कर्तव्य भवन विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला चालना देईल
नवीन इमारत आधुनिक शासनाशी संबंधित पायाभूत सुविधांचे उदाहरण ठरेल
यामुळे शून्य-उत्सर्जन कचरा व्यवस्थापन,अंतर्गत घनकचरा प्रक्रिया आणि पुनर्वापर केलेल्या बांधकाम साहित्याचा व्यापक वापर याद्वारे पर्यावरणप्रति जागरूकतेला प्रोत्साहन मिळेल
ऊर्जा कार्यक्षमता आणि जल व्यवस्थापनावर देखील भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12:15 च्या सुमारास दिल्लीतील कर्तव्य पथ येथील कर्तव्य भवनला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर, पंतप्रधान संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता कर्तव्य पथावर जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील.

पंतप्रधानांच्या आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित शासनाच्या  दृष्टिकोनाप्रती सरकारच्या वचनबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कर्तव्य भवन - 03, ज्याचे उद्घाटन होणार  आहे, हा सेंट्रल व्हिस्टाच्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आहे. प्रशासकीय प्रक्रिया सुव्यवस्थित  करण्यासाठी आणि दक्ष प्रशासन सक्षम करणे हा उद्देश असलेल्या अनेक आगामी सामायिक  केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली इमारत आहे.

हा प्रकल्प सरकारच्या व्यापक प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांचे प्रतीक आहे. विविध मंत्रालयांना एकाच ठिकाणी आणून  आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा अवलंब करून, सामाईक केंद्रीय सचिवालय आंतर-मंत्रालयीन समन्वय सुधारेल, धोरण अंमलबजावणीला गती देईल आणि एक प्रतिसादात्मक प्रशासकीय व्यवस्थेला चालना देईल.

सध्या, अनेक प्रमुख मंत्रालये 1950 ते  1970 या काळात बांधलेल्या शास्त्री भवन, कृषी भवन, उद्योग भवन आणि निर्माण भवन यासारख्या जुन्या इमारतींमधून काम करतात, ज्या आता संरचनात्मकदृष्ट्या जुन्या आणि अकार्यक्षम झाल्या आहेत. नवीन सुविधांमुळे दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च कमी होईल, उत्पादकता वाढेल, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल  तसेच  एकूण सेवा वितरण वाढेल.

कर्तव्य भवन -03 ची रचना दिल्लीत सध्या विखुरलेल्या विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने  करण्यात आली आहे. हे एक अत्याधुनिक कार्यालय संकुल असेल जिथे  दोन तळघरे आणि सात मजले  (तळ + 6 मजले) असे  सुमारे 1.5 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असेल. यामध्ये गृह, परराष्ट्र व्यवहार , ग्रामीण विकास, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग , कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांची कार्यालये असतील.

कर्तव्य भवन ही नवीन इमारत आधुनिक शासकीय पायाभूत सुविधांचे प्रतीक ठरणार आहे. येथे आयटी-सुसज्ज आणि सुरक्षित कार्यस्थळे, ओळखपत्रावर आधारित प्रवेश नियंत्रण, एकात्मिक इलेक्ट्रॉनिक देखरेख प्रणाली, तसेच केंद्रीकृत आदेश प्रणाली उपलब्ध असेल.

ही इमारत शाश्वततेमधेही अग्रणी असेल.जीआरआयएचए-4 दर्जा मिळविण्याच्या दिशेने इमारतीच्या संकल्पनेत पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे –

डबल-ग्लेझ दर्शनी भाग

छतावरील सौर पॅनेल्स आणि सौर जलतापन प्रणाली

प्रगत एचव्हीएचसी प्रणाली पर्जन्यजल संकलन व्यवस्था

पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये :

कर्तव्य भवन एक शून्य-निर्गम संकुल आहे. येथे सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि पुनर्वापर करून पाण्याच्या गरजा भागवल्या जातात.

इमारतीच्या बांधकामात पुनर्वापर केलेल्या बांधकाम व तोडफोड (सी अँड डी) कचऱ्याचा वापर पेव्हिंग ब्लॉकमध्ये करण्यात आला आहे.

हलक्या वजनाच्या ड्राय पार्टिशन्सचा वापर करून माती आणि संरचनात्मक भार कमी करण्यात आला आहे.

घरगुती घनकचरा व्यवस्थापन प्रणालीदेखील या इमारतीत कार्यरत असेल.

ऊर्जासंवर्धन :

ही इमारत 30% पर्यंत ऊर्जा बचत करण्यासाठी खास रचनेतून बांधण्यात येत आहे –

थंड ठेवणाऱ्या आणि आवाज कमी करणाऱ्या विशेष काचेच्या खिडक्या

एलईडी दिवे आणि सेन्सर-नियंत्रित प्रकाश व्यवस्था

ऊर्जा बचत करणाऱ्या स्मार्ट लिफ्ट्स

उत्कृष्ट उर्जाव्यवस्थापन प्रणाली

कर्तव्य भवन-03 च्या छतावरील सौर पॅनेल्स दरवर्षी 5.34 लाख युनिट्सहून अधिक वीज निर्माण करतील.

दैनंदिन गरजेच्या 25% हून अधिक गरम पाण्याची पूर्तता सौर जलतापन प्रणालीतून होईल.

इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशनसुद्धा पुरवले जातील.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre allows 100% FDI in insurance via auto route

Media Coverage

Centre allows 100% FDI in insurance via auto route
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the loss of lives due to a fire mishap in Delhi’s Shahdara district
May 03, 2026
PM announces ex-gratia from PMNRF

Prime Minister Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to a fire mishap in Delhi’s Shahdara district.

The Prime Minister extended his condolences to those who have lost their loved ones in this tragic mishap and prayed for the speedy recovery of the injured.

Shri Modi announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister's National Relief Fund (PMNRF) would be given to the next of kin of each of those who lost their lives, and the injured would be given Rs. 50,000.

The Prime Minister posted on X:

"The loss of lives due to a fire mishap in Delhi’s Shahdara district is extremely distressing. Condolences to those who have lost their loved ones. Praying for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of those who lost their lives. The injured would be given Rs. 50,000: PM"