Releases a commemorative postage stamp celebrating 100 years of Hindustan Times
The power that has shaped India's destiny, shown direction to India, is the wisdom and capability of the common man of India: PM Modi
Progress of the people,Progress by the people,Progress for the people is our Mantra for New and Developed India:PM Modi
Today, India is filled with unprecedented aspirations and we have made these aspirations a cornerstone of our policies:PM Modi
Our government has provided citizens with a unique combination, of Employment through Investment, Dignity through Development:PM Modi
The approach of our government is Spend Big For The People,Save Big For The People:PM Modi
This century will be India's century:PM Modi

आपणा सर्वाना नमस्कार.

100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला  पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा  वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख  हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची   कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा  त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर  हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका  आणखी दिवसाचे  वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा  पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी  उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.

मित्रहो, 

हिंदुस्तान टाईम्सने आपल्या 100 वर्षांच्या कालखंडात गुलामीची 25 वर्षे तर  स्वातंत्र्याची  75 वर्षे  पाहिली आहेत. या 100 वर्षात भारताचे भाग्य घडवले आहे, भारताला मार्ग दाखवला आहे ती शक्ती म्हणजे भारताच्या सामान्य  जनतेचा विवेक, भारताच्या सामान्य  जनतेचे  सामर्थ्य. भारताच्या सर्वसामान्य नागरिकांचे हे सामर्थ्य ओळखण्यात मोठ-मोठे जाणकारही चुकले. इंग्रज जेव्हा देश सोडून निघाले तेव्हा हा देश छिन्नविछिन्न होईल,या  देशाला काही भविष्य उरणार नाही असे म्हटले जात होते. जेव्हा आणीबाणी लादली गेली तेव्हा काही लोकांनी मानले की आता तर आणीबाणी कायमचीच राहणार, आता लोकशाही गेली.काही लोकांनी, काही संस्थांनी आणीबाणी लादणाऱ्यांचाच आश्रय घेतला होता. मात्र तेव्हाही भारताचा नागरिक ठाम उभा राहिला आणि आणीबाणी झुगारण्यासाठी जास्त काळ लागला नव्हता. कोरोनाचा खडतर काळ आठवा, तेव्हा भारत एक मोठे ओझे ठरेल असे संपूर्ण जगाला वाटत होते.मात्र भारताच्या जनतेने कोरोनाविरोधात एक मजबूत लढा दिला.

 

मित्रहो,      

90 च्या दशकातला तो काळही आपल्याला स्मरत असेल जेव्हा भारतात 10 वर्षात 5 निवडणुका झाल्या होत्या. इतक्या विशाल देशात 10 वर्षात 5 निवडणुका, किती अस्थिरता होती.जाणकार, वर्तमानपत्रात लिखाण करणारे, या सर्वांनी, आता हिंदुस्तानमध्ये अशीच परिस्थिती राहणार, भारताला असेच चालवून घ्यावे लागणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र भारताच्या नागरिकांनी पुन्हा एकदा जाणकारांचा अंदाज चुकीचा ठरवला.आज जगभरात चहू बाजूला अनिश्चितता,अस्थैर्य याचीच चर्चा आहे आणि आणि ते दिसतही आहे. जगातले अनेक देश असे आहेत जिथे प्रत्येक निवडणुकीत सरकारे  बदलत आहेत, भारताच्या जनतेने मात्र आमच्या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.

मित्रहो,

आपल्यापैकी अनेकांनी दीर्घ काळ भारतामधले राजकारण आणि धोरण याचा मागोवा घेतला आहे. पूर्वी आपण हे अनेकदा ऐकत असू की ‘गुड इकॉनॉमीक्स  इज बॅड  पॉलिटीक्स’. तज्ञ मानले जाणारे लोक हे अतिशय मानत असत. यामुळे याआधीच्या सरकारांना काहीच न करण्यासाठी एक कारण मिळत असे. एक प्रकारे प्रशासनातली ढिलाई लपवण्यासाठी हे एक माध्यम बनले होते.केवळ पुढची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने पूर्वीची सरकारे चालवली जायची. निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने व्होट बँक बनवली जायची आणि या वर्गाला संतुष्ट करण्यासाठी योजना आखल्या जायच्या. अशा प्रकारच्या राजकारणाने देशाचे मोठे नुकसान झाले की देशामध्ये असमानता मोठ्या प्रमाणात वाढू लागली.विकास मंडळाची पाटी केवळ  नावापुरती लागली प्रत्यक्षात काही दिसत नव्हते. असंतुलित व्यवस्थेच्या या प्रारुपाने जनतेचा सरकारवरचा विश्वास उडाला होता. हा विश्वास आम्ही पुन्हा निर्माण केला आहे. आम्ही सरकारचा उद्देश निश्चित केला आहे. मतांसाठी  हे राजकारण  आहे ना त्यापासून आम्ही कोसो  मैल लांब आहोत. आमच्या सरकारचे लक्ष्य  विराट आहे, व्यापक आहे.आम्ही, जनतेची प्रगती, ... जनतेद्वारे प्रगती... जनतेसाठी प्रगती हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. नव भारत घडवण्याचे, विकसित भारत घडवण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि हे विशाल लक्ष्य घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली तेव्हा भारताच्या जनतेने आपला विश्वास आमच्याकडे सुपूर्द केला आहे.आपण कल्पना करू शकता, सोशल मिडियाच्या या काळात दिशाभूल करणारी माहिती, अपप्रचार चहुबाजूला बोकाळला आहे. 

एवढी अनेक वृत्तपत्रे आहेत , अनेक दूरचित्र वाहिन्या आहेत, अशा काळातही भारतातील नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे, आपल्या सरकारवर विश्वास आहे.

 

मित्रांनो,

जेव्हा जनतेचा विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो तेव्हा देशाच्या विकासावर वेगळाच परिणाम दिसून येतो.  तुम्हाला माहित आहे की, जुन्या विकसित  संस्कृतीं पासून  ते आजच्या विकसित देशांपर्यंत एक गोष्ट नेहमीच सामाईक…सारखी..‌समान राहिली आहे, ती समान बाब म्हणजे जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती.  एक काळ असा होता जेव्हा आपला देश संपूर्ण जगाच्या व्यापार - उदीमाचा आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू होता.  एकीकडे आपले व्यापारी आणि विक्रेते आग्नेय आशियामध्ये काम करत होते, तर दुसरीकडे त्यांचे अरबस्तान, आफ्रिका आणि रोमन साम्राज्याशीही घट्ट संबंध होते.  त्या काळातील लोकांनी जोखीम पत्करली आणि म्हणूनच भारताची उत्पादने आणि सेवा, समुद्राच्या पलीकडे पोहोचू शकल्या.  स्वातंत्र्यानंतर ही जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती आपल्याला आणखी पुढे न्यायची होती.  पण स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारांनी तत्कालीन नागरिकांना ते प्रोत्साहनच दिले नाही, त्याचा परिणाम असा झाला की अनेक पिढ्या एक पाऊल पुढे टाकण्यात आणि दोन पावले मागे जाण्यातच वाया गेल्या.  आता, गेल्या 10 वर्षात देशात झालेल्या बदलांमुळे भारतीय नागरिकांच्या जोखीम पत्करण्याच्या प्रवृत्तीमध्ये पुन्हा नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.  आज आपला युवावर्ग, प्रत्येक क्षेत्रात जोखीम पत्करणारे म्हणून उदयास येत आहेत.  एकेकाळी कंपनी सुरू करणे धोक्याचे मानले जात असे, 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपण कोणत्याही स्टार्टअपचे नाव ऐकले नव्हते… आज देशातील नोंदणीकृत स्टार्टअप- नवउद्योगांची संख्या 1.25 लाखांहून अधिक झाली आहे.  एक काळ असा होता की खेळात आणि खेळाला व्यवसाय म्हणून स्वीकारण्यात जोखीम असायची, मात्र आज आपल्या छोट्या शहरातील तरुणही ही जोखीम पत्करून देशाचं नाव जगात उंचावत आहेत.  तुम्ही बचतगटांशी संबंधित महिलांचेही उदाहरण घेऊ शकता, आज देशात सुमारे एक कोटी लाखपती दीदी तयार झाल्या आहेत.  प्रत्येक गावात उद्योजक बनून त्या स्वतःचे काही व्यवसाय चालवत आहेत.  काही दिवसांपूर्वी मला एका ग्रामीण महिलेशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्या महिलेने मला सांगितले की तिने कसा…... ट्रॅक्टर  खरेदी केला आणि तिच्या कमाईने संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न वाढवले.  एका महिलेने एक जोखीम  पत्करून तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्यच बदलून टाकले.  जेव्हा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जोखीम पत्करायला लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने बदल दिसून यायला लागतो. आज भारतात हेच घडताना दिसत आहे.

मित्रांनो,

आज भारतीय समाज अभूतपूर्व अशा महत्वाकांक्षांनी भारलेला आहे.  या महत्वाकांक्षांना आम्ही आमच्या धोरणांचा मुख्य आधार बनवला आहे.  आमच्या सरकारने देशवासीयांना एक अतिशय अनोखी जोड भेट दिली आहे... ही जोड, गुंतवणूक ते रोजगार, विकास ते प्रतिष्ठा अशी आहे.  आम्ही विकासाच्या अशा  नमुन्याचा पाठपुरावा करत आहोत जिथे गुंतवणूक असेल, गुंतवणुकीमुळे रोजगार निर्माण होईल, विकास होईल आणि तो विकास भारतातील नागरिकांची प्रतिष्ठा वाढवेल आणि प्रतिष्ठा पक्की करेल.  आता जसे देशात शौचालय उभारण्याचे उदाहरण समोर आहे.  मी छोट्या-छोट्या गोष्टी का सांगतोय…. कारण कधी-कधी आपल्याला वाटतं की त्यांना काही किंमत नाही…पण त्यांचं सामर्थ्य किती मोठं आहे हे मी सोदाहरण सांगू इच्छितो.  आपल्या देशात, आम्ही शौचालये बांधण्याचा वसा हाती घेतला, हे माध्यम देशातील मोठ्या लोकसंख्येसाठी सोयी बरोबरच सुरक्षा आणि आत्मसन्मानाचं साधन आहे.  जेव्हा या योजनेबद्दल बोललं जातं तेव्हा अनेकदा असं म्हटलं जातं की इतकी कोट्यवधी शौचालयं बांधली गेली… ठीक आहे.. बनली असतील! मात्र ही शौचालयं बांधण्यासाठी, विटा, लोखंड, सिमेंट लागलं आहे… अनेकांनी त्यासाठी काम केले आहे.  आणि हे सर्व सामान कुठल्यातरी दुकानातून आले आहे, कुठल्यातरी उद्योगाचे उत्पादन आहे.  कुठल्या ना कुठल्या वाहतूकदारानं, ते कुणाच्या तरी घरी पोहोचवले आहे.  याचा अर्थ असा की यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले आहेत.  जेव्हा शौचालये झाली, तेव्हा लोकांचे जीवन सुकर झाले.  लोकांमध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची भावना निर्माण झाली… आणि त्याचबरोबर विकासाला चालनाही मिळाली. म्हणजेच, गुंतवणूक ते रोजगार, विकास ते प्रतिष्ठा या मंत्राचे यश वास्तवात उतरलेले दिसत आहे.

मित्रांनो,

आणखी एक उदाहरण एलपीजी गॅस सिलेंडरचे आहे.  पूर्वी कुणाच्या घरी गॅस असला की शेजारच्या लोकांना तो कुणीतरी मोठा माणूस वाटायचा, प्रतिष्ठीत समजला जायचा…कारण त्यांच्याकडे गॅसची शेगडी आहे.  ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही त्यांनाही आपले अन्न गॅसच्या शेगडीवर  शिजवावे असं वाटायचं.  परिस्थिती अशी होती की गॅस जोडणीसाठी खासदार…संसद सदस्यांकडून शिफारस पत्र लिहून घेतली जायची…आणि मी 21व्या शतकाच्या सुरुवातीबद्दल बोलत आहे…  18 व्या शतकाबद्दल बोलत नाही.  2014 पूर्वी सरकार चर्चा करायचे आणि चर्चा कशावर व्हायची….तर,  वर्षभरात 6 सिलिंडर द्यायची की 9 सिलिंडर... यावर वाद व्हायचे. आम्ही,  किती सिलिंडर द्यायची यावर वाद घालत बसण्यापेक्षा, प्रत्येक घरात गॅस शेगडीची जोडणी पोहोचवण्यास  प्राधान्य दिले.  स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जितक्या गॅस जोडण्या दिल्या गेल्या त्यापेक्षा जास्त गॅस जोडण्या, गेल्या 10 वर्षात आम्ही दिल्या आहेत.  2014 मध्ये देशात 14 कोटी गॅस जोडण्या होत्या…, आज 30 कोटींहून जास्त आहेत.  10 वर्षात ग्राहक एवढे वाढले आहेत….पण गॅसचा तुटवडा असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?  नाही ऐकले… हिंदुस्तान टाईम्स मध्ये कधी छापून आलय असं... नाही आलं… कारण असं घडलेलच नाही तर छापून येईल कसं? तुटवडा निर्माण झाल्याचं कधी कानावर आलं नाही,  कारण आम्ही एक पायाभूत सुविधांचा आधार  तयार केला… त्यासाठी गुंतवणूक केली.  आम्ही ठिकठिकाणी बॉटलिंग प्लांट (सिलेंडर मध्ये गॅस भरणा केंद्र) आणि वितरण केंद्रे उभारली.  त्यामुळे बॉटलिंग(गॅस भरणा) पासून ते सिलिंडरच्या वितरणापर्यंत सर्वत्र रोजगार निर्माण झाला.

 

मित्रांनो,

मी तुम्हाला अशी कैक उदाहरणे देऊ शकतो.  मोबाईल फोनचे उदाहरण आहे... रुपे कार्डचे उदाहरण आहे... पूर्वी डेबिट-क्रेडिट कार्ड बाळगणे म्हणजे काहींना वेगळच अभिमानास्पद वाटायचं…ते अशा प्रकारे खिशातून काढायचे आणि लोक पहात राहायचे.  आणि गरीब माणूस तेच कार्ड बघायचा आणि विचार करायचा...माझ्याही खिशात असतं तर….  पण रुपे कार्ड आलं आणि आज माझ्या देशातील गरीबांच्या खिशातही क्रेडिट-डेबिट कार्ड आहेत, मित्रांनो! आता त्याच क्षणी त्याला इतरांच्या बरोबरीचे असल्यासारखे वाटतं… त्याचा स्वाभिमान.. आत्मसन्मान वाढतो.  आज अगदी गरीबातला गरीब माणूसही ऑनलाइन व्यवहार करतो.  मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये महागड्या गाडीतून उतरलेला कुणीतरी तेच UPI (ऑनलाईन आंतरराष्ट्रीय आर्थिक देव-घेव प्रणाली) वापरतो आणि माझ्या देशातील रस्त्यावरचा विक्रेता ही… एक सामान्य माणूसही तेच UPI वापरतो. हे सुद्धा….  गुंतवणूक ते रोजगार, विकास ते प्रतिष्ठा याचे एक उत्तम उदाहरण आहे.

मित्रांनो,

भारत आज ज्या वेगवान विकासाच्या मार्गावर निघाला आहे तो मार्ग समजून घेण्यासाठी आमच्या सरकारचा आणखी एक दृष्टीकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. हा दृष्टीकोन आहे- जनतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे, मात्र यासोबतच आणखी एक दृष्टीकोन देखील आहे, आणि तो म्हणजे- जनतेसाठी मोठ्या प्रमाणात बचत करणे. आम्ही हे कसे साध्य करत आहोत हे समजून घेणे कदाचित तुमच्यासाठी रंजक ठरेल. वर्ष 2014 मध्ये आपण सुमारे 16 लाख कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. आज हाच अर्थसंकल्प 48 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. 2013-14 मध्ये आपण भांडवली व्ययासाठी सुमारे सव्वा दोन लाख कोटी रुपये खर्च करत होतो. मात्र आज आपला भांडवली व्यय 11 लाख कोटींहून अधिक आहे. आम्ही हे 11 लाख कोटी रुपये आज नवी रुग्णालये, नव्या शाळा, रस्ते, रेल्वे, संशोधन सुविधा अशा अनेक सार्वजनिक पायाभूत सुविधांवर खर्च करत आहोत.जनतेसाठी अधिक खर्च करण्यासोबतच आम्ही जनतेच्या पैशांची बचत देखील करत आहोत. मी तुमच्यासमोर काही आकडेवारी मांडतो आणि माझी खात्री आहे की ती ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, अच्छा, असं देखील होऊ शकतं.

उदाहरणार्थ, थेट लाभ हस्तांतरण, डीबीटी... या डीबीटी मुळे जी पैशांची गळती थांबली आहे, त्यामुळे देशाचे साडे तीन लाख कोटी रुपये वाचले आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत उपचारांमुळे गरिबांचे 1 लाख 10 हजार कोटी रुपये वाचले आहेत. जनौषधी केंद्रांमध्ये औषधे 80% सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे नागरीकांचे 30 हजार कोटी रुपये वाचले आहेत. स्टेंट आणि गुडघा प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती नियंत्रणात आणल्यामुळे लोकांचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत. उजाला योजनेतून लोकांनी एलईडी बल्बचा वापर सुरु केल्यामुळे त्यांच्या वीजबिलात 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे आजार होण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्यायोगे गावांतील प्रत्येक कुटुंबाचे किमान 50 हजार रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, ज्या कुटुंबांकडे स्वतःची शौचालये आहेत त्यांची देखील सुमारे 70 हजार रुपयांची बचत होत आहे.

मित्रांनो,

देशातील ज्या 12 कोटी लोकांच्या घरात पहिल्यांदाच नळाने पाणीपुरवठा सुरु झाला आहे त्यांच्या संदर्भात देखील जागतिक आरोग्य संघटनेने एक अभ्यास अहवाल जारी केला. स्वच्छ पाणी मिळाल्यामुळे आता अशा कुटुंबांच्या खर्चात दर वर्षी 80 हजार रुपयांहून अधिक बचत होऊ लागली आहे.

 

मित्रांनो,

दहा वर्षांपूर्वी कोणीच हा विचार केला नव्हता की, भारतात इतका मोठा बदल घडून येईल. भारताने करून दाखवलेल्या यशस्वी कामगिरीमुळे आम्हांला आणखी भव्य स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आहे.आज सर्वत्र एक आशा, एक विचार व्यक्त होत आहे, की हे शतक भारताचे शतक असेल. मात्र असे घडून येण्यासाठी, आणखी वेगाने काम करण्यासाठी आपल्याला अनेकानेक प्रयत्न देखील करावे लागतील. आम्ही त्या दिशेने देखील जलदगतीने काम करत आहोत.प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. संपूर्ण समाजाचीच अशी मानसिकता तयार करावी लागेल की आपल्याला सर्वोत्कृष्ट पेक्षा खालच्या पातळीवरील काहीच स्वीकारार्ह नाही. भारताचा मापदंड जागतिक दर्जाचा म्हणवला जाईल अशा प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला तयार कराव्या लागतील.आपल्याला अशा उत्पादनांची निर्मिती करावी लागेल की, भारतात उत्पादित वस्तू जागतिक दर्जाच्या म्हणवल्या जातील. बांधकाम क्षेत्रात आपले कार्य असे असले पाहिजे की, भारतातील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या म्हणवल्या जातील. शिक्षण क्षेत्रात आपण असे कार्य उभारायला हवे ज्यामुळे भारतातील शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होईल. मनोरंजन क्षेत्रात असे काम व्हावे की देशात निर्मित चित्रपट तसेच चित्रपटगृहांना दुनियेत जागतिक दर्जाचा मान मिळेल. आणि या उद्देशाला, या दृष्टीकोनाला सतत सामान्य लोकांच्या डोळ्यांसमोर ठेवण्यात हिंदुस्तान टाईम्स फार मोठी भूमिका निभावत आहे. तुमचा 100 वर्षांचा अनुभव विकसित भारताच्या प्रवासात अत्यंत उपयुक्त ठरेल.

मित्रांनो,

विकासाचा हा वेग आपण कायम राखू असा विश्वास मला वाटतो. आता लवकरच आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. आणि भारत जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असेल, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला ज्र्व्हा 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा हिंदुस्तान टाईम्स समूह देखील सुमारे सव्वाशे वर्षांचा झालेला असेल. आणि त्या  घडीला हिंदुस्तान टाईम्स स्वतःच्या वर्तमानपत्रात लिहित असेल की विकसित भारताचे हे दिमाखदार वर्तमानपत्र आहे. तुम्ही सर्वजण देखील या प्रवासाचे साक्षीदार व्हाल. पण आता मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे तर तुम्हाला काही काम सोपवू इच्छितो आणि भरतीयाजी ही तुमची जबाबदारी असेल.

असं बघा, आपल्याकडे मोठमोठ्या साहित्यिकांच्या कलाकृतींवर डॉक्टरेट केली जाते. विविध संशोधनांवर डॉक्टरेट केली जाते. शशी जी, कोणी हिंदुस्तान टाइम्सच्या 100 वर्षांच्या प्रवासावर डॉक्टरेट करावी. ही फार मोठी सेवा असेल. यासाठी जे संशोधन होईल त्यातून आपल्या देशातील पत्रकारितेच्या प्रवासाचे दर्शन घडेल. या वर्तमानपत्राने दोन्ही कालखंड पाहिले आहेत, गुलामीचा देखील आणि स्वातंत्र्याचा देखील. स्वातंत्र्याच्या अभावाचे देखील दिवस बघितलेत आणि स्वातंत्र्याच्या प्रभावाचा काळ देखील बघितला आहे. मला वाटते की या संदर्भातील संशोधन ही फार मोठी सेवा असेल. बिर्ला कुटुंब तर पूर्वीपासूनच दानधर्मावर विश्वास असलेले कुटुंब आहे. भारतातील आणि भारताबाहेरील विद्यापीठांमध्ये देखील हिंदुस्तान टाईम्सचा विभाग असेल, जो भारताला वैश्विक संदर्भात स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी संशोधनाचे काम करेल असे घडू शकेल का? इतकी वर्ष एखाद्या वर्तमानपत्राचा कारभार चालवणे हे एक फार मोठे कार्य आहे आणि ते तुम्ही करून दाखवले आहे. गेल्या 100 वर्षांच्या काळात तुम्ही जो मान कमावलात, जो विश्वास कमावलात तो येणाऱ्या पिढ्यांना हिंदुस्तान टाईम्सच्या परिघाबाहेर देखील उपयोगी पडू शकेल. आणि माझा ठाम विश्वास आहे की तुम्ही या 100 वर्षांच्या कार्यक्रमापर्यंत मर्यादित राहणार नाही, या कार्याला पुढे घेऊन जाल. मी येथे जे प्रदर्शन पाहिले ते खरोखरीच प्रभावित करणारे होते. त्याचे डिजिटल व्हर्जन आणि त्यासोबत एक उत्तम समालोचन असा संच आपल्या देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकता का? यातून त्या सर्वांना भारतातील हे क्षेत्र कसे असते, भारताच्या विकासाच्या प्रवासात कोणते चढ-उतार आले आहेत, भारताने कोणकोणत्या परिस्थितीला तोंड दिले आहे, हे समजून घेता येईल, आणि हे त्यांना समजणे गरजेचे आहे. मला असे वाटते की तुम्ही इतकी मेहनत तर आधीच केली आहे, तर याचे डिजिटल व्हर्जन तयार करून देशातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवू शकता आणि हे व्हर्जन मुलांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र बनेल.

 

मित्रांनो,

शंभर वर्षे हा मोठा कालखंड आहे. मी सध्या थोड्या वेगळ्या कामांमध्ये जास्त गुंतलेलो आहे. मात्र ही अशी संधी होती जी मी दवडू इच्छित नव्हतो. मला स्वतःलाच येथे येण्याची इच्छा होती. कारण, 100 वर्षांचा प्रवास ही खूप मोठी कामगिरी असते. आणि त्यासाठी मी तुमचे, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.

धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy

Media Coverage

New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The world is seeing India as a bright spot of growth and hope: PM Modi at Economic Times World Leaders Forum 2026
August 21, 2026
The world sees India as a bright spot for growth and hope: PM
Today, India is implementing next-generation reforms at the policy level and undertaking reforms at governance level: PM
Increasing production was met with punishment earlier but today, our government is providing incentives for boosting production
India has political stability and continuity in its policies: PM
Earlier, the approach of regulations was, 'prohibited unless permitted’; We are changing this approach and taking it towards 'permitted unless prohibited’: PM
The relationship between the government and citizens should be based on trust, not suspicion: PM
Today, we are shaping policies that are pro-people, pro-growth and pro-development: PM

World Leaders Forum का ये प्रतिष्ठित मंच, Business और Industry की दुनिया के सभी जाने माने दिग्गज, पॉलिसी मेकर्स, अन्य महानुभाव, देवियों और सज्जनों।

आप सबके बीच आकर के खुश होना बहुत स्वाभाविक भी है। इस साल समिट का फोकस Shared Future पर है। पिछले कुछ वर्षों में दुनिया ने अनेक उतार-चढ़ाव देखे हैं। और इन अनुभवों ने एक बात बहुत स्पष्ट कर दी है, कोई चाहे या ना चाहे, हर देश का भविष्य, उसका फ्यूचर, एक-दूसरे से जुड़ा हुआ ही है, Isolation में कुछ संभव नहीं है। इसीलिए Shared Futures की ये theme, आज और भी अधिक प्रासंगिक हो गई है। और भारत तो हमेशा से इसी भावना को लेकर चला है। जी-20 की अध्यक्षता में इसलिए ही भारत का मंत्र रहा, One Earth, One Family, One Future. Shared Future की ये भावना और इसके साथ जुड़ा दायित्वबोध, 21वीं सदी के इस विश्व की अनेक समस्याओं का समाधान देता है।

साथियों,

आज दुनिया में growth को लेकर के कई तरह की चिंताएं हैं। दुनिया ने बड़ा भयंकर एक रूप देखा है इन दिनों। Resources का वेपनाइजेशन हो रहा है। अविश्वास का वातावरण विश्व के लिए अनेक नई चुनौतियां लेकर के आ रहा है। लेकिन ऐसे समय में भी, दुनिया भारत को growth और hope के bright spot के रूप में देख रही है। भारत ने पिछले 10-12 साल में अपनी 25 करोड़ आबादी को गरीबी से बाहर निकाला है। इतना ही नहीं, अगर आने वाले दिनों की चर्चा करें, तो IMF का forecast है कि भारत दुनिया की fastest growing major economy बना रहेगा। और भारत निरंतर वो कदम उठा रहा है, जो उसके विकास को गति दे रहे हैं।

Friends,

अभी पिछले हफ्ते ही, 15 अगस्त को मैंने लाल किले से सप्त-धारा की सप्त-शक्तियों की बात की है। मैन्यूफैक्चरिंग, टेक्नोलॉजी और इनोवेशन, फूड प्रोसेसिंग, ग्रीन और ब्लू इकोनॉमी समेत, मैंने ऐसे सात सेक्टर्स की बात की है, जिन पर भारत का आज बहुत ज्यादा फोकस है। और इसलिए भारत आज, Policy level पर, नेक्स्ट जनरेशन reforms कर रहा है, ताकि हमारा future सुरक्षित हो। Governance पर reforms कर रहा है, Ease of Living के लिए reforms कर रहा है। पिछली बार जब मैं इसी मंच के माध्यम से आपसे जुड़ा था, तब भी मैंने कहा था, ये Reforms हमारे लिए Compulsion नहीं है। ये हमारा commitment है, ये हमारा conviction है।

साथियों,

2014 में, जब हमारी सरकार बनी, तो उसके बाद से ही रिफॉर्म्स ने कैसे देश की दिशा और दशा बदली है, मैं इसका एक बहुत दिलचस्प उदाहरण आपको देना चाहता हूं। यहां मौजूद शायद ही किसी को PLP के बारे में पता होगा, कोई है, जिसको PLP के बारे में पता है? अपना हाथ उठाएं। यहां इतने मीडिया के दिग्गज बैठे हैं, PLP आपको पता है? और आप सुनकर के हैरान हो जाएंगे। PLP यानी प्रोडक्शन लिंक्ड पनिशमेंट, इसके बारे में किसी को पता नहीं है। और एक दूसरा टर्म आपने जरूर सुना है PLI, ये ज्यादातर लोगों को पता होगा। PLI- यानी प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव।

साथियों,

ये दोनों टर्म, भारत के दो अलग-अलग Time Period को डिफाइन करते हैं। आजकल Explainer का जमाना है, तो मैं आपको Explain करता हूं।

साथियों,

आज की युवा पीढ़ी को ये सुनकर हैरानी होगी, कि हमारे देश में एक समय ऐसा भी था, कि अगर कोई कंपनी तय लिमिट से ज्यादा प्रॉडक्शन कर दे, तो उसे पनिशमेंट दिया जाता था। ये पहले की लाइसेंस राज वाली सरकारों का, PLP यानी प्रोडक्शन लिंक्ड पनिशमेंट मॉडल था। ऐसे भी उदाहरण रहे हैं कि अगर किसी फैक्ट्री ने ज्यादा डिमांड देखते हुए ज्यादा प्रॉडक्शन कर दिया, तो उसे नोटिस भेज दिया जाता था। मजबूरी में वो कंपनी अपना प्रॉडक्ट मार्केट में बेचने के बजाय, उसे खुद ही नष्ट कर देती थी।

साथियों,

आज जो लोग Make In India और आत्मनिर्भर भारत अभियान का मजाक उड़ाते हैं, उनके पुरखों की सोच यही थी, PLP यानी प्रोडक्शन लिंक्ड पनिशमेंट। ऐसा करने के पीछे एक विशेष तरह की विकृत मानसिकता काम करती थी। ऐसी मानसिकता वाले लोग हमेशा चाहते थे कि जरूरी चीजों की किल्लत बनी रहे। देश के नागरिकों को अभाव में रखना उनकी पॉलिसी थी। वो चाहते थे कि जनता उनके सामने हाथ जोड़े, हाथ फैलाए, आप समझ गए मैं किन लोगों की बात कर रहा हूं। लोगों से हाथ जुड़वाने के बाद उपकार करना, उन सरकारों का तरीका था, इसलिए वो प्रोडक्शन लिंक्ड पनिशमेंट मॉडल पर चलते थे। आप कल्पना कर सकते हैं, ऐसे करके उन लोगों ने Employment Generation के बेसिक principal का गला घोंट दिया था। और हैरानी ये, इन लोगों के दरबारियों ने again I repeat, इन लोगों के दरबारियों ने, कभी इसके खिलाफ कोई आवाज नहीं उठाई।

साथियों,

हर reform की शुरुआत सबसे पहले, आपके सोचने के तरीके, आपके मानसिक, किस रेंज में आप काम कर रहे हैं, इस सोच के reform से ही होती है। जहां पहले production बढ़ाने पर पनिशमेंट मिलता था, वहीं आज हमारी सरकार production बढ़ाने पर incentive दे रही है। और आज PLI स्कीम की सक्सेस दुनिया देख रही है। सिर्फ इस एक योजना की वजह से, मैं सारी योजनाओं की बात नहीं करता हूं, एक की बात करता हूं, करीब ढाई लाख करोड़ रुपए का actual investment हुआ है। 22 लाख करोड़ रुपए से ज्यादा का production और sales हुई है। 15 लाख करोड़ रुपए से ज्यादा का exports हुआ है, और 14 लाख से ज्यादा direct और indirect jobs बनी हैं। और मैं फिर याद दिलाउंगा, ये आंकड़े सिर्फ एक स्कीम के हैं। आप सोचिए, पहले का लाइसेंस राज वाली सरकार का पनिशमेंट मॉडल जहां बेरोजगारी बढ़ाता था, वहीं आज का हमारा incentive मॉडल लाखों नई जॉब्स क्रिएट कर रहा है।

साथियों,

आज भारत में ये तेज विकास, ये तेज रिफॉर्म इसलिए हो रहे हैं, क्योंकि भारत में और जिसका अभी सत्य ने उल्लेख किया, political stability है, हमारी policy में continuity है। पहले देश में रिफॉर्म्स की बात करने वाले घोषणा तो कर देते थे, बाद में भूल जाते थे। लेकिन हमने रिफॉर्म्स को लेकर एक क्लियर रोडमैप बनाया। इस रोडमैप की प्रमुख दिशा रही है- गवर्नेंस लेवेल के रिफॉर्म्स हों! इसके लिए, आज 21वीं सदी के भारत में, हम सिर्फ regulations नहीं बदल रहे हैं, हम regulation की पूरी philosophy बदल रहे हैं। पहले regulations की अप्रोच थी- “Prohibited unless permitted.” यानी जब तक सरकार इजाजत ना दे, तब तक आप वो काम नहीं कर सकते। हम इस approach को बदलकर, “Permitted unless prohibited” की तरफ ले जा रहे हैं। यानी, जो काम कानून ने स्पष्ट रूप से मना नहीं किया है, उसके लिए हर कदम पर permission की कोई जरूरत नहीं होनी चाहिए। और इसके पीछे सोच बहुत सीधी है, सरकार और नागरिक के रिश्ते का आधार, Suspicion नहीं, trust होना चाहिए।

साथियों,

यही सोच आपको Jan Vishwas बिल में भी दिखाई देती है। मैं मानता हूं, हर procedural गलती को criminal offence मान लेना ठीक नहीं है। इसीलिए अनेक offences को decriminalise किया गया है। कई मामलों में जेल की जगह केवल आर्थिक penalty का प्रावधान किया गया है। Government और enterprise के रिश्ते में, हम इसी reform mindset को आगे बढ़ा रहे हैं। बीते वर्षों में 40 हजार से ज्यादा compliances हटाए गए हैं, 40 thousand. डेढ़ हजार से ज्यादा, 15 hundred, डेढ़ हजार से ज्यादा, पुराने और बेकार हो चुके कानून हमने खत्म किए, और जब इन सारे reforms को एक साथ देखते हैं, तो अंदाजा होता है, हमारी industries और businesses के कंधों से कितना बड़ा बोझ कम हुआ है।

साथियों,

गवर्नेंस रिफॉर्म्स की इस प्रक्रिया, उस पर हम निरंतर काम कर रहे है। अभी संसद के मॉनसून सत्र में हमने ‘बैंकर्स बुक एविडेंस बिल’ पारित किया है। और वो भी तब जब विपक्ष ने संसद में लगातार गतिरोध बनाया हुआ था। हमने देश की सेवा करने का काम रूकने नहीं दिया। अब इस कानून ने 19वीं सदी के अंग्रेजी कानून को रिप्लेस किया है। अब बैंकों के डिजिटल रिकॉर्ड्स की स्वीकार्यता को कानूनी मान्यता दी गई है। इससे कानूनी उलझनें कम होंगी, सिस्टम में पारदर्शिता होगी, Ease of Doing Business बढ़ेगा।

साथियों,

गवर्नेंस में रिफॉर्म का एक मतलब ये भी है कि सिस्टम ऐसे बनें, जिसमें एक-एक मानव जीवन और उसके समय के प्रति संवेदनशीलता हो। मैं रेलवे का उदाहरण देता हूं। हमारी रेलवेज में भी इसी अप्रोच के साथ काम हुआ है। आज साढ़े 6 हजार से ज्यादा रेलवे स्टेशनों पर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग की व्यवस्था है। 10 हजार से ज्यादा लेवल क्रॉसिंग गेट्स को भी इंटरलॉकिंग से जोड़ा जा चुका है। इससे ह्यूमन एरर से होने वाले हादसों की आशंका बहुत कम हुई है।

साथियों,

जब 2014 में हमारी सरकार आई, तो करीब 9 हजार फाटक ऐसे थे जो Un-Manned थे। इन्हें हटाना कोई रॉकेट साइंस नहीं था। Un-Manned क्रॉसिंग्स की वजह से हजारों लोगों को अपनी जान गंवानी पड़ी, लेकिन पहले की सरकारों को इससे बहुत फर्क नहीं पड़ता था। हमने मिशन मोड में, गत दस वर्ष में, इन Un-Manned क्रॉसिंग्स को समाप्त कर दिया। हमने रोड ओवर ब्रिज और रोड अंडर ब्रिज बनाने की गति भी कई गुना बढ़ा दी। और इसी का नतीजा है कि 2014 के पहले के मुकाबले ट्रेन दुर्घटनाओं की संख्या में Ninety Percent तक की कमी आई है, 90, Ninety Percent. 12 साल पहले जहां एक साल में करीब डेढ़ सौ रेल दुर्घटनाएं होती थीं, वहीं अब इनकी संख्या घटकर 15-20 रह गई है। और हम इसे और कम से कम करने का प्रयास लगातार कर रहे हैं।

साथियों,

Railways में स्वच्छता भी गवर्नेंस रिफॉर्म का एक बड़ा उदाहरण है। एक समय था, जब रेल पटरियों पर गंदगी और human waste एक बड़ी समस्या हुआ करती थी। आज स्थिति पूरी तरह बदल गई है। 2014 से पहले हमारी ट्रेनों में जहां लगभग 12 हजार बायो-टॉयलेट्स लगाए गए थे, वहीं 2014 के बाद ट्रेनों में 3 लाख 60 हजार से ज्यादा बायो-टॉयलेट्स लगाए गए हैं। यानी, 97 प्रतिशत से ज्यादा बायो-टॉयलेट्स पिछले 12 वर्षों में लगे हैं। ये बदलाव सिर्फ सफाई का नहीं, यात्रियों की गरिमा, स्वच्छता और आधुनिक भारत के निर्माण की दिशा में गवर्नेंस का एक नया मॉडल है। ये करोड़ों यात्रियों को बेहतर अनुभव देने का अभियान भी है।

साथियों,

गवर्नेंस की क्वालिटी का एक और पैमाना, और वो पैमाना है - समय। जो प्रोजेक्ट शुरू हो, वो समय पर पूरा हो। और जो सर्विस लोगों को मिले, वो भी समय की कसौटी पर खरी उतरे। दिल्ली-मेरठ नमो भारत रैपिड रेल सिस्टम इसका बहुत अच्छा उदाहरण है। इस कॉरिडोर पर 160 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से ट्रेनें चल रही हैं। ये हमारे देश में पहले कभी सोचा नहीं जा सकता था। अब तक 4 करोड़ से ज्यादा यात्री इसमें ट्रैवल कर चुके हैं। और इसका एक और अहम फैक्टर है, जिसकी चर्चा नहीं होती है। दिल्ली मेरठ नमो भारत रैपिड रेल की पंक्चुअलिटी 99.9 परसेंट है। वरना हम तो हर चीज में कहते हैं, लेट हो तो कहते थे, ये तो इंडियन टाइम है। वक्त बदला है, ये मैं छोटी-छोटी चीजें इसलिए बताता हूं, कि हमें अंदाज आए कि कितने बड़े व्यापक स्तर पर काम हो रहा है। इसी तरह, Delhi Metro की पंक्चुअलिटी। Delhi Metro की पंक्चुअलिटी 99.9 परसेंट है। और ये punctuality, New York, Hong Kong और Paris जैसे शहरों की Metro से करीब-करीब बराबर हो चुकी है। ये सिर्फ समय पर चलती हुई Metro और नमो रेपिड रेल की कहानी नहीं है, ये समय के साथ बदलते हुए भारत की पहचान है। मैं जानता हूं कि अभी भी, और र्मैं कोई इतने से संतोष मानकर बैठने वाला व्यक्ति नहीं हूं, अभी भी इस दिशा में हमें बहुत कुछ करना है, बहुत कुछ बाकी है, लेकिन हम लगातार कर रहे हैं। लेकिन एक शुरूआत तो हुई है और ये शुरुआत सराहनीय है।

साथियों,

हमारे रिफॉर्म्स रोडमैप का एक और बड़ा आयाम है- पॉलिसी लेवल पर होने वाले रिफॉर्म्स! आज हम ऐसी policies बना रहे हैं, जो pro-people हों, Pro-growth हों, pro development हों! पॉलिसीज़ देश और देश के लोगों की जरूरत के हिसाब से होनी चाहिए न कि पॉलिसीज़ बनाकर देश को उनके हिसाब से चलने को मजबूर होना पड़े! मैं आपको एक और Interesting उदाहरण देना चाहता हूं। कुछ साल पहले तक हमारे यहाँ देश का नक्शा बनाना भी गैर-कानूनी था, मैप बनाए तो गैर कानूनी था, आप जेल चले जाएंगे। बिना परमिशन के आप देश में मैपिंग का काम भी नहीं कर सकते थे। आप सोचिए, विदेशी सैटेलाइट टेक्नोलॉजी के जरिए भारत के किसी भी कोने को मैप कर सकती थी, लेकिन भारत में भारतीयों पर भारत का मैप बनाने पर पाबंदी लगी हुई थी।

साथियों,

आज टेक्नोलॉजी के इस दौर में, इस एक पाबंदी से कितने स्टार्टअप्स की हत्या हो सकती थी! कितने ideas implement होने से वंचित रह सकते थे! हमने इस व्यवस्था को भी बदला। हमने Geospatial डेटा का Deregulation किया और आज Geospatial डेटा कितने ही स्टार्टअप्स का आधार बन रहा है।

साथियों,

आज आप लगातार ड्रोन्स की उपयोगिता बढ़ते हुए देख रहे हैं। एग्रीकल्चर में, डिफेंस में, डिलिवरी में, शूटिंग में, कंटेंट क्रिएशन में, ये सब संभव ही नहीं होता, अगर सरकार ने इससे जुड़े नियमों में Reform नहीं किए होते। पहले देश में ड्रोन फ्लाइंग पूरी तरह नियमों में, बंधनों में जकड़ी हुई थी। हमने उसे बंधनों से आजाद किया, और आज भारत की ड्रोन इंडस्ट्री, एक अभूतपूर्व उड़ान के साथ आगे बढ़ रही है।

साथियों,

पहले border areas को लेकर सरकारों की सोच थी कि बॉर्डर पर roads और infrastructure बढ़ेगा, तो उसका फायदा दुश्मन भी उठा सकता है। हमने इस सोच को बदला। हमने कहा, Border infrastructure कमजोरी नहीं, देश की ताकत है। और इसीलिए आज border areas में roads, bridges और tunnels का network तेजी से बढ़ रहा है। सिर्फ 2024 और 2025 में ही, BRO के 250 infrastructure projects देश को समर्पित किए गए हैं। सोच बदली, तो border infrastructure की तस्वीर भी बदल गई।

साथियों,

एक उदाहरण न्यूक्लियर रिफॉर्म्स का भी है। एक ऐसे समय में, जब विकास पूरी तरह से energy dependent है, बंदिशों और प्रतिबंधों के कारण, देश अपने न्यूक्लियर potential का इस्तेमाल नहीं कर पा रहा था। हमने शांति बिल के जरिए इसमें भी बड़ा रिफॉर्म किया है। आज भारत में न्यूक्लियर एनर्जी में प्राइवेट सेक्टर के लिए रास्ता खुल चुका है। इसी तरह, हमने एक बड़ा पॉलिसी रिफॉर्म डिफेंस सेक्टर में भी किया। 200 साल के पहले जो व्यवस्था चली आ रही थी, उसे बदलकर हमने 40 से ज्यादा ordnance फैक्ट्रीज़ को मर्ज करके 7 फैक्ट्रीज़ बना दी। और उसका परिणाम हमें देखने को मिल रहा है। आज भारत अपनी रक्षा जरूरतों के लिए भी आत्मनिर्भर बन रहा है, और 2014 की तुलना में, हमारा डिफेंस एक्सपोर्ट 55 गुना बढ़ा है। और इसलिए, कई बार रिफॉर्म्स हमारे जीवन में इस तरह घुल-मिल जाते हैं कि हमारा उनकी तरफ ध्यान ही नहीं जाता। आप सोचिए, आपका कोई सामान्य दिन आज कैसे बीतता है। आप सुबह उठते हैं, फोन पर घर का सामान ऑर्डर कर देते हैं, और जब तक ऑफिस के लिए रेडी होते हैं, वो सारा सामान आपके घर आकर के पहुंच जाता है। आपकी गली के स्ट्रीट वेंडर से लेकर, आपकी गाड़ी के शो रूम तक, आपकी सारी पेमेंट्स, सिर्फ एक क्यूआर कोड स्कैन करके हो जाती है। अगर आपकी बेटी, किसी दूसरे शहर में पढ़ती है, तो आप फोन से उसे पैसे भेज सकते हैं, और वो पैसा, कुछ सेकंड्स में उसके पास भी पहुंच जाता है। कई बार तो बिटिया क्यूआर ही शेयर कर देती है कि ‘पापा-मां मैंने ये ड्रेस ले ली है, इसकी पेमेंट कर दीजिए, और आप उसकी शॉपिंग अपने घर बैठे-बैठे करवा देते हैं। ये चीजें Remarkable हैं, लेकिन अब ये कोई भारत के लोगों को कम से कम हैरानी नहीं होती, बाहर के लोग आते हैं, उनको आश्चर्य होता है, अच्छा ऐसे होता है। भारत के लोगों का रूटीन हो गया है। ये भारत के सामान्य मानवी के जीवन का हिस्सा बन चुका है। आप सोचिए, 2014 से पहले ऐसी कितनी ही बातें क्या पॉसिबल थीं?

साथियों,

भारत ने बीते 10-12 सालों में Ease of Living से जुड़े जो रिफॉर्म्स किए हैं, उसकी वजह से लोगों का, खासतौर पर हमारे मिडिल क्लास का जो जीवन बदला है, वो दुनिया के कई विकसित देशों में आज भी एक सपना ही है।

साथियों,

आज दुनिया का सबसे सस्ता डेटा भारत में है, हम सस्ते और अच्छे स्मार्टफोन्स बना रहे हैं। अभी सत्या ने उसका वर्णन किया। भारत दुनिया के fastest 5G rollouts करने वाले देशों में से एक है। हमने आधार को बैंकिंग, मोबाइल कनेक्टिविटी और सर्विसेज से जोड़कर, ई-के.वाई.सी और Digital Authentication जैसी सर्विसेज को पॉसिबल किया है। आज आपको अगर बैंक अकाउंट खोलना है, तो उसके लिए बैंक जाने तक की जरूरत नहीं है। सरकार ने बैंक को ही, आपके पास पहुंचा दिया है। आज चाहे कोई बिल जमा करना हो, कोई टिकट करानी हो, किसी सरकारी दफ्तर में जाने की जरूरत नहीं पड़ती, ये सारा काम ऑनलाइन हो जाता है। इनकम टैक्स की फाइलिंग का काम आसान हुआ है। ऐसी व्यवस्था बनी है कि फॉर्म में मैक्सिमम जानकारियां पहले से भरी होती हैं। आप ये इन्फॉर्मेशन वेरिफाई करते हैं, कुछ जोड़ना है तो जोड़ देते हैं, और सबमिट करते हैं, आपका काम पूरा हो जाता है। पहले जो रिफंड आने में महीनों लगते थे, अब वो भी कुछ ही दिनों में आ जाता है।

साथियों,

आज ई-संजीवनी की मदद से, शायद इसकी चर्चा अभी बहुत कम होती है, ई-संजीवनी की मदद से, गांव के दूर दराज के लोग भी, कहीं से भी डॉक्टर्स के साथ सीधी अपनी चर्चा करके अपने उपचार का रास्ता लेते हैं। और इससे जिन लोगों को अस्पताल जाने के लिए कई किलोमीटर का सफर करना पड़ता था, आज डॉक्टर उनके घर पर, उनकी स्क्रीन पर उपलब्ध है। अब तक ये आंकड़ा भी आपको जरूर आश्चर्य करेगा। यानी भारत ने टेक्नोलॉजी को किस प्रकार से अडाप्ट किया है, सामान्य मानवीय के जीवन को कैसे सरल किया है। अब तक ईं-संजीवनी के तहत करीब-करीब 50 करोड़ टेली-कंसल्टेशंस हो चुकी हैं।

साथियों,

आज भारत में Travel Experience बदल रहा है, भारत के नागरिकों की यात्राएं पूरी तरह बदल गई हैं। यहां इस हॉल में ऐसा व्यक्ति खोजना मुश्किल होगा, जिसने एयरपोर्ट पर डिजी यात्रा का इस्तेमाल ना किया हो। ऐसे ही आजकल बहुत सारा काम Seamless तरीके से हो रहा है। हाइवे पर फास्ट टैग चल रहे हैं, ताकि आप बिना रुके टोल देकर आगे बढ़ सकें। Ease of Living का सही अर्थ यही है। समय की बचत हो रही है, जीवन आसान हो रहा है, और करोड़ों लोग अपनी प्रगति पर फोकस कर पा रहे हैं।

साथियों,

Politics में अक्सर वही फैसले headlines बनते हैं, जिनका असर आज दिखाई दे, यानी उसकी उमर 24 घंटे हो। पहले की सरकारों ने इलेक्शन सामने देख कर भी घोषणाएं करने का फॉर्मूला अपनाया। लेकिन ऐसी घोषणाओं से देश नहीं बदला। देश बदलने वाले फैसले वो होते हैं, जिनका प्रभाव जमीन पर दिखे, जो वर्तमान और भविष्य, दोनों को ध्यान में रखकर के लिए गए होने चाहिए।

साथियों,

पीएम कुसुम योजना और पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना इसका बहुत बड़ा यूनीक Example है। कुसुम योजना से किसानों को बिजली की चिंता से मुक्ति मिली है। और सूर्यघर योजना से मिडिल क्लास को बहुत फायदा हुआ है।

साथियों,

मैं ये जानता हूं कि अगर मैंने ये अनाउंस कर दिया होता कि आज से लाखों-लाख परिवारों के लिए बिजली मुफ्त है, तो सारा मीडिया, सारी स्क्रीन्स, सारे न्यूजपेपर्स, बड़ी-बड़ी हेडलाइन बनाकर के खबर दे देते कि मोदी जी ने आज अनाउंस कर दिया है। लेकिन हमने कुछ दूसरे अप्रोच से काम शुरू किया। हमने हर घर की छत पर एक सूरज उगाने की ठान ली, और आज देश के 50 लाख से ज्यादा परिवार, पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना से जुड़े हैं। सरकार ने 22 हजार करोड़ रुपए से ज्यादा इन परिवारों को दिए हैं, ये सोलर सिस्टम लगाने के लिए, ताकि उनकी छत पर सोलर प्लांट लगाकर सोलर पावर पैदा की जा सके। अब ये परिवार, एक्स्ट्रा बिजली को, बिजली ग्रिड में बेचकर, पैसे भी कमा रहे हैं। खुद का बिल तो जीरो हुआ, कमाई भी होने लगी। इस योजना से लोगों के सपनों को भी विस्तार मिल रहा है। बिजली बिल कम हुआ है, तो अब घर में फ्रिज, कूलर, वाशिंग मशीन, टीवी जैसी चीजें लोग खरीदकर रखने लगे हैं। अब ये डर नहीं होता कि बिजली कटौती की वजह से दूध फट जाएगा, अब चिंता नहीं रहती है। अब स्कूल जाने वाले बच्चे रातभर चैन से सो पाते हैं। मैं फिर कहता हूं- इलेक्शन हो या ना हो, लेकिन ये सूर्यघर और उसकी रोशनी बनी रहेगी, इस प्लांट का फायदा, सालों तक देश के परिवारों को होता रहेगा।

साथियों,

आने वाले समय में Ease of Living और Ease of Doing Business का और विस्तार होगा। देश के Youth के लिए, नारीशक्ति के लिए, Farmers के लिए, गरीब और Middle Class के लिए, हमारी सरकार लगातार काम करती रहेगी, हमारी Reform Express और अधिक गति से आगे बढ़ने वाली है। विकसित भारत का लक्ष्य पूरा करने के लिए, हम पूरी प्रतिबद्धता के साथ काम करते रहेंगे। और मैं, मेरे लिए भारत का future अगर सुनिश्चित हो गया ना, तो दुनिया के future में भी स्थिरता लाने का बहुत बड़ा काम इसी धरती से होने वाला है। इस आत्मविश्वास के साथ भारत जितना स्टेबल होगा, भारत का future जितना सुरक्षित होगा, विश्व को सुरक्षत्व का एहसास देने की ताकत यहीं से पैदा होने वाली है। इस सामर्थ्य के साथ, इसी संकल्प के साथ, मैं एक बार फिर, आज के इस कार्यक्रम में मुझे आमंत्रित करने के लिए, Economic Times की पूरी टीम का हृदय से बहुत-बहुत धन्यवाद करता हूं। वन्दे मातरम् !