हा भव्य सुफी संगीत महोत्सव साजरे करत आहे 25 वे वर्ष
अमीर खुसरो यांचा वारसा साजरा करण्यासाठी जगभरातील कलाकार महोत्सवात सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान हे देशातील वैविध्यपूर्ण कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे मोठे पुरस्कर्ते आहेत. याच अनुषंगाने ते जहान-ए-खुसरो या सुफी संगीत, कविता आणि नृत्यासाठी समर्पित असलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा महोत्सव आमीर खुसरो यांचा वारसा साजरा करण्यासाठी जगभरातील कलाकारांना एकत्र आणत आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार मुजफ्फर अली यांनी 2001 साली सुरू केलेला, रूमी फाऊंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव, यंदा आपले 25 वे वर्ष साजरे करत असून, 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे.

महोत्सवादरम्यान, पंतप्रधान टीईएच बझार (टीईएच - द एक्सप्लोरेशन ऑफ द हँडमेड) येथे  देखील भेट देतील, जेथे एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमातील उत्पादने, आणि देशभरातील विविध उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन मांडले जाईल, तसेच हस्तकला आणि हातमागावरील लघुपटही  प्रदर्शित केले जातील.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance

Media Coverage

India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 ऑगस्ट 2026
August 27, 2026

Make in India Goes Global: Engineering Boom, Rice Triumph & EU FTA Breakthrough Under PM Modi