येत्या 5 वर्षांच्या कालावधीत सार्थक-पीडीएससाठी केंद्र सरकार 25,530 कोटी रुपये खर्च करणार
एफपीएस डीलर्सना अधिक कमिशनसह,देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत अन्नधान्यांचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी या योजनांची अंमलबजावणी सुरु ठेवणार
सार्वजनिक वितरण प्रणालीत (पीडीएस) पारदर्शकता, सुरक्षितता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांच्या माध्यमातून पीडीएसचे परिचालन बुद्धिचातुर्याने वृद्धींगत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) 16 व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात केंद्राचा वाटा म्हणून 25,530 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह “अन्नधान्य वाहतूक तसेच हाताळणीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक वितरण प्रणालीचे (पीडीएस) स्वयंचलिकरण करण्यासाठीच्या योजनेची (सार्थक-पीडीएस) व्यापक योजना म्हणून अंमलबजावणी सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे.

राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रशासने यांना राज्यांच्या दरम्यान अन्नधान्याची वाहतूक तसेच हाताळणी यांच्यासाठी करावा लागणारा खर्च आणि एफपीएस डीलर्सचा नफा यांची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचा तसेच केंद्रीय मदतीची सध्या सुरु असलेली वित्तपुरवठा पद्धत तशीच सुरु ठेवण्याचा देखील निर्णय सीसीईएने घेतला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा,2013 (एनएफएसए) च्या अंमलबजावणीला व्यापक प्रमाणात बळकटी देण्यासाठी  (i) “अन्नधान्यांच्या राज्यांदरम्यानच्या वाहतुकीसाठी राज्य सरकारी संस्थांना मदत तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएफएसए) रास्त धान्य दुकानांच्या (एफपीएस) डीलर्सचा नफा” आणि (ii) “सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिकीकरण आणि सुधारणांसाठीची (स्मार्ट पीडीएस)योजना अशा दोन योजनांचे एकत्रीकरण करण्यासाठी ही व्यापक योजना तयार करण्यात आली आहे.

(अ)देशांमध्ये राज्यांच्या दरम्यान अन्नधान्याची वाहतूक, हाताळणी आणि एफपीएस डीलर्सचा नफा यासाठी खात्रीशीर आर्थिक पाठबळ देऊ करणे आणि (ब) दिनांक 31.03.2031 पर्यंत कार्यरत असणाऱ्या एकत्रित केलेल्या योजनेसह, देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात सेवा वितरण करणारी, गळतीचे प्रमाण किमान राखणारी आणि एनएफएसए अंतर्गत अन्न सुरक्षेप्रती देशाच्या बांधिलकीला मजबूत करण्याची खात्री देणारी  एकसमान, नागरिक-केंद्री, बुद्धिमान  आणि आंतरपरिचालित पीडीएस रचना निर्माण करणे हे या सार्थक-पीडीएस योजनेचे उद्देश आहेत.

पीडीएस परिचालनात पारदर्शकता, सुरक्षितता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी वास्तविक वेळी निरीक्षण, कृत्रिम बुद्धीमत्ता-चलित तक्रार निवारण आणि अॅनॅलिटिक्स यंत्रणा, डाटा-चलित पर्यवेक्षणासाठी राज्य आदेश नियंत्रण केंद्रे तसेच आयएसओ-प्रमाणित प्रक्रिया आराखडे यांसाठी मानकीकृत संरचना आणि एकसमान डाटाबेस निर्माण करुन कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल), नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) आणि ब्लॉकचेन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या माध्यमातून पीडीएसच्या परिचालनाला आधुनिक, एकत्रित आणि प्रभावी वापर करण्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सार्थक-पीडीएस योजना करत आहे.

भारत सरकारची, देशातील जनतेला पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्याची उपलब्धता तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करुन सन्माननीय जीवन प्रदान करणे ही एक सामाजिक आणि कायदेशीर बांधिलकी आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत  समाविष्ट असलेल्या 81.35 कोटी लोकांसाठी भारत सरकारची बांधिलकी पूर्ण करण्याच्या दिशेने ही योजना कार्यरत राहणार आहे. वैधानिक आणि धोरणात्मक चौकटीवर आधारित, सार्थक-पीडीएस, आर्थिक सहाय्य राखत ते सुव्यवस्थित करते, त्याचबरोबर त्याला आधुनिक  तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस  परिसंस्थेमध्ये समाविष्ट करते.

गेल्या दशकात, सरकारने टीपीडीएसचे अनेक उपक्रम राबवले आहेत. ज्यात, पीडीएसचे एकात्मिक व्यवस्थापन (आयएम-पीडीएस) आणि स्मार्ट पीडीएस यांसारखे अनेक डिजिटायझेशन उपक्रम, तसेच मेरा रेशन, अन्न मित्र, राइटफुल टार्गेटिंग डॅशबोर्ड आणि अन्न सहाय्यता यांसारखे उपक्रम, ॲप्लिकेशन्स नागरिकांसाठी राबवले आहेत. 1 एप्रिल 2023 पासून, स्मार्ट पीडीएस योजना ही तंत्रज्ञान-आधारित सुधारणांचा आधारस्तंभ ठरली आहे, ज्यामुळे 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्डांचे संपूर्ण डिजिटायझेशन, आधार सीडिंग, ई-पीओएसद्वारे एफपीएस ऑटोमेशन, ऑनलाइन वाटप आणि संगणकीकृत पुरवठा-साखळी व्यवस्थापन शक्य झाले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit

Media Coverage

Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2026
July 11, 2026

Record Exports, Record Investments, Record Pride: India’s Rise Under PM Modi is Multi-Dimensional