पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा ऊर्जा विकास संस्था, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि वीज विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा केली आहे, ज्यांच्यामुळे वापरकर्ता – स्नेही पोर्टलच्या माध्यमातून सुलभरित्या सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान देणे सुरू होऊ शकले आहे. या उपक्रमामुळे गोव्यातील नागरिकांना वीज निर्मितीच्या पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळेल.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले:
"गोवा राज्याला सौर शक्तीचा उपयोग करताना पाहून आनंद झाला. या सहयोगी प्रयत्नामुळे शाश्वत विकासाला नक्कीच चालना मिळेल."
Happy to see Goa harnessing the power of the sun. This collaborative effort will boost sustainable development. https://t.co/uMEPlcW7SX
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2023


