NCC provides a platform to strengthen the spirit of discipline, determination and devotion towards the nation: PM Modi
India has decided that it will confront the challenges ahead and deal with them: PM Modi
A young India will play key role in fourth industrial revolution: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला उपस्थित राहून मानवंदना स्वीकारली आणि एनसीसीच्या विविध पथकांच्या आणि इतर मित्र आणि शेजारी राष्ट्रांच्या कॅडेटसच्या मार्च पास्टची पाहणी केली.

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर या छात्रांनी साहसी क्रीडा, संगीत यासारख्या क्षेत्रातले आपले कौशल्य पंतप्रधानांसमोर सादर केले. गुणवान एनसीसी छात्रांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

देशातल्या युवकांना देशाप्रती निष्ठा, त्याचबरोबर निर्धार आणि शिस्तभावना बळकट करण्यासाठी एनसीसी उत्तम मंच पुरवले असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना देशाच्या विकासाशी जोडलेली असल्याचे ते म्हणाले.

भारतातल्या 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील युवकांची असल्याने भारत हा तरुणाईचा देश आहे. आपल्यासाठी ही अभियानाची बाब आहे मात्र त्याचवेळी विचारांनी तरुण राहण्याची आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आव्हानांना तोंड देताना आणि सध्याच्या गरजांची पूर्तता करताना भविष्यातल्या आकांक्षांच्या पूर्ततेच्या दिशेने आपण काम करायला हवे. युवा आणि चैतन्यदायी मानसिकता बाळगून भारत आगेकूच करत आहे. भारत आज युवा मानसिकता बाळगत असल्याने सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादी कॅम्पवर हल्ला करू शकला. प्रगतीच्या या वाटचालीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, कोणीही मागे राहू नये अशी भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याच भावनेतून बोडो करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सर्व संबंधितांनी चर्चा करूनच करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

ईशान्येकडच्या भागांच्या निकासासाठीच्या प्रयत्नांबद्दल माहिती देताना या भागाच्या विकासाबरोबरच खुल्या मनाने आणि विचारधारेने सर्व संबंधितांशी वाटाघाटी सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. बोडो करार हा त्याचाच एक भाग आहे.

युवा भारताचा हा विचार आहे. प्रत्येकाला समवेत घेऊन प्रत्येकाचा विकास साधत, प्रत्येकाचा विश्वास प्राप्त करत देशाला पुढे नेत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
GST cuts ignite car sales boom! Automakers plan to ramp up output by 40%; aim to boost supply, cut wait times

Media Coverage

GST cuts ignite car sales boom! Automakers plan to ramp up output by 40%; aim to boost supply, cut wait times
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 नोव्हेंबर 2025
November 14, 2025

From Eradicating TB to Leading Green Hydrogen, UPI to Tribal Pride – This is PM Modi’s Unstoppable India