पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांच्यासमवेत, स्लोव्हाकियामधील रेल्वे, संरक्षण, वाहन उद्योग, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील आघाडीचे व्यावसायिक आणि उद्योजकांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी भारत आणि स्लोव्हाकियातील वाढत्या परस्पर व्यावसायिक संबंधांची प्रशंसा केली. व्यवसाय सुलभतेला ('ईझ ऑफ डुइंग बिझनेस') चालना देण्यासाठी आणि पारदर्शक, स्थिर आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल आर्थिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी भारताने अलीकडच्या काही वर्षात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा आणि धोरणात्मक उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारतातील वाढत्या संधींचा, विशेषतः पायाभूत सुविधा, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल नवोन्मेष, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमधील संधींचा लाभ घेण्याचेही त्यांनी स्लोव्हाक कंपन्यांना आवाहन केले.
'विकसित भारत'चे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने भारतात केलेल्या सुधारणांचे उद्योग क्षेत्रातील अग्रणींनी स्वागत करत भारताच्या आर्थिक वाटचालीबद्दल विश्वास व्यक्त केला. वाढीव गुंतवणूक, तंत्रज्ञानविषयक भागीदारी आणि भारतीय कंपन्यांसोबतच्या संयुक्त उपक्रमांद्वारे भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याबाबतची उत्सुकता त्यांनी प्रकट केली. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) पूर्णत्वास आल्याचे त्यांनी स्वागत केले तसेच या कराराच्या अंमलबजावणीमुळे व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही नमूद केले. या भेटीवेळी पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि आघाडीचे उद्योजक उपस्थित होते.
- अलेक्सेज बाल्याजेव, अध्यक्ष, तत्रावगोन्का
- पीटर मॅलेक, उपाध्यक्ष, तत्रावगोन्का
- रॉबर्ट स्पिसाक, अध्यक्ष, एझेडसी ग्रुप
- रिचर्ड मार्को, सीईओ, एसेट
- परविंदर वालिया, अध्यक्ष – आशिया-पॅसिफिक विभाग, एसेट
- जारोस्लाव कुरासिना, सीईओ, ग्रँड पॉवर लिमिटेड
- पीटर लेडनिकी, सीईओ, पेंटा हॉस्पिटल्स इंटरनॅशनल
- स्टीफन रोसिना, सीईओ, मेटॅडोर
- राजेश साबणे, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मेटॅडोर टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि.,
- मातेज कोरेक, महासंचालक, व्हीयूजेई ए.एस,
- पीटर डचोविक, सीईओ, व्हीआयपीओ
- आंद्रेज बेन्सेल, डिजिटल कॉम्पिटन्स प्रमुख, व्हीआयपीओ
- जोझेफ ओमेल्का, एमडी, मायक्रोस्टेप-एमआयएस
- रिचर्ड वर्गा, अध्यक्ष आणि सीईओ, व्हीआरएम
- एडुआर्ड क्रिस्टिया, मार्केटिंग मॅनेजर, व्हीआरएम
- मिलोस्लाव्ह कुरिला, संचालक मंडळ सदस्य, इको इन्व्हेस्टमेंट्स
- टिबोर ग्रेगोर, कार्यकारी संचालक, क्लब 500
This afternoon in Bratislava, Prime Minister Robert Fico hosted an interaction with prominent Slovak business leaders.
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2026
Had insightful discussions on strengthening economic ties, boosting investment flows and expanding collaboration in innovation, technology, manufacturing and… pic.twitter.com/fzKdCdjFI4
Dnes popoludní v Bratislave usporiadal premiér Robert Fico stretnutie s poprednými slovenskými podnikateľskými lídrami.
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2026
Viedli sme podnetné rozhovory o posilňovaní hospodárskych vzťahov, zvyšovaní investičných tokov a rozširovaní spolupráce v oblastiach inovácií, technológií,… pic.twitter.com/Ebj036Wcl5


