पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेतील कोलंबोजवळ श्री जयवर्धनेपुर कोट येथे असलेल्या ‘भारतीय शांती सेना (आयपीकेएफ) स्मारक’ येथे आदरांजली अर्पण केली.
आयपीकेएफ स्मारक भारतीय शांती सेनेतील त्या शूर सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आले आहे, ज्यांनी श्रीलंकेच्या एकतेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करताना आपले प्राण अर्पण केले.


