पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झाग्रेब येथे क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहिम आंद्रेज प्लेनकोविक यांची भेट घेतली. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट असल्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील संबंधांचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक बांस्की द्वोरी पॅलेस येथे आगमन होताच पंतप्रधान प्लेनकोविक यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाग्रेब विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विशेष बाब म्हणून पंतप्रधान प्लेनकोविक यांनी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले.

 

दोन्ही नेत्यांनी प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा केली. या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लष्कर आणि संरक्षण, सांस्कृतिक सहकार्य आणि नागरिकांमधील स्नेहबंध अशा विविध पैलूंवर द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. पायाभूत सेवासुविधा, बंदर आणि नौवहन, डिजिटलीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, औषधनिर्मण, पर्यटन आणि आदरातिथ्य अशा अनेक क्षेत्रातील आपसातले सहकार्य वाढवण्यासाठी अमाप संधी असल्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. क्रोएशिया मध्ये भारतीय संस्कृती, विचारधारा आणि योगाभ्यासाबद्दल असलेल्या लोकप्रियतेमुळे दोन्ही राष्ट्रांमधील नागरिक अधिक समीप आल्याचे त्यांनी नमूद केले. 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी क्रोएशियातील सर्व योगप्रेमींना शुभेच्छा दिल्या.

स्टार्ट अप उभारणी आणि नवोन्मेष भागीदारी क्षेत्रातील अलीकडच्या उपक्रमांबद्दल दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक आणि शाश्वत वृद्धीसाठी व्यापार ते व्यापार सहकार्याला चालना देण्याबरोबरच गुंतवणूक भागीदारी आणि संयुक्त प्रकल्पांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे या मुद्द्याकडे दोन्ही नेत्यांनी लक्ष वेधले.  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्रोएशिया भारताच्या प्रतिभाकुशलतेचा लाभ घेऊ शकते असे सांगून पंतप्रधानांनी गतिशीलतेच्या क्षेत्रात संस्थात्मक सहकार्य स्थापित करण्याचे आवाहन केले. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर द्वारे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या महत्त्वावर त्यांनी सहमती दर्शविली.  क्रोएशिया मध्य आणि आग्नेय युरोपमध्ये भारताचे प्रवेशद्वार म्हणून काम करू शकते.

 

दोन्ही नेत्यांनी परस्पर लाभाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर देखील विचारविनिमय केला. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणा, हवामान बदल कृती आणि दहशतवादामुळे निर्माण झालेल्या धोक्यांबद्दल विचारांची देवाणघेवाण केली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत क्रोएशियाने भारताला दिलेल्या मजबूत पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान प्लेनकोविक यांचे आभार मानले. भारत-युरोपियन युनियन यांच्यातील दृढ संबंधाबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दर्शविला.

या बैठकीनंतर, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रातील चार सामंजस्य करार आणि हिंदी चेअरच्या नूतनीकरणावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रसंगी एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले [लिंक].

 

पंतप्रधान प्लेनकोविक यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते. पंतप्रधानांनी पंतप्रधान प्लेनकोविकला परस्परांना  सोयीस्कर वेळी भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."