शेअर करा
 
Comments

जर्मनीचे चॅन्सलर महामहीम ओलाफ शोल्झ  यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील श्लोस एलमाऊला भेट देणार आहेत. 26-27 जून 2022 रोजी जर्मनीच्या  अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी- 7 शिखर परिषदेत ते सहभागी होतील. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या मुद्यांवर दोन सत्रांमध्ये विचार मांडणार आहेत. या महत्त्वाच्या मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका सारख्या अन्य लोकशाही देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान काही सहभागी देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.

जी 7  शिखर परिषदेचे निमंत्रण भारत आणि जर्मनी यांच्यातील मजबूत आणि घनिष्ठ भागीदारी आणि उच्चस्तरीय राजकीय संबंधांच्या परंपरेला अनुसरून आहे. सहाव्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत बैठकीसाठी (IGC)  2 मे 2022 रोजी पंतप्रधानांनी जर्मनीला शेवटची भेट दिली  होती.

जी 7 शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर, पंतप्रधान 28 जून 2022 रोजी संयुक्त अरब अमिरातीचे  माजी राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक महामहीम  शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल  शोकभावना  व्यक्त करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार  आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे नवे राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक म्हणून शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची  निवड झाल्याबद्दल पंतप्रधान त्यांचे अभिनंदन देखील करतील. त्याच रात्री  28 जून रोजी पंतप्रधान यूएईहून मायदेशी रवाना होतील.

 

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Viral Video: Kid Dressed As Narendra Modi Narrates A to Z of Prime Minister’s Work

Media Coverage

Viral Video: Kid Dressed As Narendra Modi Narrates A to Z of Prime Minister’s Work
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM shares glimpses of Sabarmati river from the newly flagged off Ahmedabad Metro
September 30, 2022
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has shared a tweet by an IAS officer M Nagarajan featuring glimpses of the Sabarmati river from the newly flagged off Ahmedabad Metro.

Quoting a tweet by an IAS officer M Nagarajan, the Prime Minister tweeted;

“A big day for Ahmedabad.”