जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सिंदूर रोपटे लावले. हे रोपटे त्यांना गुजरातच्या कच्छमधील शूर माता आणि भगिनींनी भेट दिले, ज्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य साहस आणि देशभक्तीचे दर्शन घडवले होते.
गुजरातमधील त्यांच्या अलीकडच्या भेटीचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की सिंदूर रोपट्याची ही भेट नेहमीच आपल्या देशातील महिलाशक्तीच्या शौर्याचे आणि प्रेरणेचे प्रतीक राहील.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले;
"1971 च्या युद्धात साहस आणि पराक्रमाचे असामान्य उदाहरण सादर करणाऱ्या वीरांगना माता-भगिनींनी अलीकडेच गुजरात दौऱ्यावर मला सिंदूर चे रोपटे भेट दिले होते. जागतिक पर्यावरण दिनी हे रोपटे आज नवी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी लावण्याचे भाग्य मला मिळाले आहे. हे रोपटे आपल्या देशाच्या महिलाशक्तीचे शौर्य आणि प्रेरणेचे सशक्त प्रतीक बनून राहील."
1971 के युद्ध में साहस और पराक्रम की अद्भुत मिसाल पेश करने वाली कच्छ की वीरांगना माताओं-बहनों ने हाल ही में गुजरात के दौरे पर मुझे सिंदूर का पौधा भेंट किया था। विश्व पर्यावरण दिवस पर आज मुझे उस पौधे को नई दिल्ली के प्रधानमंत्री आवास में लगाने का सौभाग्य मिला है। यह पौधा हमारे देश… pic.twitter.com/GsHCCNBUVp
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2025


