पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांची पूर्तता करण्यात खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आणि आदर्श असलेल्या व्यक्तीचे गुण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे ;
"परकार्येषु युक्तात्मा स्वकार्ये क्षिप्रसाधनम्।
सुहृत्कार्येषु निर्वृत्ती राजकार्येषु विक्रमः ।। "
जी व्यक्ती इतरांच्या कामासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेते, आपली वैयक्तिक कर्तव्ये तत्परतेने व कार्यक्षमतेने पार पाडते, निःस्वार्थपणे सुहृदांची कामे करते आणि आपली राष्ट्रीय कर्तव्ये बजावताना अदम्य शौर्य आणि धैर्य दर्शवते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असते.
परकार्येषु युक्तात्मा स्वकार्ये क्षिप्रसाधनम्।
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2026
सुहृत्कार्येषु निर्वृत्ती राजकार्येषु विक्रमः ।। pic.twitter.com/dqKMM8ACdw


