पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची तलवारबाजीतील खेळाडू सी ए भवानीदेवीचे कौतुक केले आहे. भवानी देवीने काल ऑलिंपिक तलवारबाजी खेळातील सामना जिंकून भारताचा या खेळातील पहिलावहिला विजय नोंदवला होता , परंतु पुढील फेरीत तिला पराभव पत्करावा लागला.
या ऑलिंपिक खेळाडूच्या भावनाशील ट्विटर संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, "तू तुझ्यातील सर्वोत्तम खेळ दाखवलास यातच सर्व काही आले. जय आणि पराजय हा जीवनाचा भाग आहे.
तुझ्या योगदानाचा भारताला अत्यंत अभिमान आहे . आपल्या नागरिकांसाठी तू प्रेरणा आहेस."
You gave your best and that is all that counts.
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2021
Wins and losses are a part of life.
India is very proud of your contributions. You are an inspiration for our citizens. https://t.co/iGta4a3sbz


