पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचे स्वागत केले, ही महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी एक चांगली बातमी आहे, असे नमूद करून अमरावतीमधील सक्रीय विमानतळामुळे व्यापार आणि संचार संपर्काला चालना मिळेल असे म्हटले आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्या एक्स वरच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी एक चांगली बातमी. अमरावतीमधील सक्रीय विमानतळामुळे व्यापार आणि संचार संपर्काला चालना मिळेल.”
Great news for Maharashtra, especially Vidarbha region. An active airport in Amravati will boost commerce and connectivity. https://t.co/WAq9PzCTZW
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2025


