पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या 51 व्या जी- 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान, महामहिम जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भारत आणि इटली यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत राहील, आणि याचा मोठा लाभ आपल्या नागरिकांना मिळत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशाला, प्रतिसादात्मक लिहिलेला संदेश :
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मी आपल्याशी पूर्णतः सहमत आहे. भारताची इटलीसोबतची मैत्री अधिक दृढ होत राहील,आणि याचा मोठा लाभ आपल्या नागरिकांना मिळत राहील. @GiorgiaMeloni”
Fully agree with you, PM Giorgia Meloni. India’s friendship with Italy will continue to get stronger, greatly benefitting our people!@GiorgiaMeloni https://t.co/LaYIIZn8Ry
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025


