ठेवू आणि 2022 मध्ये आम्ही संयुक्तपणे किमान एक महामारी सज्जतेचा आराखडा तयार करू किंवा सरावाचे आयोजन करू. आम्ही 100 दिवसांच्या आत सुरक्षित आणि प्रभावी लसी, उपचार आणि निदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 100 दिवसांच्या अभियानाला पाठबळ देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आमचे सहकार्य आणखी वृद्धिंगत करू. यामध्ये सध्याच्या आणि भविष्यातील क्लिनिकल चाचण्याम्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड-19 उपचारात्मक उपाययोजना आणि लसींच्या चाचण्या( ACTIV)समाविष्ट आहेत. या चाचण्या नव्या उपयुक्त लसींचा आणि उपचारांचा शोध घेण्याच्या प्रक्रियांना गती देण्यासाठी तर उपयुक्त असतील पण त्याचबरोबर या प्रदेशातील देशांना शास्त्रीयदृष्ट्या अतिशय विश्वासार्ह संशोधन हाती घेण्यासाठी त्या पाठबळ देतील. आम्ही ‘ जागतिक महामारी रडार’ निर्माण करण्याच्या मागणीला पाठबळ देऊ आणि विषाणूजन्य जनुकीय देखरेखीमध्ये सुधारणा करू. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या Global Influenza Surveillance and Response System (GISRS) ला बळकट करण्याचा आणि तिचा विस्तार करण्यासाठी एकत्रित काम करण्याचा समावेश आहे.

 

पायाभूत सुविधा

बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड (B3W) या डिजिटल कनेक्टिव्हिटी, हवामान, आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित सुरक्षा आणि लिंग समानताविषयक पायाभूत सुविधांवर केंद्रित असलेल्या  पायाभूत सुविधा भागीदारीवर  आधारित जी-7 देशांच्या घोषणेनुसार तज्ञांची उपलब्धता आणि क्षमतानिर्मितीवर क्वाड भर देईल आणि  या प्रदेशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा उपक्रमांवर प्रभाव निर्माण करेल आणि तेथील गरजांची पूर्तता करणाऱ्या नव्या संधी लक्षात घेईल.

क्वाडः पायाभूत सुविधा समन्वय गटाची निर्मिती करेल. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधाविषयीच्या क्वाड भागीदारांमधील सध्याच्या नेतृत्वाच्या आधारावर एक वरिष्ठ क्वाड पायाभूत सुविधा गट पायाभूत सुविधांच्या गरजांचे मूल्यमापन करण्यासाठी नियमित बैठका घेईल आणि पारदर्शक, उच्च दर्जांच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी संबंधित दृष्टीकोनांमध्ये समन्वय निर्माण करेल. हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आमचे प्रयत्न परस्परांना बळकट करणारे आणि पूरक आहेत याची खातरजमा करण्यासाठी हा गट प्रादेशिक भागीदारांसह तांत्रिक सहाय्य आणि क्षमतावृद्धी प्रयत्नांमध्ये देखील समन्वय निर्माण करेल.

उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांमध्ये अग्रणीः हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीमध्ये क्वाड भागीदार अग्रस्थानी आहेत. आमचे पूरक दृष्टीकोन जास्तीत जास्त परिणामकारकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संसाधनाना बळ देतात. या प्रदेशातील पायाभूत सुविधांसाठी क्वाड भागीदारांनी 2015 पासून 48 अब्ज डॉलरपेक्षा जास्त अधिकृत अर्थसहाय्य पुरवले आहे. यातून 30 पेक्षा जास्त देशांमध्ये  क्षमता वृद्धीसह ग्रामीण विकास, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, अपारंपरिक उर्जा निर्मिती( उदा. सौर, पवन आणि जलविद्युत), दूरसंचार, रस्ते वाहतूक आणि असे अनेक प्रकारचे पाठबळ देणारे हजारो प्रकल्प उभे राहिले आहेत.आमची पायाभूत सुविधा भागीदारी या योगदानात वाढ करेल आणि या प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला आणखी चालना देईल.

हवामान

या भागावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या हवामान बदलांबाबत नुकत्याच झालेल्या हवामान परिषदेमध्ये सादर केलेल्या अहवालाविषयी ऑगस्ट आंतरसरकारी समितीने व्यक्त केलेल्या चिंता योग्य असून त्याविषयी क्वाड देश सहमती व्यक्त करत आहेत. हवामानाच्या या आपत्तीला तातडीने तोंड देण्यासाठी क्वाड देश  हवामानविषयक आकांक्षांच्या विषयांवर आपले प्रयत्न केंद्रित करतील. यामध्ये राष्ट्रीय उत्सर्जन आणि अपारंपरिक उर्जेची  2030 पर्यंत निर्धारित केलेली उद्दिष्टे, स्वच्छ उर्जानिर्मिती नवोन्मेष आणि प्रकल्पांची उभारणी, त्याचबरोबर अंगिकार, तोंड देण्याची क्षमता आणि सज्जता या विषयांचा त्यात समावेश आहे. 2020च्या दशकात क्वाड देश अनुमानित केलेली उर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रात हवामान उद्दिष्टे आवाक्यात राखण्यासाठी आपल्या प्रयत्नांचा वेग वाढवतील. याव्यतिरिक्त होणाऱ्या प्रयत्नांमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्रात मिथेन वायूमध्ये कपात करणे आणि जबाबदार आणि चिवट स्वच्छ उर्जा पुरवठा साखळी निर्माण करणे यावर एकत्रितपणे काम करण्याचा समावेश आहे.

ग्रीन-शिपिंग नेटवर्कची निर्मिती: क्वाड देशांमध्ये जगातील सर्वात मोठ्या बंदरांसह प्रमुख सागरी वाहतूक केंद्रे आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणास अनुकूल हरित बंदर पायाभूत सुविधा आणि क्लीन-बंकरिंग इंधन सुविधा तयार करण्यासाठी क्वाड देशांकडे वेगळ्या प्रकारची क्षमता आहे. क्वाड सदस्य देश क्वॉड शिपिंग टास्क फोर्स तयार करून आणि लॉस एंजेलिस, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडनी (बॉटनी) आणि योकोहामासह आघाडीच्या बंदरांना

पर्यावरणपूरक आणि नौवहनाच्या मूल्य साखळीतील कार्बन उत्सर्जन कमी करणारे एक जाळे उभारण्यासाठी आमंत्रित करून आपल्या कामाचे नियोजन करतील. क्वाड शिपिंग टास्क फोर्स  विविध प्रकारच्या  प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या कार्याचे नियोजन करेल आणि 2030 पर्यंत दोन ते तीन अल्प उत्सर्जन (कमी कार्बन उत्सर्जन) किंवा शून्य उत्सर्जन नौवहन मार्गिका उभारण्याचे क्वाडचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छ-हायड्रोजन भागीदारीची स्थापना : स्वच्छ-हायड्रोजन मूल्य साखळीच्या सर्व घटकांची किंमत कमी करण्यासाठी आणि ते बळकट करण्यासाठी क्वाड एका स्वच्छ हायड्रोजन भागीदारीची घोषणा करेल आणि  इतर क्षेत्राचील द्वीपक्षीय आणि बहुपक्षीय हायड्रोजन उपक्रमांना बळकट करेल. यामध्ये तंत्रज्ञानाचा विकास, स्वच्छ हायड्रोजनच्या (अपारंपरिक उर्जा स्रोतांद्वारे, जीवाश्म इंधनांपासून कार्बन वेगळा काढून आणि अडवून मिळवलेला आणि ज्यांची आण्विक स्रोतांना पसंती असेल त्या स्रोतांपासून मिळवलेला हायड्रोजन)उत्पादनात प्रभावी पद्धतीने वाढ, स्वच्छ हायड्रोजनची पूर्णत्वाच्या प्रक्रियांपर्यंत वापरासाठी सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक, साठवणूक आणि वितरण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निवड आणि विकास आणि हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रात स्वच्छ हायड्रोजनच्या व्यापाराला चालना देण्यासाठी त्याची बाजारातील मागणी वाढवणे यांचा समावेश आहे.

हवामानाशी तादात्म्य, प्रतिरोधकता आणि सज्जताः हवामानविषयक महत्त्वाच्या माहितीची परस्परांमध्ये देवाणघेवाण करून आणि आपत्तीच्या प्रसंगी मजबूत पायाभूत सुविधा विकसित करून हवामान बदलाला प्रतिसाद देण्यासाठी हिंद –प्रशांत महासागर क्षेत्राची सज्जता वाढवण्यासाठी क्वाड देश वचनबद्ध आहेत. क्वाड देश हवामान आणि माहिती सेवा टास्क फोर्स तयार करतील आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीच्या माध्यमातून एक नवीन तांत्रिक सुविधा निर्माण करतील, जे विकसित होत असलेल्या लहान बेटांच्या देशांना तांत्रिक सहाय्य प्रदान करेल.

 

लोकांमध्ये देवाणघेवाण आणि शिक्षण

आजचे विद्यार्थी उद्याचे किंवा भविष्यातील नेते, नवप्रवर्तक किंवा संशोधक आणि संस्थापकअसतील. भविष्यातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्यात संबंध निर्माण करण्यासाठी क्वाड फेलोशिप या पहिल्या वहिल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा करताना क्वाड भागीदारांना आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे परिचालन आणि प्रशासन एका धर्मादाय उपक्रमाद्वारे प्रत्येक क्वाड देशाच्या नेत्यांचा समावेश असलेल्या बिगर सरकारी कृती दलाशी विचारविनमय करून केले जाईल. हा कार्यक्रम अमेरिकेत शिकण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितातील अत्यंत प्रतिभावान अमेरिकन, जपानी, ऑस्ट्रेलियन आणि भारतीय मास्टर आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांना एकत्र आणेल. ही नवीन फेलोशिप संबंधित देश आणि सदस्य देशांमधील शासकीय, खाजगी आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नावीन्य आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी क्वाड सदस्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान तज्ञांचे एक जाळे निर्माण करेल. हा कार्यक्रम क्वाड गुणवंतामध्ये परस्परांचे समाज आणि संस्कृतीची मूलभूत ओळख निर्माण करेल. यासाठी, प्रत्येक क्वाड कंट्री ग्रुपमध्ये सहलीचे आयोजन केले जाईल आणि प्रत्येक देशातील अव्वल शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि राजकारणी यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

क्वाड फेलोशिपचा प्रारंभ: ही फेलोशिप दरवर्षी प्रत्येक क्वाड देशातील 25 याप्रमाणे एकूण 100 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील आघाडीच्या STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) विद्यापीठांमध्ये मास्टर्स आणि डॉक्टरल पदव्यांच्या अभ्यासक्रमांसाठी प्रायोजित करेल.जगातील आघाडीच्या फेलोशिप कार्यक्रमांपैकी ही एक फेलोशिप असेल. मात्र, ही फेलोशिप क्वाड फेलोशिप STEM वर लक्ष केंद्रित करेल आणि ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतील तज्ञांना एकत्र आणेल.

श्मिट फ्यूचर्स हा धर्मादाय उपक्रम या  फेलोशिप प्रोग्रामचे परिचालन आणि व्यवस्थापन एका बिगर-सरकारी कृतीदलाशी सल्लामसलत करून करेल.  कृतीदलामध्ये प्रत्येक क्वाड देशातील शैक्षणिक, परराष्ट्र धोरण आणि खाजगी क्षेत्रातील नेत्यांचा समावेश आहे. फेलोशिप्स कार्यक्रमाच्या मुख्य प्रायोजकांमध्ये- एक्सेंचर, ब्लॅकस्टोन, बोइंग, गुगल, मास्टरकार्ड आणि वेस्टर्न डिजिटल यांचा समावेश आहेआणि फेलोशिपला पाठबळ देण्यात स्वारस्य असलेल्या अतिरिक्त प्रायोजकांचे यामध्ये स्वागत आहे.

 

महत्वाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

क्वाड नेते मुक्त, सुरक्षित आणि सर्वांना उपलब्ध तंत्रज्ञानाच्या परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

मार्चमध्ये अतिशय महत्वाच्या नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यगटाची स्थापना झाल्यापासून, आम्ही तांत्रिक मानके, 5G विविधताकरण आणि उपयोजन, होरायझन-स्कॅनिंग आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळी या चार प्रयत्नांच्या भोवताली आमच्या कामाचे नियोजन केले आहे. आज क्वाड सदस्य देशांच्या नेत्यांनी आमची सामाईक लोकशाही मूल्ये आणि सार्वत्रिक मानवाधिकारांविषयीचा आदरभाव यांच्या आधारावर तयार झालेल्या अतिशय महत्वाच्या नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या आमच्या नव्या प्रयासांसह तंत्रज्ञानावरील सिद्धांतांचे निवेदन प्रसिद्ध करत आहेत. 

क्वाड संघटना क्वाड सिद्धांताचे निवेदन प्रसिद्ध करेल.

अनेक महिन्यांच्या विचारविनिमयानंतर क्वाड संघटना तंत्रज्ञान, रचना, विकास, शासन आणि वापर याबाबतच्या सिद्धांतांचे निवेदन जारी करेल जे केवळ या प्रदेशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जबाबदार, खुल्या आणि उच्च दर्जाच्या नवोन्मेषाबाबत मार्गदर्शक ठरू शकेल.

तांत्रिक मानक संपर्क गटाची स्थापनाः मानक निर्मिती प्रक्रिया आणि त्याचबरोबर मूलभूत मानक निश्चितीपूर्व संशोधन यावर भर देणाऱ्याअत्याधुनिक दळणवळण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयीच्यासंपर्क गटाची स्थापना क्वाडकडून केली जाणार आहे.

सेमीकंडक्टर पुरवठा साखळीची स्थापनाः सेमीकंडक्टर आणि त्याचे महत्त्वाचे भाग यांच्या पुरवठा साखळीची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठीआणि क्षमता तपासण्यासाठी आणि त्यांच्या पुरवठ्यावर होणाऱ्या संभाव्य विपरित परिणामांना ओळखण्यासाठी क्वाड भागीदार एक संयुक्त उपक्रम सुरू करणार आहेत. यामुळे जागतिक पातळीवरील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या अत्यावश्यक तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या वैविध्यपूर्ण आणि स्पर्धात्मक बाजारपेठेला पाठबळ देणे क्वाड भागीदारांना शक्य होणार आहे.

5जी व्यवस्था आणि विविधताकरणः विविधतापूर्ण, प्रतिरोधक्षम आणि सुरक्षित दूरसंचार परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यामध्ये क्वाड सरकारांच्या महत्त्वाच्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी  क्वाडने खुल्या रॅन( Radio Access Network) धोरण आघाडीच्या समन्वयाने खुले रॅन तैनाती आणि स्वीकार याविषयी ट्रॅक 1.5 इंडस्ट्री संवाद सुरू केला आहे. क्वाड भागीदार संयुक्तपणे 5जी विविधताकरणासाठी चाचण्या आणि चाचण्यांच्या सुविधांशी संबंधित प्रयत्नांसह पोषक वातावरण उपलब्ध करून देणार आहेत.

जैवतंत्रज्ञान संशोधनावर देखरेख: अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सिंथेटिक बायॉलॉजी, जनुकीय क्रमनिर्धारण आणि जैवउत्पादन यांसह अतिशय संवेदनशील आणि उदयाला येणारे तंत्रज्ञान यावर क्वाड देखरेख ठेवेल. या प्रक्रियेदरम्यान आम्ही सहकार्यासाठी संबंधित संधी विचारात घेऊ.

 

सायबरसुरक्षा

सायबरसुरक्षेसंदर्भात आम्हा चार देशांदरम्यान दीर्घ काळापासून असलेल्या सहकार्याच्या आधारावर आम्ही आमच्या देशातील सायबरतज्ञांना एकत्र आणून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींच्या मदतीने सायबर हल्ल्यांना तोंड देणाऱ्या अतिसंवेदनशील पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी नव्याने प्रयत्न करू.

क्वाड वरिष्ठ सायबर गटाची स्थापनाः क्वाड देशांमधील सामाईक सायबर मानकांचा अंगिकार आणि अंमलबजावणी, सुरक्षित सॉफ्टवेअरचा विकास, मनुष्यबळ उभारणी आणि गुणवत्ता निर्मिती, सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधांची मापनीयता आणि सायबरसुरक्षा यांना प्रोत्साहन यांसह संबंधित क्षेत्रातील सातत्याने होणाऱ्या सुधारणांविषयीचे सरकार आणि उद्योग यांच्या दरम्यानचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यासाठीनेत्यांच्या पातळीवरच्या तज्ञांच्या नियमित बैठका होतील.

 

अंतराळ

क्वाड देश अंतराळ क्षेत्रासह जगातील शास्त्रीय क्षेत्रातील आघाडीचे देश आहेत. आज पहिल्यांदाच क्वाड नव्या कार्यगटासोबत सहकार्याची सुरुवात करणार आहे. विशेषतः आमच्या भागीदारीमध्ये उपग्रहाने गोळा केलेल्या माहितीची देवाणघेवाण, हवामान बदलावर देखरेख आणि सुसंगत आचरणावर भर, आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्जता आणि सामाईक पद्धतीने आव्हानांना प्रतिसाद यांचा समावेश आहे.

उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीची पृथ्वी आणि जलसंरक्षणासाठी देवाणघेवाणः आम्ही चार देश पृथ्वी निरीक्षण उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीची देवाणघेवाण आणि हवामान बदलाच्या जोखमींविषयी त्यांनी केलेले विश्लेषण आणि महासागर आणि सागरी साधनसंपत्तीचा शाश्वत वापर याविषयी चर्चा सुरू करणार आहोत. या माहितीची देवाणघेवाण करण्यामुळे क्वाड देशांना हवामान बदलाला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देता येईल आणि या जोखमीचा सामना करणाऱ्या इतर हिंद –प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना आपली क्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. क्वाड देश  अंतराळ तंत्रज्ञानाचे उपयोजन आणि परस्पर हिताचे तंत्रज्ञान यांना पाठबळ देण्यासाठी, ते बळकट करण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील.

निकष आणि मार्गदर्शक तत्वांवर विचारविनिमयः बाह्य अवकाशातील पर्यावरण दीर्घकाळ शाश्वत राखण्यासाठी निकष, मार्गदर्शक तत्वे, सिद्धांत आणि नियम यांविषयी देखील आम्ही विचारविनिमय करणार आहोत.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Why Narendra Modi is a radical departure in Indian thinking about the world

Media Coverage

Why Narendra Modi is a radical departure in Indian thinking about the world
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 17 ऑक्टोबर 2021
October 17, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens congratulate the Indian Army as they won Gold Medal at the prestigious Cambrian Patrol Exercise.

Indians express gratitude and recognize the initiatives of the Modi government towards Healthcare and Economy.