पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, लिकटेंस्टाईनचे वंशपरंपरागत राजकुमार एचएसएच प्रिन्स अलोइस यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिट, 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताला भेट दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एचएसएच प्रिन्स अलोइस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि लिकटेंस्टाईन यांच्यात सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध असल्याचे पुन्हा एकदा मान्य केले.

ऑक्टोबर 2025 मधील भारत-टीईपीए मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीचे स्वागत करताना नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की हा करार द्विपक्षीय आर्थिक भागीदारीला नवीन चालना देईल. दोन्ही नेत्यांनी नमूद केले की टीईपीए पुढील 15 वर्षांत भारतात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक सुलभ करेल. विशेषतः उच्च-मूल्य उत्पादन, प्रगत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष-चालित क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यास त्यांनी सहमती दर्शविली.‌

 

ही बैठक भारत-लिकटेंस्टाईन भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आणि परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेची पुष्टी झाली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Major Ports Handled Record 915 Million Tonnes Cargo In FY26, Surpass Annual Target

Media Coverage

India's Major Ports Handled Record 915 Million Tonnes Cargo In FY26, Surpass Annual Target
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 एप्रिल 2026
April 06, 2026

India’s Golden Chapter: PM Modi Turns Vision into Records From Ports to People, From Naxal to Naval