PM Modi, PM Bettel of Luxembourg exchange views on strengthening India-Luxembourg relationship in the post-COVID world
India-Luxembourg agree to strengthen cooperation on realizing effective multilateralism and combating global challenges like the Covid-19 pandemic, terrorism and climate change
Prime Minister welcomes Luxembourg’s announcement to join the International Solar Alliance (ISA)

महामहीम, नमस्कार !

सर्वप्रथम कोविड – 19 च्या महामारीमुळे लक्झेंबर्गमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल 130 कोटी भारतीय जनतेच्या वतीने मी शोक व्यक्त करतो. आणि या कठीण काळात तुमच्या कुशल नेतृत्त्वाचे मी अभिनंदन करतो.

 

महामहीम,

आजचे आपली ही व्हर्च्युइल (आभासी पद्धतीने झालेली) शिखर परिषद माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आणि मी विभिन्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भेटत आलो आहोत, मात्र गेल्या दोन दशकांमधील भारत आणि लक्झेंबर्ग दरम्यान ही पहिली औपचारिक शिखर परिषद आहे.

संपूर्ण जग  कोविड – 19 महामारीच्या आर्थिक आणि आरोग्य विषयक आव्हानांशी झुंजत असताना, भारत – लक्झेंबर्ग भागीदारी दोन्ही देशांच्या पुनर्निर्माणासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य यासारख्या सामायिक आदर्शांमुळे आपले संबंध आणि परस्पर सहकार्य मजबूत होते. भारत  आणि लक्झेंबर्ग दरम्यान आर्थिक आदानप्रदान वाढण्याची मोठी शक्यता आहे.

पोलाद, आर्थिक तंत्रज्ञान, डिजिटल  क्षेत्रात उभय देशांमध्ये  अजूनही चांगले सहकार्य असले तरी  ते आणखी वृद्धिंगत शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या अंतराळ संस्थेने लक्झेंबर्गच्या चार उपग्रहांना स्थापित केले याचा  मला आनंद आहे  अंतराळाच्या क्षेत्रात आपण परस्पर आदान प्रदान वाढवू शकतो.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी – आयएसएमध्ये सामील होण्याच्या लक्झेंबर्गच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो तसेच आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठीच्या  युतीमध्ये सामील होण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करतो.

यावर्षी एप्रिलमध्ये महामहीम ग्रँड ड्यूक यांची भारत भेट कोविड – 19 मुळे स्थगित करावी लागली होती. आम्ही लवकरच त्यांचे भारतात स्वागत करण्याची इच्छा व्यक्त करत आहोत. माझी इच्छा आहे की आपण देखील लवकरच भारत भेटीवर यावे.

 

महामहीम,

आता मी आपल्याला प्रारंभिक भाषणासाठी आमंत्रित करू इच्छित आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India receives $386 billion financial commitment from banks for green push

Media Coverage

India receives $386 billion financial commitment from banks for green push
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 सप्टेंबर 2024
September 16, 2024

100 Days of PM Modi 3.0: Delivery of Promises towards Viksit Bharat

Holistic Development across India – from Heritage to Modern Transportation – Decade of PM Modi