पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मंगल पांडे हे ब्रिटीश राजवटीला आव्हान देणारे देशाचे अग्रणी लढवय्ये होते, असे मोदी यांनी गौरवोद्गार काढले.
एक्स या सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
महान स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. ते ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे देशाचे अग्रणी लढवय्ये होते. त्यांच्या साहस आणि पराक्रमाची गाथा देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत राहील.
महान स्वतंत्रता सेनानी मंगल पांडे को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। वे ब्रिटिश हुकूमत को चुनौती देने वाले देश के अग्रणी योद्धा थे। उनके साहस और पराक्रम की कहानी देशवासियों के लिए प्रेरणास्रोत बनी रहेगी।
— Narendra Modi (@narendramodi) July 19, 2025


