शेअर करा
 
Comments

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी स्मृती इराणीजी, डॉक्टर महेंद्रभाई, सर्व अधिकारीवर्ग, सगळे पालक आणि शिक्षकवर्ग आणि भारताचे भविष्य असलेल्या माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो,

तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटले. तुमच्याकडून तुमच्या अनुभवांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. कला-संस्कृती पासून धैर्य, शिक्षणापासून अभिनव संशोधन, समाजसेवा आणि क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल तुम्हांला पुरस्कार मिळाले आहेत. आणि फार मोठ्या स्पर्धेला सामोरे गेल्यानंतर तुम्हांला हा पुरस्कार मिळाला आहे. या साठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुले पुढे आली, त्यांच्यामधून तुमची निवड झाली आहे. म्हणजेच हा पुरस्कार मिळालेल्या मुलांची संख्या मर्यादित असली तरीही आपल्या देशात विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करून दाखविणाऱ्या होतकरू मुलांची संख्या अमर्यादित आहे. हा पुरस्कार मिळविल्याबद्दल तुम्हां सर्वांचे पुन्हा एकवार खूप खूप अभिनंदन. आज राष्ट्रीय बालिका दिन देखील आहे, त्याबद्दल देशातील सर्व सुकन्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

तुम्हा सर्वांसह, मी तुमचे माता-पिता आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन करू इच्छितो. आज तुम्ही ज्या यशाला गवसणी घातली आहे त्यामागे या सर्वांचे देखील फार मोठे योगदान आहे. म्हणूनच, तुमच्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या जवळच्यांचे देखील यश आहे. या जवळच्या सर्व व्यक्तींचे प्रयत्न आणि त्यांच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत.

माझ्या नवतरुण सहकाऱ्यांनो,

तुम्हांला आज मिळालेला हा पुरस्कार आणखी एका कारणामुळे विशेष महत्त्वाचा पुरस्कार आहे. ते कारण म्हणजे या पुरस्कारांची वेळ. देश यावेळी स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे साजरी करत आहे. ह्या अत्यंत महत्वाच्या कालखंडात तुम्हांला हा पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही आयुष्यभर, अभिमानाने हे सांगू शकाल की माझा देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत होता त्या वेळेस मला हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारासोबतच तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. तुमच्या मित्रांना, कुटुंबाला, समाजाला, आणि प्रत्येकालाच तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. तुम्हांला या अपेक्षांचे ओझे घ्यायचे नाही तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे.

युवक मित्रांनो, आपल्या देशातील लहान लहान बालकांनी, मुला-मुलींनी प्रत्येक युगात इतिहास रचला आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीत वीरबाला कनकलता बरुआ, खुदिराम बोस, राणी गाईडीनिल्यू यांच्यासारख्या वीरांचा असा इतिहास आहे जो आपल्याला अभिमानाने भारून टाकतो. या स्वातंत्र्यसैनिकांनी लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला स्वतःच्या जीवनाचे उद्दिष्ट मानले होते आणि त्यासाठी जीवाचे बलिदान दिले होते. 

गेल्या वर्षी दिवाळीच्या सणाला मी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये गेलो होतो हे तुम्ही टीव्हीवर पाहिले असेलच. तिथे बलदेव सिंह आणि वसंत सिंह या वीरांशी माझी भेट झाली. आता तर ते दोघेही बऱ्याच मोठ्या वयाचे आहेत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच काश्मीरच्या भूमीवर जे युध्द झाले त्या वेळी हे दोघेही खूप लहान होते. त्या युद्धात या दोघांनी बाल सैनिक म्हणून फार मोठी जबाबदारी पेलली होती. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कितीतरी कमी वयातच आपल्या सेनेला मदत केली.

याच प्रकारे, आपल्या भारतातील आणखीन एक उदाहरण आहे ते म्हणजे गुरु गोविंद सिंह जी यांच्या मुलांचे शौर्य आणि बलिदान! या साहिबजाद्यांनी जेव्हा अतुलनीय वीरता, धाडस आणि साहसाने संपूर्ण समर्पण भावनेसह आत्मबलिदान दिले तेव्हा त्यांचे वय खूपच कमी होते. भारतीय सभ्यता, संस्कृती, श्रद्धा आणि धर्म यांसाठी त्यांनी केलेले बलिदान अतुलनीय आहे. साहिबजाद्यांच्या आत्मार्पणाच्या स्मरणार्थ देशाने 26 डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची सुरुवात केली आहे. तुम्ही सर्वांनी आणि देशातील सर्व मुलांनी वीर साहिबजाद्यांबद्द्ल माहिती मिळवून वाचली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.

काल दिल्लीमध्ये इंडिया गेट जवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या डिजिटल प्रतिमेची स्थापना करण्यात आली हे देखील तुम्ही पाहिले असेल. नेताजींकडून आपल्याला कर्तव्यपालनाची, देशाला प्राधान्य देण्याची फार मोठी प्रेरणा मिळते. नेताजींकडून स्फूर्ती घेऊन आपणा सर्वांना, खासकरून तरुण पिढीला देशासाठी स्वतःच्या कर्तव्यांच्या मार्गावरून पुढे जायचे आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्षे आपल्याकरिता यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत कारण आज आपल्यासमोर आपल्या भूतकाळाबद्दल अभिमान बाळगण्यासाठीचा,  त्यापासून प्रेरणा घेण्याचा क्षण आहे. हा काळ वर्तमानातील उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याचा आणि भविष्यासाठी नवी स्वप्ने बघण्याचा काळ आहे, नवनवी लक्ष्ये निश्चित करून त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याचा काळ आहे. ही उद्दिष्ट्ये येत्या 25 वर्षांसाठी आहेत, जेव्हा आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीची 100 वर्षे पूर्ण करत असेल त्या काळासाठी आहेत.

आता तुम्ही कल्पना करा, तुमच्यापैकी बहुतांश जण 10 ते 20 वर्षे या वयोगटातील आहेत. जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असतील तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर असाल जेव्हा आपला हा देश भव्य, दिव्य प्रगतीशील उंचीवर पोहोचलेला असेल. त्या वेळेस तुमचे जीवन अत्यंत सुख, शांतीने परिपूर्ण असेल. म्हणजेच आम्ही निश्चित केलेले हे लक्ष्य आपल्या तरुण वर्गासाठी आहे, आमच्या तरुण पिढीसाठी आहे. येत्या 25 वर्षांत देश ज्या उंचीवर पोहोचलेला असेल, देशाचे सामर्थ्य ज्या प्रमाणात वाढलेले असेल त्यात आपल्या तरुण पिढीची फार महत्त्वाची भूमिका आहे.

मित्रांनो,

आपल्या पूर्वजांनी ज्याची रुजवात केली, जी तपश्चर्या केली, त्याग केला, त्याची फळे आपल्या सगळ्यांना मिळाली आहेत. मात्र तुम्ही सर्वजण आता अशा काळात आहात, जिथे तुम्ही जे पेराल त्याची फळे तुम्हालाच खायला मिळतील, इतक्या वेगाने परिवर्तन होणार आहे. म्हणूनच, तुम्ही बारकाईने पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की आज देशात जी धोरणे आखली जात आहेत, जे प्रयत्न सुरु आहेत, त्या सर्वांच्या केंद्रस्थानी आपली तरुण पिढी आहे, तुम्ही सर्वजण आहात.

तुम्ही यासाठी कोणतेही क्षेत्र डोळ्यासमोर आणा, आज देशासमोर स्टार्ट अप इंडिया सारखी अभियाने आहेत, स्टँड अप इंडिया सारखे कार्यक्रम सुरु आहेत, डिजिटल इंडियाची एवढी मोठी मोहीम आपण हाती घेतली आहे, ‘मेक इन इंडिया’ ला वेगवान करण्यात येत आहे, देशात आत्मनिर्भर भारताची लोकचळवळ सुरु झाली आहे, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आधुनिक सुविधांचा जलदगतीने विस्तार होतो आहे, महामार्ग तसेच द्रुतगती महामार्ग निर्माण होत आहेत. ही प्रगती, हा वेग इतर कुठल्याही देशाच्या प्रगतीशी जुळतो आहे का?

आपण सगळे देखील या सगळ्या परिवर्तनाशी स्वतःला जोडून बघता, सर्व बदलांबाबत इतके उत्सुक असता. आपली ही पिढी भारतच नाही,तर भारताबाहेर देखील या युगातल्या नव्या प्रवाहाचे नेतृत्व करत आहे. आज आपण जेव्हा बघतो, की जगातील सर्वच मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या देशाचे सुपुत्र आहेत आणि त्याविषयी सगळे लोक चर्चा करत असतात. देशातली हीच युवा पिढी आज जगभरात आपली कीर्ती निर्माण करते आहे. आपल्या देशातले युवक जेव्हा स्टार्ट अप च्या जगात आपले झेंडे उंच फडकवत असल्याचं आपल्याला दिसतं तेव्हा आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. भारतातले युवक नवनवे अभिनव प्रयोग करतांना आपण बघतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. आता काही काळानंतर भारत आपल्या हिमतीवर पाहिल्यांदाच भारतीयांना अंतराळात पाठवणार आहे. या गगनयान अभियानाची संपूर्ण जबाबदारी देखील आपल्या युवकांवरच आहे. ज्या युवकांची या अभियानासाठी निवड झाली आहे, ते आत्ता यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

मित्रांनो,

आज आपल्याला मिळालेले हे पुरस्कार देखील, आपल्या युवा पिढीचे साहस आणि शौर्याचा देखील उत्सव साजरा करणारे आहेत. हे धैर्य आणि शौर्य नव्या भारताची ओळख आहे. कोरोनाच्या विरोधातील देशाची लढाई आपण पहिली आहे. आमच्या वैज्ञानिकांनी आपल्या लस निर्मात्यांनी जगभरात आघाडी घेत देशाला लस दिली. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण काळात, खडतर परिस्थितीत न थांबता, न घाबरता आपल्या परिचारिका गावागावात, अत्यंत दुर्गम भागात जाऊन लोकांना लस देत आहेत. हे देखील एक देश म्हणून साहस आणि हिमतीचेच एक मोठे उदाहरण आहे.

त्याचप्रमाणे, सीमेवर उभे असलेल्या आपल्या सैनिकांचे शौर्य बघा. देशाच्या रक्षणासाठी त्यांचा पराक्रम आपली ओळख ठरली आहे. आपले खेळाडू आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, जे यश ते आज मिळवत आहेत, ते मिळवणं भारताला कधीही शक्य नाही, असं समजलं जातं होतं. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रात जाण्याची आपल्या मुलींना आधी परवानगी देखील मिळत नसे, त्या मुली आज या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. हाच तर तो नवा भारत आहे, जो नवं काही करण्यास कचरत नहीं. हिंमत आणि धैर्य ही आज नव्या भारताची ओळख बनली आहे.

मित्रांनो,

आज भारत, आपल्या सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतील शिक्षणावर भर दिला जात आहे. यामुळे आपल्याला शिक्षण घेणे, विषय समजून घेणे अधिक सोपे जाईल. तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय शिकता यावेत, यासाठी देखील शिक्षण धोरणात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरातल्या हजारो शाळांमध्ये तयार होत असलेल्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळातच, मुलांमध्ये नवोन्मेषी प्रवृत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. 

मित्रांनो,

भारताच्या मुलांनी, युवा पिढीने कायमच हे सिद्ध केले आहे की एकविसाव्या शतकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठीचे किती प्रचंड सामर्थ्य त्यांच्यात आहे. मला आठवतं, चांद्रयानाच्या काळात मी देशभरातील मुलांना बोलावले होते. त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा मी कधीही विसरू शकत नाही. किशोरवयीन मुलांसाठी सुरु झालेल्या लसीकरण अभियानातही, भारतातल्या मुलांनी आपल्या आधुनिक आणि वैज्ञानिक विचारसरणीचा परिचय दिला आहे. तीन जानेवरीनंतर केवळ 20 दिवसातच चार कोटींपेक्षा अधिक मुलांनी कोरोना लस घेतली आहे. आपल्या देशातील मुले किती जागृत आहेत, त्यांना आपल्या जबाबदारीची किती योग्य जाणीव आहे, हेच यावरुन सिद्ध होते.

मित्रांनो,

स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचे खूप मोठे श्रेय देखील मी भारताच्या मुलांनाच देईन. तुम्ही सगळ्यांनी घरोघरी बाल सैनिक बनून, स्वच्छाग्रही बनून आपल्या कुटुंबाला स्वच्छता अभियानासाठी प्रेरणा दिली आहे. घरातल्या सर्वांनी स्वच्छता राखावी, घराच्या आत आणि बाहेर कचरा होऊ नये याचा विडाच मुलांनी स्वतः उचलला होता.

आज मी देशातल्या मुलांना आणखी एका गोष्टीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो आहे. आणि मुलांनी मला साथ दिली, तर प्रत्येक कुटुंबात निश्चित परिवर्तन होऊ शकेल. मला पूर्ण विश्वास आहे, की माझे हे लहानगे मित्र, ही माझी बाल सेना मला या कामात खूप मदत करेल.

ज्याप्रकारे, स्वच्छता अभियान राबवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे, 'व्होकल फॉर लोकल' अभियानासाठी देखील तुम्ही पुढे यावे. आपण घरीच बसून, सगळी भावंडं एकत्र येऊन एक यादी बनवा, त्यांची मोजणी करा, हातात कागद घेऊन करा. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपण ज्या गोष्टींचा वापर करतो, घरात जे सामान आहे, त्यात अशी कितीतरी उत्पादने आहेत, जी भारतात तयार झाली नाहीत, विदेशी आहेत. त्यानंतर घरातल्या लोकांना हा आग्रह करा की भविष्यात जेव्हा असे कोणते उत्पादन खरेदी करायचे असेल, तर ते भारतात तयार झालेलं असावं. त्यात भारताच्या मातीचा गंध असेल, ज्यात भारतातील युवकांच्या घामाचा सुगंध असेल. जेव्हा आपण भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी कराल, तर काय होत असेल? त्यामुळे आपल्या देशातली उत्पादने वाढत जातील. प्रत्येक गोष्टीत उत्पादने वाढत जातील, तेव्हा रोजगाराच्या संधीही वाढतील, जेव्हा रोजगार वाढतील तेव्हा आपले आयुष्यच आत्मनिर्भर होईल. म्हणूनच, आत्मनिर्भर भारताच्या या अभियानात,  आपली युवा पिढी, आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

मित्रांनो,

आजपासून दोन दिवसांनी देश आपला प्रजासत्ताक दिवस देखील साजरा करणार आहे. आपल्याला प्रजासत्ताक दिनी आपल्या देशासाठी काही नवे संकल्प करायचे आहेत. आपले हे संकल्प समाजासाठी, देशासाठी, एवढेच काय, तर संपूर्ण विश्वाच्या भविष्यासाठी असू शकतात. जसे की पर्यावरणाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. भारत पर्यावरणाच्या दिशेने आज इतके काही करत आहे, आणि त्याचा लाभ संपूर्ण जगाला मिळणार आहे.

माझी अशी इच्छा आहे की आपण अशा संकल्पाचा  विचार करावा जे भारताच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. जे भारताला आधुनिक आणि विकसित बनवण्यात मदत करणारे संकल्प आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की आपली स्वप्ने देशाच्या संकल्पाशी जोडले जातील, आणि आगामी काळात आपण देशासाठी कित्येक विक्रम स्थापन कराल. याच विश्वासासह, आपण सगळयांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन !!

माझ्या सगळ्या बालमित्रांना खूप खूप स्नेह आणि खूप खूप अभिनंदन !!

खूप खूप धन्यवाद !!

Present in the program are my colleagues in the Council of Ministers Smriti Irani ji and Dr. Mahendrabhai, all the officials, parents and teachers, and the future of India, my young friends!

It was a pleasure interacting with you. I also got to know about your experiences. You have received awards for your extraordinary achievements in various fields ranging from art and culture to gallantry, education to innovation, social service and sports. And you have got these awards after a tough competition. Children from every corner of the country have come forward and you have been selected. The number of awardees may not be so much, but the number of promising children is unparalleled in our country. Once again, many congratulations to all of you for these awards. Today is also National Girl Child Day. I also congratulate and extend my best wishes to all the daughters of the country.

Friends,

Along with you, I want to especially congratulate your parents and teachers. They have a major contribution to your growth today. Therefore, every success of yours is also the success of your loved ones. It includes the efforts and emotions of your loved ones.

My young friends,

The award you have received today is very special for another reason. It is the occasion for these awards! The country is currently celebrating 75 years of its independence. You have received this award in this important period. Throughout your life, you would proudly claim that ‘I received this award when my country was celebrating the Amrit Mahotsav of Independence’. This award also entails a huge responsibility for you. Now the expectations of your friends, family and society have also increased from you. You do not have to take stress from these expectations, but you have to take inspiration from them.

Young friends, small children, sons and daughters of our country have written history in every era. Heroes like Birbala Kanaklata Barua, Khudiram Bose and Rani Gaidinliu have a history in our freedom struggle that fills us with pride. These fighters had made the country's independence the mission of their lives at a very young age and had dedicated themselves for it.

You must have seen it on TV when I went to Nowshera sector of Jammu-Kashmir on Diwali last year. There I met heroes Shri Baldev Singh and Shri Basant Singh, who had fought the war in Kashmir immediately after independence as child soldiers. Now they are very old, but they were very young then. They were recognized as child soldiers for the first time in our army. They had helped the army at such a young age without caring about their lives.

Similarly, the bravery and sacrifice of the sons of Guru Gobind Singh ji is another example! Sahibzadas were very young when they had sacrificed with immense valor, patience, courage and complete dedication. Their sacrifice for India's civilization, culture, faith and religion is incomparable. The country has also started 'Veer Bal Diwas' on 26th December in memory of the sacrifices of Sahibzadas. I would like all of you and all the youth of the country to read about the brave Sahibzadas of the country.

You must have also seen that a digital statue of Netaji Subhas Chandra Bose was installed near India Gate in Delhi yesterday. We get the biggest inspiration of duty, of the nation first from Netaji. Taking inspiration from Netaji, all of us and the young generation, in particular, have to move forward on our path of duty for the country.

Friends,

Our 75 years of independence are important because today we can be proud of our past and draw energy from it. Now is the time to fulfill the present resolutions. This is the time for new dreams for the future and set new goals and move forward. These goals are for the next 25 years, when the country will complete its hundred years of independence.

Think over it. Most of you today are between the ages of 10 and 20. When there will be hundred years of independence, you would be at that stage of your life when the country would be very grand, divine, progressive and at its peak and your life would be full of happiness and peace. In effect, these goals are for our youth, for your generation and for you. Our young generation has an immense role when the country would be at its pinnacle in the next 25 years and there would be a huge potential of the country.

Friends,

We have got the fruits of what our ancestors sowed; it is because of their austerity and sacrifice. But you belong to a period and where the country is today that you would get to savor the fruits that you would sow! Such a swift change is going to happen. Therefore, you must have seen that our young generation and you are at the center of the policies and efforts that are being made in the country today.

You take up any sector. Today there are missions like Startup India, programs like Standup India; there is a massive Digital India campaign, the impetus is being given to the Make in India, the mass movement of self-reliant India is leading to the rapid expansion of modern infrastructure in every nook and corner of the country, highways and high-speed expressways are being built. With whose pace does this progress and speed match? You are the people who see themselves connected with all these changes and remain so excited for all of them. Your generation is leading this new era not only in India but outside India as well.

Today we feel proud when we see the CEOs of all the major companies of the world and everyone is discussing them. Who are these CEOs? They are the children of our own country. This is the young generation of this country which is dominant in the world today. Today, we feel proud when we see that the youth of India are making their mark in the world of start-ups. Today, we feel proud when we see that the youth of India are making new innovations and taking the country forward. Sometime from now, India, on its own strength, is all set to send Indians into space for the first time. The responsibility of the Gaganyaan mission is also on our youth. The youth who have been selected for this mission are working hard.

Friends,

The awards that you received today also celebrate the courage and valor of our younger generation. This courage and valor is the identity of new India today. We have seen the country's fight against Corona. Our scientists and vaccine manufacturers took the lead in the world and provided vaccines to the country. Our healthcare workers served the countrymen non-stop even in the toughest of times. Our nurses are vaccinating people visiting the most difficult places in villages. This reflects the country’s great example of courage.

Similarly, look at the valor of our soldiers posted on the borders. Their courage to protect the country has become our identity. Today our players are also achieving accolades, considered impossible for India. Similarly, our daughters are doing wonders in the fields where they were not allowed earlier. This is the new India, which does not hold back from innovating. Courage and determination are the identities of India today.

Friends,

Today, India is taking continuous steps to strengthen the future of its present and coming generations. Emphasis is being laid on learning in the local languages in the new National Education Policy. This will make it easier for you to read and learn. Special provisions have been made in the education policy to enable you to study the subjects of your choice. Atal Tinkering Labs, being built in thousands of schools across the country, are instilling the potential of innovation in children from the very early days of their studies.

Friends,

The children of India, the younger generation have always proved their mettle in taking India to new heights in the 21st century. I remember I had called children from across the country during Chandrayaan. I can never forget their enthusiasm and zeal. The children of India have displayed their modern and scientific thinking in the vaccination program as well. Since January 3, more than 40 million children have got the corona vaccine in just 20 days. It shows the awareness of the children of our country about their responsibilities.

Friends,

I also give a lot of credit for the success of Swachh Bharat Abhiyan to the children of India. As child soldiers, you inspired your family and neighborhood households for the cleanliness campaign. The children themselves had taken up the task of ensuring cleanliness in houses by family members and no filth inside and outside of the houses. Today I seek cooperation from the children of the country for one more thing. And if the children support me, then the change will come in every family. And I am confident that my little friends and this army of children will help me a lot in this work.

As you came forward for the cleanliness campaign, you should also come forward for the ‘Vocal for Local’ campaign. All the brothers and sisters at home should make a list of products that you use from morning till late at night and write down them on a paper which are not made in India, but foreign-made. You then insist your family to buy the products made in India. It should have the fragrance of the soil of India and the sweat of the youth of India. What happens when you buy made-in-India products? Immediately, our production will pick up. Production will increase in everything. And when production increases, new employment opportunities will also be created. When employment increases, your life will also become self-sufficient. Therefore, the campaign of AatmaNirbhar Bharat is linked to our young generation, to all of you.

Friends,

Two days from today, the country will celebrate its Republic Day. We have to make some new resolutions for our country on Republic Day. Our resolutions can be for society, for the country and for the future of the entire world. The example of the environment is before us. India is doing so much for the environment today, and the entire world will benefit from it.

I would like you to think about those resolutions which are related to the identity of India and which will help in making India modern and developed. I am sure that your dreams will connect with the country's resolutions and you will set innumerable records for the country in the times to come.

With this belief, many congratulations to all of you once again!

Lots of love, congratulations and thanks to all my young friends!

 

मोदी मास्टरक्लास: पंतप्रधान मोदींसोबत ‘परीक्षा पे चर्चा’
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
Explore More
पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद

लोकप्रिय भाषण

पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद
PM calls for rapid rollout of 5G, says will contribute $450 bn to economy

Media Coverage

PM calls for rapid rollout of 5G, says will contribute $450 bn to economy
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Virtual meeting between PM Modi and PM of Cambodia
May 18, 2022
शेअर करा
 
Comments

Virtual Meeting between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Samdech Akka Moha Sena Padei Techo Hun Sen, Prime Minister of Cambodia

Prime Minister Shri Narendra Modi held a virtual meeting today with H.E. Samdech Akka Moha Sena Padei Techo Hun Sen, Prime Minister of Cambodia.

The two leaders held discussions on the entire range of bilateral issues, including cooperation in the fields of trade and investment, human resource development, defence and security, development cooperation, connectivity, post-pandemic economic recovery and people-to-people ties. They expressed satisfaction at the pace of bilateral cooperation.

PM Hun Sen emphasised the importance that Cambodia attaches to its relations with India. Prime Minister Modi reciprocated the sentiment and stressed Cambodia’s valued role in India’s Act East policy. The leaders reviewed the robust development partnership between both countries, including capacity building programmes and Quick Impact Projects under the Mekong-Ganga Cooperation framework. Prime Minister Modi also highlighted the historical and civilizational links between the two countries and expressed his happiness at India’s involvement in restoration of Angkor Wat and Preah Vihear temples in Cambodia, which depict the cultural and linguistic connect between the two countries.

Prime Minister Hun Sen thanked India for providing 3.25 lakh doses of Indian-manufactured Covishield vaccines to Cambodia under Quad Vaccine Initiative.

The two leaders complimented each other on the 70th anniversary of the establishment of diplomatic relations between India and Cambodia being celebrated this year. As part of these celebrations, Prime Minister Modi invited His Majesty the King of Cambodia and Her Majesty Queen Mother to visit India at a mutually convenient time.

The two leaders also exchanged views on regional and global issues of shared interest. Prime Minister Modi congratulated Cambodia on assuming the Chairmanship of ASEAN and assured India’s full support and assistance to Cambodia for the success of its Chairmanship.