पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.
यश वीर सिंह यांची प्रभावी फेक त्यांचा उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवणारी होती, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी 'एक्स' (X) वर लिहिले आहे:
“पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह याचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#CWG2026”
Congratulations to Yash Vir Singh for winning the Bronze in the Men’s Javelin event! He produced an impressive throw, reflecting his zeal and dedication. His achievement will inspire many young athletes. All the best to him for the endeavours ahead. #CWG2026 pic.twitter.com/nMq59WERgs
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026


