पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक भारतीयाचे समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

नीती आयोगाने 'बहुआयामी दारिद्रय' या विषयावर प्रसिद्ध केलेल्या चर्चा अभ्यासावर पंतप्रधानांनी  भाष्य केले. या अभ्यासानुसार , 2005-06 पासून, भारताने बहुआयामी दारिद्रय निर्देशांक #MPI मध्ये 2013-14 मधील 29.17% वरून 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत  म्हणजेच 17.89% ची लक्षणीय घट नोंदवली आहे .परिणामी गेल्या 9 वर्षात 24.82 कोटी लोंकांची बहुआयामी दारिद्रयातून मुक्तता झाली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी  X वर पोस्ट केले:

“हे अत्यंत उत्साहवर्धक असून सर्वसमावेशक विकासाला पुढे नेण्यासाठी आणि आपल्या  अर्थव्यवस्थेतील परिवर्तनात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.आम्ही सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत  राहू."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI — an eventful journey

Media Coverage

UPI — an eventful journey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 ऑगस्ट 2026
August 25, 2026

Nari Shakti to Capital Markets: PM Modi’s Reforms Are Rewiring India’s Growth Story