पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद दिला आहे. नितीन कामत यांनी यामध्ये आहारात भरड धान्याचा समावेश केल्याचे म्हटले आहे.
नितीन कामत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“हे वाचून छान वाटले! आपण सर्वजण श्री अन्न हे आपल्या जीवनाचा भाग बनवूया.”
Good to read this! Let us all make Shree Ann a part of our lives. https://t.co/YC5h0o4Bez
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023


