वीर सावरकर जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली आहे. "स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या असीम धैर्याची आणि संघर्षाची गाथा आपले कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. देशासाठी त्यांनी केलेले बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या उभारणीत आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहील", असे मोदी यांनी म्हटले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे
“भारतमातेचे सच्चे सुपुत्र, वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र आदरांजली. परकीय सत्ताधाऱ्यांच्या क्रूर यातनाही त्यांच्या मातृभूमी प्रति समर्पण भावनेला विचलित करू शकल्या नाहीत. स्वातंत्र्याच्या लढ्यातील त्यांच्या अदम्य साहस आणि संघर्षाची गाथा हा कृतज्ञ देश कधीही विसरू शकणार नाही. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही मार्गदर्शन करत राहील.."
भारत माता के सच्चे सपूत वीर सावरकर जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। विदेशी हुकूमत की कठोर से कठोर यातनाएं भी मातृभूमि के प्रति उनके समर्पण भाव को डिगा नहीं पाईं। आजादी के आंदोलन में उनके अदम्य साहस और संघर्ष की गाथा को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता। देश के लिए… pic.twitter.com/3OsxSN905I
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2025


