पंतप्रधान पुदुचेरी येथे 2,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार
पुदुचेरीमधील पायाभूत सुविधा, नागरी सेवा, औद्योगिक विकास, शिक्षण, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास मजबूत करण्याचे या प्रकल्पांचे उद्दिष्ट
पंतप्रधान मदुराई येथे 4,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार
पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-332ए च्या मरक्कनम- पुदुचेरी विभागाच्या आणि राष्ट्रीय महामार्ग- 87 च्या परमकुडी-रामनाथपुरम विभागाच्या चौपदरीकरण प्रकल्पांची पायाभरणी करणार
पंतप्रधान तामिळनाडूमधील 8 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आणि चेन्नई बीच-चेन्नई एग्मोर चौथ्या मार्गाचे लोकार्पण करणार
पंतप्रधान तिरुप्परनकुंद्रम येथील अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मार्च 2026 रोजी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला भेट देणार आहेत. राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9 च्या सुमाराला चेन्नईला पोहोचतील.

1 मार्च रोजी, सकाळी 11:45 च्या सुमाराला, पंतप्रधान पुदुचेरी येथे 2,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. यावेळी ते जनसभेला संबोधितही करतील.

त्यानंतर, ते मदुराईला जातील. या ठिकाणी दुपारी 3 च्या सुमाराला ते 4,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 4 च्या सुमाराला, पंतप्रधान मदुराई मध्ये तिरुप्परनकुंद्रम येथील अरुलमिगु सुब्रमण्य मंदिरात दर्शन घेतील आणि पूजा करतील.

पंतप्रधान पुदुच्चेरीमध्ये

पंतप्रधान पुदुच्चेरी येथे पायाभूत सुविधा, नागरी सेवा, औद्योगिक विकास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि शाश्वत विकास मजबूत करणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण  आणि भूमिपूजन करणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते पीएम ई-बस सेवा उपक्रमांतर्गत ई-बस सेवेला प्रारंभ, स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, सिटीज इन्व्हेस्टमेंट्स टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन (सिटीज) उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निवासस्थान उद्घाटन, तसेच पुदुच्चेरी सरकारच्या सांडपाणी व पाणीपुरवठा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

कराईकल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) मधील कॉम्पोझिट इंजिनिअरिंग ब्लॉक - डॉ. एपीजे अब्दुल कलाम ब्लॉक आणि गंगा वसतिगृह; जेआयपीएमईआर मधील प्रादेशिक कर्करोग केंद्राचे आधुनिकीकरण; तसेच पाँडिचेरी विद्यापीठातील नवीन विस्तारित  इमारती, व्याख्यानगृहे आणि वसतिगृहे यांचेही उद्घाटन करण्यात येईल. यामुळे प्रदेशातील उच्च शिक्षण व आरोग्य सुविधांना बळकटी मिळेल.

पंतप्रधान 750 एकर क्षेत्रफळाच्या करासूर–सेदारापेट औद्योगिक वसाहतीचे राष्ट्राला समर्पण करतील. या वसाहतीत फार्मा पार्क, टेक्सटाइल पार्क, आयटी पार्क, आयआयटी मद्रासचे अत्याधुनिक संशोधन व विकास केंद्र आणि जेआयपीएमईआरच्या प्रगत आरोग्य सुविधा उभारण्यात येणार असून, यामुळे प्रदेशातील औद्योगिक वाढ आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.

पंतप्रधान पुदुच्चेरी प्रदेशातील रहिवाशांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. तसेच, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (पीएमजीएसवाय) 41 ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामाचे, पुदुच्चेरीतील हेरिटेज टाउनच्या विकासाचे, मिश्टी (मॅंग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टॅन्जिबल इन्कम्स) योजनेअंतर्गत मॅंग्रोव्ह पुनर्स्थापनेचे, पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे आणि सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत (आरडीएसएस) वीज क्षेत्रातील प्रकल्पांचेही भूमिपूजन करण्यात येईल.

याशिवाय, विशेष सहाय्य योजना (भांडवली गुंतवणूक) (एसएएससीआय) अंतर्गत नागरी रस्ते, निचरा जाळे, सार्वजनिक इमारती, विद्यार्थी वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचेही भूमिपूजन करण्यात येईल. भारत सरकारने एसएएससीआय योजनेअंतर्गत पुद्दूच्चेरीचा समावेश मंजूर केला असून, ही योजना मूळतः केवळ राज्यांसाठी मर्यादित होती. या निर्णयामुळे पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या वापरासाठी आवश्यक सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी भांडवली मालमत्ता निर्मितीच्या कामांना वेग प्राप्त होणार आहे.

पंतप्रधानांचा मदुराई दौरा

पंतप्रधानांच्या हस्ते मदुराईमधील 4,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन होणार आहे. संपर्क व्यवस्था सक्षम करणे, वाहतुकीत सुधारणा आणि क्षेत्रिय आर्थिक विकासाला गती देणे हा या प्रकल्पांचा उद्देश आहे. याप्रसंगी त्यांची जाहीर सभादेखील होईल.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 332 अ वरील मरक्कनम – पुदुचेरी आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 87 वरील परमाकुडी – रामनाथपुरम या मार्गांच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. मरक्कनम – पुदुचेरी मार्गाच्या चौपदरीकरणामुळे पुदुचेरीमधील शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ एक तासावरुन 30 मिनिटांचा म्हणजे निम्मा  होईल. या प्रकल्पामुळे महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गामध्ये सुरळीत कनेक्टीव्हिटी  राहील, ममल्लापुरम (महाबलीपुरम), कल्पक्कम अणु उर्जा केंद्र आणि ऑरोविले यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जाणे सुलभ होईल, किनारपट्टीवरील गावे आणि विलुप्पुरम जिल्ह्याचे मुख्यालय यांच्यातील दळणवळण भक्कम होईल आणि पर्यटनाला तसेच प्रादेशिक व आर्थिक उलाढालीला चालना मिळेल.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 87 वरील परमाकुडी-रामनाथपुरम मार्गाच्या चौपदरीकरणामुळे मदुराई, रामेश्वरम व धनुषकोडी यासारख्या धार्मिक स्थळांचा प्रवास अधिक वेगवान होईल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ एक तासावरुन 35 मिनिटांवर येईल म्हणजेच 40 टक्क्यांनी कमी होईल. मदुराई व रामेश्वरम ही प्रमुख रेल्वे स्थानके, मदुराई आणि आयएनएस पारुंडु येथील विमानतळ तसेच पंबन व रामेश्वरमची छोटी  बंदरे अशी बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था बळकट होण्यात या प्रकल्पाची मदत होईल. पीएम गतीशक्ती योजनेच्या तत्त्वांशी सुसंगत अशा या मार्गिकेमुळे मासेमारी संकुल, विशेष आर्थिक क्षेत्र, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्र आणि वस्त्रोद्योग संकुल एकत्रित येतील आणि त्यायोगे व्यापार, उद्योग व सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.

पंतप्रधानांच्या हस्ते रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. प्रवाशांची सुलभता वाढवणे, कार्यक्षमता सुधारणे आणि राज्यातील रेल्वेमार्ग दळणवळण व्यवस्था मजबूत करणे हा या प्रकल्पांचा उद्देश आहे.  

पंतप्रधान अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 8 रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करतील. यामध्ये तामिळनाडूमधल्या मोरप्पुर, बोम्मिडी, श्रीवल्लीपत्तुर, शोलावंदन, मानापराई, पोल्लची जंक्शन, कराईक्कुडी जंक्शन, थिरुवरुर जंक्शन या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांमध्ये आधुनिक, प्रवासीकेंद्रीत सुविधा असतील, यामध्ये स्थानिक वास्तुरचना व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असेल. सुधारित संपर्कव्यवस्था, स्थानक इमारती, आधुनिक प्रतीक्षालये, उद्वाहक व सरकते जिने, आधुनिक फलाट आणि दिव्यांगांसाठीच्या सुविधा यांचाही या स्थानकांमध्ये समावेश असेल.

पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नई किनारा – चेन्नई एगमोर 4 थ्या रेल्वेमार्गाचे लोकार्पण होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे चेन्नई उपनगरी रेल्वेसेवेची कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढेल. प्रवासी क्षमतेत वाढ झाल्यामुळे तसेच माल वाहतूक सेवा सुधारणेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या अधिकारी, आयटी व्यावयासिक, विद्यार्थी आणि व्यापारी यासारख्या लाखो लोकांना फायदा होईल.

तामिळनाडूमधील प्रसारण सेवा मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांच्या हस्ते कुंभकोणम, येरकॉड आणि वेल्लोर या तीन नव्या आकाशवाणी एफएम रिले ट्रान्समीटरचे उद्घाटन होईल. यामुळे आकाशवाणीची प्रादेशिक व्याप्ती वाढेल, विना अडथळा एफएम प्रसारणाची हमी मिळेल आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमधे सार्वजनिक प्रसारण सेवेची लोकांपर्यंत पोहोच सुधारेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Scan, withdraw, done: EPFO 3.0 plans instant PF access via ATMs and UPI

Media Coverage

Scan, withdraw, done: EPFO 3.0 plans instant PF access via ATMs and UPI
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi meets representatives of Janjati Suraksha Manch
May 28, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi met representatives of Janjati Suraksha Manch in New Delhi today.

The Prime Minister appreciated their dedication towards the tribal society.

During the interaction, discussions were held on various issues related to the development and empowerment of tribal communities.

The Prime Minister wrote on X;

“नई दिल्ली में आज जनजाति सुरक्षा मंच के प्रतिनिधियों से मुलाकात का अवसर मिला। आदिवासी समाज के लिए इनका समर्पण भाव बहुत सराहनीय है। इस दौरान जनजातीय समुदायों के विकास और उनके सशक्तिकरण से जुड़े विभिन्न विषयों पर सार्थक चर्चा हुई।”