आंध्रप्रदेशात तिरूपती इथे, या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन
ह्या परिषदेमुळे, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये श्रमशक्तीशी संबंधित मुद्यांवर समन्वय साधण्यास मदत होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेचार वाजता, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील  श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती इथे, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, ही परिषद आयोजित केली आहे.

भारतातील सहकार्यात्मक संघराज्य भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत, श्रम आणि कामगारांसंबंधीच्या विविध मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक चांगली धोरणे आखली जावीत, तसेच, कामगारांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढवण्यासही या परिषदेमुळे मदत होईल.

या परिषदेत, चार संकल्पनांवर आधारित सत्रे असतील. कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी ई-श्रम पोर्टलवर सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी उपलब्ध करुन देण्याविषयी; राज्यसरकार संचालित ईएसआय रुग्णालयांच्या माध्यमातून चालवली जाणारी, ‘स्वास्थ्य से समृद्धी’ योजना आणि त्याची पीएमजन आरोग्य योजनेशी सांगड घालणे, चार कामगार संहितांच्या अंतर्गत नियम निश्चित कारणे; व्हीजन श्रमेव जयते @2047, या चार संकल्पनांसह, कामाची समान परिस्थिती, सर्व कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, यात असंघटित आणि प्लॅटफॉर्म वर काम करणारे कुली, लैंगिक समानता, अशा विविध मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Digital Health Records For All: Half Of India Now Has ABHA IDs Under Ayushman Bharat Digital Mission

Media Coverage

Digital Health Records For All: Half Of India Now Has ABHA IDs Under Ayushman Bharat Digital Mission
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मार्च 2025
March 18, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Leadership: Building a Stronger India