भोजपूरच्या भरड धान्य महोत्सवामुळे नागरिकांमध्ये 'श्री अन्न' बद्दल जागरुकता वाढेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की यामुळे नागरिकांना त्यांच्या आहारात भरड धान्याचा समावेश करण्यास प्रोत्साहन मिळेल. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात दोन दिवसीय बाजरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले की ;
“भोजपूरचा भरड धान्य महोत्सव श्री अन्न याप्रती नागरिकांमध्ये जागरुकता वृद्धिंगत करेल, तसेच भरड धान्याचा नियमित आहारात समावेश करण्यासाठी प्रेरणा देईल."
भोजपुर का मिलेट महोत्सव श्री अन्न के प्रति लोगों की जागरूकता तो बढ़ाएगा ही, साथ ही इसे खानपान में भी शामिल करने के लिए प्रेरित करेगा।https://t.co/7ow0ArjgIY https://t.co/KDJU890cPz
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2023


