भारतीय प्रशासन सेवेच्या २०१६ च्या तुकडीच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी, आज सहायक सचिव या सत्राच्या समारोपाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादरीकरण केले.

शेतक-यांचे उत्पन्न, माती आरोग्य कार्ड, तक्रार निवारण, नागरिक-केंद्रित सेवा, ऊर्जा क्षेत्र सुधारणा, पर्यटक सुविधा, ई-लिलाव आणि स्मार्ट शहरी विकास उपाय यासारख्या आठ निवडक विषयांवर पंतप्रधानांना सादरीकरण करण्यात आले.

|

या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, सहाय्यक सचिवांच्या कार्यक्रमाद्वारे कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकार्यांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी मिळते. पंतप्रधानांनी तरुण अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध मंत्रालयांशी संलग्न असताना त्यांनी घेतलेल्या कामाच्या अनुभवातून उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी तरुण अधिकाऱ्यांना लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करण्यास प्रोत्साहन दिले.

|

 

|

अवती भोवतीच्या लोकांशी संबंध विकसित करून त्यांच्यासह सेवा राष्ट्राला अर्पण करा. लोकांशी संबंध विकसित करणे हि अधिकाऱ्यांच्या कार्यातील आणि उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी यशस्वितेची किल्ली आहे.

|

असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी तरुण अधिकार्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Making India the Manufacturing Skills Capital of the World

Media Coverage

Making India the Manufacturing Skills Capital of the World
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जुलै 2025
July 03, 2025

Citizens Celebrate PM Modi’s Vision for India-Africa Ties Bridging Continents:

PM Modi’s Multi-Pronged Push for Prosperity Empowering India