उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य नसते, हे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे -
“नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्। व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥"
या सुभाषिताचा अर्थ असा की, कोणतेही शिखर खूप उंच नसते आणि पाताळाची खोलीही फार नसते! त्याचप्रमाणे, कोणताही महासागर ओलांडण्यासाठी खूप मोठा नसतो. थोडक्यात , उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी जगात काहीही अशक्य नाही.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले
“नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्।
व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥"
नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्।
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2025
व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥ pic.twitter.com/drNJNTbEm0


