पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्रिपुराच्या विकासासाठी महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांनी केलेले प्रयत्न अनुकरणीय असून, त्याचे कौतुक केले जाते. त्यांना असलेली सार्वजनिक सेवेची आवड, गरिबांना सक्षम बनवण्याविषयी त्यांची वचनबद्धता आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पण यामुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळते, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी समाज माध्यम ‘एक्स’ वर पोस्ट केले;
“महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. त्रिपुराच्या विकासासाठी त्यांच्या अनुकरणीय प्रयत्नांचे कौतुक केले जाते. सार्वजनिक सेवेची त्यांची आवड, गरीबांना सक्षम बनवण्याची त्यांची वचनबद्धता आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पण आपल्याला खूप प्रेरणा देत आहे. केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकार त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.”
Remembering Maharaja Bir Bikram Kishore Manikya Bahadur Ji on his birth anniversary. He is admired for his exemplary efforts in developing Tripura. His passion for public service, commitment to empowering the poor and dedication to social upliftment continue to inspire us…
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2025


