फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने, 16 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली.

दोन्ही पंतप्रधानांनी भारत-कॅनडा संबंधांमधील सकारात्मक गतीचे स्वागत केले आणि मार्च 2026 मधील  पंतप्रधान कार्नी यांच्या यशस्वी भारत दौऱ्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

भविष्याभिमुख धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, दोन्ही नेत्यांनी भारतीय आणि कॅनेडियन अर्थव्यवस्थांमधील परस्परपूरकतेवर भर दिला तसेच जागतिक ऊर्जा आणि अन्न सुरक्षा बळकट करण्यासाठी लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळ्यांचे  महत्त्व अधोरेखित केले.

 

द्विपक्षीय आर्थिक सहकार्यातील प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. एलएनजी, एलपीजी आणि धातूकामासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाशी संबंधित व्यावसायिक करारांमधील घडामोडींवरही चर्चा झाली.

 दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय भेटींच्या देवाणघेवाणीला मिळत असलेल्या गतीचे पंतप्रधानांनी स्वागत केले. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अलीकडील कॅनडा दौऱ्याचा त्यांनी उल्लेख केला  आणि 2026 च्या उत्तरार्धात कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारतात येणाऱ्या कॅनडियन व्यापार शिष्टमंडळाच्या आगामी दौऱ्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या (सीईपीए) दिशेने सुरू असलेल्या वाटाघाटींमधील प्रगतीबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. 2026 मध्ये या वाटाघाटी पूर्ण करण्याच्या आपल्या सामायिक उद्दिष्टाचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या अलीकडील बैठका आणि कॉन्सुलर संवादासह, दोन्ही सरकारांमधील संस्थात्मक सहभाग अधिक दृढ होत असल्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले. संरक्षण, वित्त आणि स्थलांतर या क्षेत्रांतील आगामी संवादासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले.

 

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, माहितीच्या सामान्य सुरक्षेच्या करारावर (जीएसओआयए) वाटाघाटी सुरू करण्यास पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. तसेच भारताच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या कॅनडा दौऱ्यासह संरक्षण संस्थांमधील अलीकडील देवाणघेवाणीचेही त्यांनी स्वागत केले.

कॅनडा-भारत प्रतिभा आणि नवोन्मेष धोरणांतर्गत सुरू असलेल्या सहकार्याची दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली. कौशल्य विकास, नवोन्मेष भागीदारी आणि दोन्ही देशांतील शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्याच्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी यांनी हिंद महासागर रिम असोसिएशन (आयओआरए) चा  संवाद भागीदार बनण्यासाठी कॅनडाला भारताचा पाठिंबा दर्शवला.

नेत्यांनी संवाद, देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून रायसीना अमेरिका या नव्या व्यासपीठाच्या स्थापनेची घोषणा केली.

2026 मध्ये कॅनडा भेटीचे निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान कार्नी यांचे आभार मानले. भेटीसाठी परस्पर सोयीस्कर तारीख निश्चित करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी राजनैतिक मार्गांनी संपर्कात राहण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-Japan action plan targets exchange of 5 lakh people in five years, including 50,000 skilled Indians: Gov

Media Coverage

India-Japan action plan targets exchange of 5 lakh people in five years, including 50,000 skilled Indians: Gov
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 जुलै 2026
July 31, 2026

Building Trust & Capability Under PM Modi : Fair Exams, Homegrown Space Tech & India’s First Telecom Manufacturing Zone