परदेशात असलेला आपला बहुमोल राष्ट्रीय वारसा परत आपल्या भूमीत यावा यासाठीच्या केंद्रसरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी एका ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार चोल काळातील (14वे -15वे शतक) अरियालूर जिल्ह्यातील पोटावेली वेल्लूर येथील श्री वरथाराजा पेरुमलच्या विष्णू मंदिरातून चोरीला गेलेली ही हनुमानाची धातूची मूर्ती ऑस्ट्रेलिया मधील भारतीय उच्चायुक्तांना सुपूर्द केली आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत विविध देशातून 251 पुरातन वस्तू भारतात परत आणल्या आहेत. यापैकी 238 वस्तू 2014 नंतर परत आणण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"आपला मौल्यवान वारसा परत आपल्या भूमीत यावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत."
We are constantly working towards ensuring our prized heritage comes back home. https://t.co/35nK2dCW8R
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2023


