पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत येत आहेत. मुंबईत ते फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉं यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरुन भारताच्या पुढाकाराने होत असलेल्या एआय इम्पॅक्ट परिषदेत भाग घेण्यासाठी तसेच मुंबईत मोदी यांच्यासह द्विपक्षीय परिषद घेण्यासाठी इमॅन्युअल मॅक्राँ 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. ही अध्यक्ष मॅक्राँ यांची भारताची चौथी तर मुंबईची पहिलीच भेट आहे.
हे दोन्ही नेते 17 फेब्रुवारीला मुंबईत लोकभवन येथे साधारण दुपारी 3.15 वाजता परस्परांना भेटतील. या भेटीत ते भारत आणि फ्रान्सच्या धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील. धोरणात्मक भागीदारी दृढ करुन नवनवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रात तिचा अधिकाधिक वापर करणे हे त्यांच्यासमोरील उद्दिष्ट असेल. स्थानिक तसेच जागतिक महत्वाच्या बाबींवर परस्परांचा दृष्टीकोनही ते यावेळी जाणून घेतील.
साधारण संध्याकाळी 5.15 ला हे दोन्ही नेते भारत- फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 चे उद्घाटन करतील तसेच दोन्ही देशांमधील व्यावसायिक नेते, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ आणि इतर संशोधक यांच्या समुदायाला ते संबोधित करतील.


