संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भरतेच्याबाबतीत पुढे नेण्यासाठी, पंतप्रधान बडोदा इथे
सी -295 विमान निर्मिती सुविधेची करणार पायाभरणी
प्रदेशातील पाणीपुरवठा वाढवण्यासाठी, बनासकांठामधल्या थरड येथे 8000 कोटीं रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचा करणार प्रारंभ
पंतप्रधान जांबुघोडा, पंचमहाल येथे विकास प्रकल्पांचे करणार लोकार्पण आणि पायाभरणी
पंतप्रधान अहमदाबादमधील असार्वा येथे 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे प्रकल्प करणार समर्पित
केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान 97 व्या ‘कॉमन फाउंडेशन कोर्स’च्या ‘ आरंभ 4.0’ च्या समारोप कायर्क्रमामध्‍ये प्रशिक्षणार्थी अधिका-यांना करणार मार्गदर्शन
पंतप्रधान केवडिया येथे ‘मेझ गार्डन’ आणि ‘मियावाकी जंगल’ अशी दोन नवीन पर्यटन आकर्षणे करणार समर्पित
राजस्थानमध्ये पंतप्रधान ‘मांगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी अनाम वीरांच्या ब

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात आणि राजस्थान दौ-यावर जाणार आहेत.

पंतप्रधान दि.30 ऑक्टोबर रोजी बडोदा येथे सी-295 विमान निर्मिती सुविधेची पायाभरणी करणार आहेत.

दि. 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान केवडियाला भेट देणार आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे ते सरदार पटेल यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर ते राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यात सहभागी होतील. ‘आरंभ 4.0’ च्या समारोपप्रसंगी पंतप्रधान 97 व्या कॉमन फाउंडेशन कोर्सच्या प्रशिक्षणार्थी अधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान बनासकांठा जिल्ह्यात जाणार आहेत. इथे ते थरडमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. तसेच  अहमदाबादमधील महत्त्वपूर्ण  रेल्वे प्रकल्प ते समर्पित करणार आहेत.

दि. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात जाणार आहेत. येथे होत असलेल्या ‘मांगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील जांबुघोडा येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

 

बडोदा  येथे पंतप्रधान -

पंतप्रधान सी -295 विमान निर्मिती सुविधेची पायाभरणी करतील - देशातील खाजगी क्षेत्रातील पहिली विमान निर्मिती सुविधा असणाार आहे.  टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड आणि स्पेनच्या  एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्या सहकार्यातून भारतीय हवाई दलासाठी 40  सी -295  विमानांच्या निर्मितीसाठी या सुविधेचा वापर केला जाईल. ही सुविधा संरक्षण क्षेत्राला  आत्मनिर्भर करण्याचे ध्‍येय  साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल आणि या उद्योगामध्‍ये  खाजगी कंपन्यांची  क्षमता प्रदर्शित करण्‍यास मदत करेल. आत्मनिर्भर भारत अंतर्गत एरोस्पेस उद्योगातील तंत्रज्ञान आणि उत्पादन यामध्‍ये झालेली प्रगती दर्शविणा-या  प्रदर्शनालाही पंतप्रधान भेट देतील.

 

केवडिया येथे पंतप्रधान

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार,  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आला. त्यानुसार पटेल यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबरला  राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.  राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी आणि ती अधिक बळकट करण्यासाठी आपला  समर्पणाचा निश्चय या दिवशी अधिकच दृढ होतो.

पंतप्रधान केवडिया येथील एकता पुतळ्याजवळ होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात राष्ट्रीय एकता दिवस संचलन आयोजित केले आहे . या संचलनात सीमा सुरक्षा दलाची पथके तसेच उत्तर विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग या प्रत्येक विभागाचे एक पोलीस पथक म्हणजे विभागानुक्रमे हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि त्रिपुरा या पाच राज्यांच्या पोलीस दलांची पथके सहभागी होतील. या पथकांशिवाय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील सहा पोलीस दलातील पदक विजेते या संचलनात सहभागी होतील.

अंबाजी येथील आदिवासी मुलांचा संगीत बँड हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. या बँकेचे सभासद आधी अंबाजी मंदिरात भिक्षेकरी होते. पंतप्रधानांनी अंबाजी मंदिराला गेल्या महिन्यात भेट दिली होती तेव्हा या मुलांनी  त्यांच्यासमोर सादर केलेल्या कलेला पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले होते. या सोहळ्याचे दुसरे आकर्षण म्हणजे 'हम एक है हम श्रेष्ठ है ' या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय छात्र सेना  सादर करणार असलेला विशेष कार्यक्रम व  राज्यांच्या जोडगोळ्या सादर करणार असलेला  'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम.

आरंभ 4.00 चा कळसाध्याय म्हणजे  सामायिक फाउंडेशन अभ्यासक्रमातील 97 व्या तुकडीच्या  प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पंतप्रधान संबोधित करतील. आरंभ 4.00ची चौथी आवृत्ती  ही 'डिजिटल शासन : पाया आणि  सीमा' या संकल्पनेवर असेल. त्या आधारे -प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांना सार्वजनिक सेवा अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित सुविधा योग्य प्रकारे राबवणे तसेच डिजिटल माध्यमातून होणारे शेवटच्या टप्प्यातील सेवा वितरण अधिक पारदर्शक परिणामकारक आणि प्रभावी करण्याचा मार्ग शिकण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. या तुकडीत तेरा प्रकारच्या सेवांमध्ये निवडले गेलेले 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 450 प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत .

पंतप्रधान यावेळी केवडियाला दोन पर्यटक आकर्षणे सुपूर्द करतील ती म्हणजे चक्रव्यूह बगिचा व मियावाकी वन.

चक्रव्यूह बगीचा हा तीन एकर जमिनीवर पसरलेला आहे.  यामध्ये 2.1 किलोमीटर लांबीच्या पदपथाचा समावेश आहे . या  चक्रव्यूह बगीच्याचा आकार श्रीयंत्राच्या  आकाराप्रमाणे आहे.  त्यामुळे या जागेला सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाल्याचे मानले  जाते. या बगीच्यात एकूण 1.8 लाख झाडे लावली आहेत त्यामुळे या परिसराच्या सुघड सौंदर्यात भर पडली आहे. मियावाकी वन हे दोन एकर जागेत उभारले गेले असून यामध्ये स्थानिक पुष्प वन , साग वन,  फलोद्यान, औषधी वनस्पती उद्यान आणि मियावाकीय प्रकारात विविध प्रजातींच्या वनस्पती यांचा समावेश आहे. जपानी  वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी याने पाया घातलेल्या मियावाकी तंत्रावर मियावाकी वन आधारित आहे. या पद्धतीने कमी कालावधीत स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचे घनदाट जंगल तयार करता येते.

 

पंतप्रधान बनासकंटामध्ये

पंतप्रधान बनासकंटामधील थारड येथेही भेट देणार आहेत. इथे सार्वजनिक कार्यक्रमात आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेवर काम सुरू होईल. पंतप्रधान विविध प्रकल्पांचे पायाभरणी करतील. यामध्ये नर्मदा कालव्यातून येणाऱ्या रुपये पंधराशे कोटींहून अधिक खर्चाच्या कासारा ते दंती वाडा  पाईपलाईन चा समावेश आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याची व्याप्ती वाढेल तसेच तो या भागातील शेतकऱ्यांना लाभदायक सुद्धा होईल. या कार्यक्रमात विविध प्रकल्पांची घोषणा केली जाईल. यामध्ये सुजलाम सुफलाम कालव्याचे मजबुतीकरण, मोधेरा मोती दाऊ पाईप लाईनचे मुक्तेश्वर धरण- कर्मावत सरोवर पर्यंत एक्सटेन्शन , सतनापूर तालुक्यातील 11 गावांसाठी उपसा सिंचन योजना इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.

 

पंतप्रधान अहमदाबादमध्ये

अवसरा, अहमदाबाद येथे पंतप्रधान रेल्वेच्या 2900 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांचं लोकार्पण करतील. यात अहमदाबाद (अवसरा) - हिंमतनगर - उदयपुर गेज रूपांतरण मार्ग आणि लुनीधर - जेतलसर गेज रूपांतरण मार्ग यांचा समावेश आहे. भावनगर - जेतलसर आणि अवसरा - उदापूर या दोन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवतील.

संपूर्ण देशात समान गेज रेल्वे मार्ग असावे या दृष्टीकोनातून, रेल्वे ब्रॉड गेज नसलेल्या रेल्वे मार्गांचं ब्रॉड गेजमध्ये रूपांतरण करत आहे. पंतप्रधानांनी लोकार्पण केलेले प्रकल्प याच दिशेने एक पाऊल आहे. अहमदाबाद (अवसरा) - हिंमतनगर - उदयपुर गेज रूपांतरण मार्गाची लांबी 300 किमी आहे. यामुळे दळणवळणात सुधारणा होईल आणि याचा लाभ पर्यटक, व्यापारी आणि उत्पादक आणि या प्रदेशातील उद्योगांना मिळेल. यामुळे नोकरीच्या संधी वाढतील आणि सामाजिक - आर्थिक विकास होईल. लुनीधर - जेतलसर गेज रूपांतरण मार्गाची लांबी 58 किमी आहे, यामुळे वेरावल आणि पोरबंदर पासून पिपावाव बंदर आणि भावनगरचे अंतर कमी होईल. या प्रकल्पामुळे या मार्गावरची माल वाहन क्षमता वाढणार आहे, आणि यामुळे वर्दळीच्या कानालूस - राजकोट - वीरमगाम या मार्गावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे गिर अभयारण्य, सोमनाथ मंदिर, दिव आणि गिरनार पर्वत इथपर्यंत वाहतूक सुरळीत होईल आणि या क्षेत्रात पर्यटनाला चालना मिळेल.

 

पंतप्रधान पंचमहालमध्ये

पंतप्रधान, जांबूघोडा, पंचमहाल इथे काही प्रकल्पांचे लोकार्पण करतील तर काही प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांचा अपेक्षित खर्च 860 कोटी आहे. गोधरा इथे श्री गुरु गोविंद विद्यापीठाच्या परिसराचे लोकार्पण करतील. पंतप्रधान वेदक इथे संत जोरीया परमेश्वर प्राथमिक शाळा आणि स्मारक तसेच दांडियापूर इथे राजा रूप सिंग नायक प्राथमिक शाळा आणि स्मारकाचं लोकार्पण करतील. या प्रसंगी गोधरा इथे पंतप्रधान केंद्रीय विद्यालयाची पायाभरणी करतील. ते 680 कोटी रुपये खर्चाच्या गोधरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकास कामांची पायाभरणी करतील आणि कौशल्य - कौशल्य विद्यापीठाच्या विस्तारीकरणाच्या कामाची पायाभरणी करतील.

 

पंतप्रधान बंसवाडामध्ये :

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, केंद्र सरकारने स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात आदिवासी नायकांच्या पराक्रमाचे स्मरण करत, त्यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. यात, 15 नोव्हेंबर हा दिवस (स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांची जयंती) ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून जाहीर करणे, देशभरात आदिवासी संग्रहालये स्थापन करणे, इत्यादि उपक्रमांचा समावेश आहे. तसेच, स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समुदायाने दिलेल्या योगदानाबद्दल जनजागृती करणे, यासाठी देखील सरकार विविध योजना राबवत आहे. याच दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान, राजस्थान मध्ये बंसवाडा इथे मांगढ टेकडीवर, ‘मांगढ धाम की गौरव गाथा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान, अज्ञात आदिवासी नायकांना आणि स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या आदिवासी सेनानीना श्रद्धांजली वाहणार आहेत. पंतप्रधान, यावेळी भिल्ल स्वातंत्र्यसैनिक श्री गोविंद गुरु यांनाही श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच भिल्ल आदिवासी आणि इतर आदिवासी समुदायासमोर ते भाषणही करतील.

भिल्ल समुदायासाठी तसेच राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमधल्या आदिवासी समुदायासाठी मांगढ टेकड्या विशेष महत्वाच्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, जेव्हा भिल्ल समुदाय आणि इतर आदिवासी बांधव, ब्रिटिशांशी संघर्ष करत होते, त्यावेळी, दीड लाख भिल्ल समुदायाने, 17 नोव्हेंबर 1913 रोजी श्री गोविंद गुरु यांच्या नेतृत्वाखाली, या मांगढ टेकड्यावरच आसरा घेतला होता. ब्रिटीश सैनिकांनी इथे जमलेल्या निरपराध आदिवासी समुदायावर बेछूट गोळीबार केला, यात गोळीबारात, 1500 आदिवासी बांधवांना हौतात्म्य आले होते.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s steel exports rise 11% in October; imports moderate for the first time this fiscal

Media Coverage

India’s steel exports rise 11% in October; imports moderate for the first time this fiscal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the passing of Shri Mahendra Singh Mewad
November 10, 2024

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of the former Member of Parliament from Chittorgarh, Shri Mahendra Singh Mewad.

In a post on X, he wrote:

“सामाजिक और राजनीतिक जीवन में अमूल्य योगदान देने वाले चित्‍तौड़गढ़ के पूर्व सांसद और मेवाड़ राजघराने के सदस्य महेंद्र सिंह मेवाड़ जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। वे जीवनपर्यंत राजस्थान की विरासत को सहेजने और संवारने में जुटे रहे। उन्होंने लोगों की सेवा के लिए पूरे समर्पित भाव से काम किया। समाज कल्याण के उनके कार्य हमेशा प्रेरणास्रोत बने रहेंगे। शोक की इस घड़ी में मैं उनके परिजनों और प्रशंसकों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं। ओम शांति!”