पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या स्वाहिद दिनानिमित्त ऐतिहासिक आसाम चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या शौर्यपूर्ण योगदानाचे स्मरण केले.
मोदी यांनी नमूद केले की आसाम आंदोलन आजही पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत आहे आणि राज्याच्या सांस्कृतिक बळकटीकरणासह सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“ आज स्वाहिद दिनी आपण आसाम आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांच्या शौर्याचे स्मरण करतो. ही चळवळ आपल्या इतिहासात नेहमीच प्रमुख स्थानी राहील. आसाम चळवळीत ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांची स्वप्ने, विशेषतः आसामच्या संस्कृतीचे बळकटीकरण तसेच राज्याची सर्वांगीण प्रगती प्रत्यक्षात साकार करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.”
Today, on Swahid Diwas, we recall the valour of all those who were a part of the Assam Movement. The Movement will always have a prime place in our history. We reiterate our commitment to fulfilling the dreams of those who participated in the Assam Movement, notably the…
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2025
আজি শ্বহীদ দিৱস উপলক্ষে অসম আন্দোলনত অংশগ্ৰহণ কৰা সকলোৰে শৌৰ্য্যক স্মৰণ কৰিছো। এই আন্দোলনে সদায় আমাৰ ইতিহাসত এক গুৰুত্বপূৰ্ণ স্থান অধিকাৰ কৰি থাকিব। আমি পুনৰ উল্লেখ কৰিব বিচাৰো যে, অসমৰ সংস্কৃতিক সবল কৰাৰ লগতে ৰাজ্যখনৰ সৰ্বাংগীন উন্নয়নৰ সপোন যিসকল আন্দোলনকাৰীয়ে দেখিছিল, সেই…
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2025


