समर्पित जीवन

Published By : Admin | May 23, 2014 | 15:09 IST

१७ वर्षे वयाच्या कुमार अवस्थेतले अनेक तरुण याकाळात आपल्या करियरचा विचार करत असतात, किंवा आपल्या संपत असलेल्या बालपणाची मौज घेत असतात. मात्र नरेंद्र मोदींचे या वयातले आयुष्य खूप वेगळे होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घेतला. त्यांनी घर सोडून संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबाला अतिशय धक्का बसला मात्र गावाच्या छोट्याशा परिघातून बाहेर पडत विस्तारण्याचा नरेंद्रचा निर्णय त्यांनी मान्य केला. जेव्हा त्यांची खरोखरच निघण्याची वेळ आली, त्या दिवशी त्यांच्या आईने गोडधोड पदार्थ करून, कपाळावर कुंकुमतिलक लावून आपल्या मुलाला निरोप दिला.

नरेंद्र मोदींनी अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यात हिमालयाच्या रांगामध्ये वसलेला गरुडछाती हा भाग, पश्चिम बंगालमधील रामकृष्ण आश्रम आणि ईशान्य भारतातील अनेक ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. त्या तरुण वयात या प्रवासात आलेल्या अनुभवांचा त्यांच्यावर कायम ठसा उमटला. भारताच्या या विस्तीर्ण भूभागावर त्यांनी खूप प्रवास केला, देशाच्या विविध भागातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची त्यांनी ओळख करून घेतली. याच काळात त्यांच्यातल्या आध्यात्मिक प्रेरणाही जागृत झाल्या, त्यातून त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांशी ते जोडले गेले.  The Activistनरेंद्र मोदींचे बालपण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हाक

देशाच्या या प्रवासावरून नरेंद्र दोन वर्षानी परत आले. मात्र या काळात ते फक्त दोन आठवडे घरी राहिले. यावेळी त्यांचे लक्ष्य निश्चित होते आणि त्यांचे मिशनही पक्के ठरले होते. ते अहमदाबाद इथे जाणार होते, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. १९२५ साली सुरु झालेली आर एस एस ही संघटना एक सामाजिक-सांस्कृतिक संघटना होती. देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्निर्माणासाठी ही संघटना कार्यरत आहे.


The Activist

त्यांचा पहिल्यांदा आर एस एस शी संबंध आला त्यावेळी ते आठ वर्षांचे होते. त्या काळात दिवसभर घरच्या चहाच्या टपरीवर काम करून ते संध्याकाळी संघाच्या शाखेत जायचे. या शाखेत जाण्यामागे त्यावेळी कुठलाही राजकीय हेतू नव्हता. याच ठिकाणी त्यांची भेट लक्ष्मणराव इनामदार यांच्याशी झाली, ‘वकीलसाहेब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर पुढे मोठा प्रभाव पडला.


The Activist

आर एस एस च्या काळातले नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र

अहमदाबाद आणि त्यापुढचा प्रवास

अशी सगळी पार्श्वभूमी घेऊन नरेंद्र मोदी वयाच्या विसाव्या वर्षी गुजरातमधले सर्वात मोठे शहर अहमदाबाद इथे आले.ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नियमित जायला लागले. त्यांची समर्पित वृत्ती, संघटन कौशल्य या सगळ्यामुळे वकील साहेब मोदींच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाले होते. १९७२ साली मोदींजी आर एस एस चे पूर्णवेळ प्रचारक झाले आणि त्यांनी अतिशय शिस्तबद्ध दिनक्रम आखून घेतला. त्यांचा दिवस पहाटे५.३० वाजता सुरु होत असे आणि रात्री उशीरापर्यंत सुरु राहत असे. अशा व्यस्त दिनक्रमात नरेंद्र मोदी यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली.

प्रचारक महणून त्यांना संपूर्ण गुजरातमध्ये प्रवास करावा लागत असे. १९७२- १९७३ च्या सुमाराला ते अनेकदा खेडा जिल्ह्यातल्या नदीयाड इथे असलेल्या शांताराम मंदिरात मुक्काम करायचे. १९७३ साली मोदी यांच्यावर सिद्धपूर येथे भरणाऱ्या संघाच्या महाशिबीराचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली. याच शिबिरात त्यांची संघाच्या मोठंमोठ्या नेत्यांशी भेट झाली.

The Activist

जेव्हा नरेंद्र मोदी एक कार्यकर्ता म्हणून नवनवे अनुभव घेत होते, शिकत होते त्या काळात गुजरातसह संपूर्ण देशातील परिस्थिती अतिशय अस्थिर होती. ज्यावेळी ते अहमदाबादला पोहोचले, त्यावेळी ते शहर अतिशय विदारक अशा जातीय दंगलीना तोंड देत होते. देशात इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्ष- जो १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला होता- तो इंदिरा समर्थक आणि इतर अशा दोन गटात विभागाला गेला होता, इंदिरा विरोधी गटात गुजरातमधील मोरारजी देसाई होते. १९७१ साली गरिबी हटाओ च्या नाऱ्यावर स्वार होत, प्रचाराची रणधुमाळी माजवत ५१८ पैकी ३५२ जागा जिंकून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या.

गुजरात राज्याच्या निवडणुकीतही १८२ पैकी १४० जागा जिंकत इंदिरा गांधी यांनी नेत्रदीपक यश संपादित केले.

The Activist

प्रचारक नरेंद्र मोदी

मात्र, कॉंग्रेस आणि इंदिरा गांधी यांची ही लाट ज्या वेगाने आली, त्याच वेगाने गेलीही. जलद सुधारणा आणि विकास करण्याचे सरकारचे गुजराती जनतेला दिलेले आश्वासन हवेतच विरून गेले. इंदुलाल, याज्ञिक जीवराज मेहता आणि बलवंतराय यांच्यासारख्या राजकीय नेत्यांचे कार्य नंतर लोभाच्या राजकारणात वाहून गेले.

१९६० च्या शेवटी आणि सत्तरच्या पहिल्या काही वर्षात गुजरातमधल्या कॉंग्रेस सरकारचा भ्रष्टाचार आणि प्रशासनातली अनागोंदी कारभार  अगदी शिगेला पोहचला होता. गरिबी हटाओ चा नारा पोकळ घोषणा झाला होता , उलट त्याचे रुपांतर आता गरीब हटाओ यातच झाले होते. गरीबांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली होती. त्यात दुष्काळ आणि दरवाढ यामुळे गुजरातच्या सर्वासामान्य गरीब जनतेचे हाल अतिशय वाईट होते. जीवनावश्यक गोष्टींसाठी रांगाच्या रांगा हे गुजरातमध्ये सगळीकडे दिसणारे चित्र होते. सर्वसामान्य माणसांच्या कष्टांना काही सीमा नव्हती.

नवनिर्माण चळवळ : युवाशक्ती

जनतेमध्ये असलेल्या अस्वस्थतेचे असंतोषात रुपांतर झाले. १९७३ च्या डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्याने गुजरातच्या मोरबी अभियांत्रिकी कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अशाच प्रकारची आंदोलने राज्यात ठिकठीकाणी सुरु झालीत. या आंदोलांनाला जनतेचा मोठा पाठींबा मिळू लागला.लवकरच ही आंदोलने चळवळ म्हणून राज्यभर पसरली, ही चळवळ नवनिर्माण चळवळ म्हणून ओळखली गेली.


समाजातील सर्व क्षेत्रात पसरलेल्या या जनचळवळीकडे नरेंद्र मोदी आकर्षित झाले. जेव्हा या चळवळीला जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने पाठींबा दिला, त्यामुळे ही चळवळ अधिकच सुदृढ झाली. जयप्रकाश नारायण अहमदाबाद इथे आले असता, खुद्द जेपींना भेटण्याची अनोखी संधी नरेंद्रना मिळाली. अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणांनी तरुण नरेंद्रच्या मनावर पक्का ठसा उमटवला.

The Activist

ऐतिहासिक नवनिर्माण चळवळ

शेवटी विद्यार्थी शक्तीचा विजय झाला आणि तत्कालीन कॉंग्रेस मुख्यमंत्र्याना राजीनामा द्यावा लागला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अधिकारवादाचे काळे ढग आकशात जमू लागले आणि २५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली.


आणीबाणीचे काळे दिवस.

आपल्या विरोधात गेलेल्या न्यायालयाच्या एका निर्णयामुळे निवडणूक निकाल रद्द होऊन पंतप्रधानपद गमवावे लागण्याची भीती वाटल्याने श्रीमती गांधींनी असा विचार केला की आणीबाणी घोषित करणे हाच एकमेव उपाय असू शकतो. हा लोकशाहीवर हल्ला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, विरोधी पक्षाचे आघाडीचे नेते श्री अटल बिहारी वाजपायी, श्री लाल कृष्ण अडवाणी, श्री जॉर्ज फर्नांडीस, मोरारजी देसाई यांना अटक झाली. .

The Activist

आणिबाणी दरम्यान नरेंद मोदी

नरेंद्र मोदी हे आणीबाणी विरोधी चळवळीच्या केंद्र स्थानी होते. ह्या जुलमाचा विरोध करण्यासठी स्थापन झालेल्या गुजरात लोक सत्याग्रह समितीचे ते सदस्य होते. ते पुढे त्या समितीचे महासचिव झाले. राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती. कॉंग्रेस विरोधी नेते आणि कार्यकर्त्यांवर असलेल्या कडक पाळत असल्याने हे अतिशय कठीण होतं.

आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्याबद्दल अनेक कथा आहेत. त्यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्याला कसे स्कूटरवरून सुरक्षित ठिकाणी नेले, ही त्यापैकीच एक कहाणी. त्याचप्रमाणे, एकदा एका नेत्याला अटक झाली, तेंव्हा त्यांच्याकडे काही महत्वाची कागदपत्रे होती. ती कागदपत्रे कुठल्याही परिस्थितीत परत मिळवणे गरजेचे होते. ज्या पोलीस ठाण्यात त्या नेत्याला ठेवले होते, तिथून पोलीस अधिकाऱ्यांसमोरून ती कागदपत्रे  आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींवर टाकण्यात आली. नानाजी देशमुखांना अटक झाली तेंव्हा त्यांच्याकडे संघ समर्थकांची यादी असलेली एक वही होती. नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला सुरक्षित ठिकाणी हलवले आणि त्यांची अटक टाळली.

नरेंद्र मोदींवर टाकण्यात आलेल्या ईतर जबाबदाऱ्या म्हणजे, आणीबाणी विरोधी कार्यकर्त्यांच्या गुजरात मधील प्रवासाची व्यवस्था करणे. ह्यासाठी त्यांना अनेकदा कुणी ओळखू नये म्हणून वेषांतर करून फिरावे लागे. ते कधी सरदारजी म्हणून फिरत तर कधी दाढीधारी वयस्क गृहस्थ म्हणून.

The Activist

आणीबाणी काळातील नरेंद्र मोदींची सर्वात संस्मरणीय आठवण म्हणजे अनेक पक्षांच्या विविध नेते आणि कार्यकर्त्यांसोबत काम करणे. जून २०१३ मध्ये आपल्या ब्लॉग वर नरेंद्र मोदींनी लिहिले:

 

आणीबाणीमुळे माझ्यासारख्या तरुणांना एकाच ध्येयासाठी झटणाऱ्या विविध संघटना आणि नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळवून दिली. आम्हाला आपापल्या संगठनांच्या बाहेर अनेक नेत्यांसोबत काम करण्याची संधी चालून आली. आमच्या परिवारातील अटलजी, अडवाणीजी, स्व नानाजी देशमुख यांसारखे दिग्गज तसेच श्री जॉर्ज फेर्नंडीस यांसारखे समाजवादी नेते आणि मोरारजी देसाईंचे जवळचे सहकारी रवींद्र वर्मांसारखे कॉंग्रेस नेते आणीबाणीवर नाराज होते. ह्या विविध नेत्यांपासून आम्हाला प्रेरणा मिळाली. गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री धुरुभाई देसाई, मानवतावादी श्री सी टी दारू आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री बाबुभाई जाशुभाई पटेल आणि श्री चिमणभाई पटेल आणि प्रमुख मुस्लीम नेते श्री हबीब उर रहमान यांसारख्या नेत्यांकडून मला शिकण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्याच होते. स्व श्री मोरारजीभाई देसाईंनी ज्या कणखरपणे कॉंग्रेसच्या हुकुमशाहीचा विरोध केला आणि प्रसंगी पक्ष सोडला ते मला अजून आठवते.


त्या दिवसांत समाजाच्या भल्यासाठी जणू काही धगधगत्या विचारसरणी एकत्र आल्या होत्या. आम्ही जात, समाज, धर्म यांच्या पलीकडे जाऊन लोकशाही मूल्य टिकवण्याच्या एकमेव ध्येयासाठी झटत होतो. डिसेंबर १९७५ मध्ये आम्ही गांधीनगर येथे विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांची बैठक घेण्याचे ठरवले. त्या बैठकीला अपक्ष खासदार श्री पुरुषोत्तम मालवणकर, श्री उमाशंकर जोशी आणि श्री क्रिशन कांत हे देखील उपस्थित होते.


राजकारणाच्या परिघाबाहेर नरेंद्र मोदींना समाजवादी संघटना आणि अनेक गांधीवादी कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. नानाजी देखमुख आणि जॉर्ज फर्नांडीस, ज्यांना ते ‘जॉर्ज साहब’ म्हणत असत, यांच्या भेटी ठळकपणे आठवतात. त्या दिवसातील आपले अनुभव ते लिहून ठेवत. ते पुढे ‘आपत्काल में गुजरात’ या नावाने पुस्तक रुपात आले.

आणीबाणीच्या पलीकडे

नवनिर्माण चळवळी प्रमाणेच, आणीबाणी नंतर जनतेचा विजय झाला. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीत श्रीमती इंदिरा गांधींचा सपशेल पराभव झाला. जनतेने बदलासाठी मतदान केले आणि जनता पार्टी सरकार मध्ये अटलजी, आडवाणीजी यांसारखे जन संघ नेते महत्वाचे मंत्री बनले.

The Activist

गुजरातच्या एका खेड्यात नरेंद्र मोदी.

गुजरातच्या कानाकोपऱ्यात सुरु असलेला त्यांचा प्रवास अखंड सुरु होता आणि १९८० च्या सुरुवातीला तो वाढला. ह्या प्रवासात त्यांनी गुजरातमधील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेड्याला भेट दिली. एक संघटक आणि मुख्यमंत्री म्हणून काम करताना ह्या प्रवासातील अनुभव त्यांच्या अतिशय उपयोगी पडला. यामुळे त्यांना जनतेच्या समस्यांविषयी थेट माहिती मिळाली आणि त्या समस्या सोडवण्यासाठी कठीण परिश्रम करण्याचा निश्चय अधिकच दृढ होत गेला. जेव्हा दुष्काळ, पूर आणि दंगल अशी परिस्थिती आली, तेव्हा त्यांनी मदतकार्यही भरपूर केले.

नरेंद्र मोदी आपल्या कामात अतिशय मग्न झाले होते आणि त्यात ते खुशही होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या आणि नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपामधल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची त्यांच्याकडून आणखी अपेक्षा होती. त्यांनी अधिक जबाबदारी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा होती, आणि त्यातूनच १९८७ साली नरेंद्र मोदीच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. तेव्हापासून जनतेमधल्या थेट कामासोबतच पक्षाची ध्येयधोरणे निश्चित करण्याच्या कामातही त्यांचा सहभाग वाढू लागला. त्याना पक्षनेत्यांसोबत काम करावे लागे आणि कार्यकर्त्यांसोबतही वेळ घालवावा लागे.

वडनगर इथला एक मुलगा, ज्याने लहान वयातच देशकार्य करण्यासाठी घरादाराचा त्याग केला. मात्र त्यांच्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी , त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी उचललेले एक पाऊल होते. कैलास मानसरोवरची यात्रा संपल्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भाजपाचे सरचिटणीस म्हणून काम करायला सुरुवात केली.

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Record Voter Turnout in Kashmir Signals Hope for ‘Modi 3.0’

Media Coverage

Record Voter Turnout in Kashmir Signals Hope for ‘Modi 3.0’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi’s endeavour to transform sports in India
May 09, 2024

Various initiatives including a record increase in India’s sports budget, Khelo India Games, and the Target Olympic Podium Scheme showcase the Modi government’s emphasis on transforming sports in India. PM Modi’s endeavour for hosting the ‘Youth Olympics’ and the ‘Olympics 2036’ in India showcases the pioneering transformation and vision for India’s sports in the last decade.

Anju Bobby George, Athlete hailed PM Modi’s support being unprecedented for sports and narrated how PM Modi met her and enquired about the issues concerning sports in India. She said that PM Modi deeply enquired about the various issues and sought to resolve these issues on a mission mode to transform sports in India.

Along with an intent to resolve issues, PM Modi always kept in touch with various athletes and tried to bring about a systemic change in the way sports were viewed in India. Moreover, India’s sporting transformation was also a result of the improved sporting infrastructure in the country.

“PM Modi is really interested in sports. He knows each athlete… their performance. Before any major championships, he is calling them personally and interacting with them… big send-offs he is organising and after coming back also we are celebrating each victory,” she remarked.

Every athlete, she added, was happy as the PM himself was taking keen interest in their careers, well-being and performance.