Launches Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan to benefit 63000 tribal villages in about 550 districts
Inaugurates 40 Eklavya Schools and also lays foundation stone for 25 Eklavya Schools
Inaugurates and lays foundation stone for multiple projects under PM-JANMAN
“Today’s projects are proof of the Government’s priority towards tribal society”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधील हजारीबाग येथे 80,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ केला, 40 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे (ईएमआर) उद्घाटन आणि 25 ईएमआरची पायाभरणी केली, आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियाना (PM-JANMAN) अंतर्गत अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

 

कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी झारखंडच्या विकासाच्या प्रवासाचा भाग बनण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि काही दिवसांपूर्वी शेकडो कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी जमशेटपूर येथे दिलेल्या भेटीचे स्मरण केले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झारखंडमधील हजारो गरीब नागरिकांना पक्क्या घरांचा ताबा देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण आणि कल्याणाशी संबंधित आजच्या 80,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, यामधून आदिवासी समुदायांप्रति असलेला सरकारचा प्राधान्यक्रम स्पष्ट होतो. आजच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड आणि भारतातील जनतेचे अभिनंदन केले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान म्हणाले की, आदिवासी कल्याणाप्रति असलेला त्यांचा दृष्टीकोन आणि कल्पना, हे भारताचे भांडवल आहे. पंतप्रधान म्हणाले की, आदिवासी समाज वेगाने प्रगती करतील, तेव्हाच भारताची प्रगती होईल, असा महात्मा गांधी यांचा विश्वास होता. सध्याचे सरकार आदिवासी समाजाच्या उत्थानाकडे सर्वाधिक लक्ष देत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी, आज सुरु करण्यात आलेल्या धरती आभा  जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा उल्लेख केला, ज्यामध्ये सुमारे 80,000 कोटी रुपये खर्च करून सुमारे 550 जिल्ह्यांमधील 63,000 आदिवासी बहुल गावांचा विकास केला जाईल.

 

योजने अंतर्गत, आदिवासीबहुल गावांचे सामाजिक-आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी काम केले जाईल, आणि त्याचा लाभ देशातील 5 कोटींहून अधिक आदिवासी बंधू-भगिनींना मिळेल, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. "झारखंड मधील आदिवासी समाजालाही याचा मोठा लाभ मिळेल", ते पुढे म्हणाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या भूमीतून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमधून पीएम-जनमन योजना सुरू करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांनी जाहीर केले की,  15 नोव्हेंबर 2024 रोजी, जनजाती गौरव दिवस, भारत पीएम-जनमन योजनेचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्‍यात येईल. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री -जनमन योजनेच्या माध्यमातून विकासाची फळे देशातील मागास  राहिलेल्या आदिवासी भागात पोहोचत आहेत. प्रधानमंत्री-जनमन योजनेअंतर्गत आज सुमारे 1350 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी करण्यात आली, यावर पंतप्रधान  मोदी यांनी प्रकाश टाकला. या योजनेबाबत बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, अत्यंत मागासलेल्या आदिवासी भागामधील लोकांना  चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रस्ते यासारख्या सुविधा निर्माण केल्या जातील.

 

झारखंडमधील प्रधानमंत्री -जनमन योजनेच्या पहिल्याच वर्षात केलेली कामगिरी  अधोरेखित करताना नरेंद्र  मोदी म्हणाले की, 950 हून अधिक मागासलेल्या गावांमध्ये प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण झाले आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात 35 वनधन  विकास केंद्रांनाही मान्यता देण्यात आली आहे. दुर्गम आदिवासी भागांना मोबाईल कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला ज्यामुळे प्रगतीची समान संधी देऊन आदिवासी समाजाचा कायापालट होण्यास मदत होईल.

आदिवासी तरुणांना शिक्षण आणि संधी मिळाल्यावर या  समाजाची प्रगती होईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. यासाठी सरकार आदिवासी भागात एकलव्य निवासी शाळा बांधण्याची मोहीम राबवत  आहे, असे पंतप्रधान  मोदी म्हणाले. 40 एकलव्य निवासी शाळांचे उद्घाटन आणि आज 25 नवीन शाळांची पायाभरणी केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी एकलव्य शाळा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असायला हव्यात आणि उच्च दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. यासाठी सरकारने प्रत्येक शाळेसाठी खर्चाची तरतूद  जवळपास दुप्पट केली आहे, असेही ते म्हणाले.

 

योग्य प्रयत्न केल्यावर सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे   पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आता आदिवासी तरुण पुढे जातील आणि त्यांच्या क्षमतेचा देशाला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी  झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार व आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशातील आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेल्या आपल्या वचनबध्दतेनुसार, पंतप्रधानांनी रु 80,000 कोटी प्रस्तावित खर्चाच्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना’चा शुभारंभ केला. हे अभियान देशभरातील 63,000 गावांमधून राबवले जाईल, त्यामुळे 30 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 549 जिल्हे व 2740 तालुक्यांमधील 5 कोटींहून अधिक आदिवासी बांधवाना लाभ मिळेल. भारत सरकारच्या विविध विभाग तसेच 17 मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या 25 प्रकल्पांद्वारे  सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, तसेच रोजगारातील कमतरता भरून काढण्याचे काम केले जाईल. 

 

आदिवासी समुदायांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी पंतप्रधानांनी 40 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे (EMRS) उदघाटन केले आणि रु. 2800 कोटी तरतुदीने 25 EMRS शाळांची कोनशिला बसवली.

‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान’ अर्थात PM-JANMAN अंतर्गत  पंतप्रधानांनी रु 1360 कोटी तरतुदीच्या अनेक प्रकल्पांचे उदघाटन केले आणि कोनशिला बसवली. यात 1380 किलोमीटर लांबीचे रस्ते, 120 अंगणवाड्या, 250 बहुउद्देशीय केंद्रे व १० शालेय वसतीगृहाचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी PM-JANMAN अंतर्गत ७५८०० अति असुरक्षित जनजाती गटांच्या ३००० गावांसाठी विद्युत जोडण्या, २७५ फिरती वैद्यकीय केंद्रे, ५०० अंगणवाडी केंद्रे, २५० वन धन विकास केंद्रे,आणि अतिअसुरक्षित जनजाती गटांच्या ५५००हुन अधिक गावांसाठी ‘नल से जल’ योजना अशा कार्यरत झालेल्या अनेक योजनांचे उदघाटन केले.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From 'chalta hai' to 'badal sakta hai': Decoding PM Modi's Punctuality narrative

Media Coverage

From 'chalta hai' to 'badal sakta hai': Decoding PM Modi's Punctuality narrative
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The world must now be looking for Indian startups: PM Modi during the interaction with Space Startup CEOs
August 23, 2026
Prime Minister highlights policy consistency, global opportunities and India’s growing strengths in the space sector
We should create an aura that makes people across the world look to India to build their future: PM
We can establish ourselves very fast as we are highly competitive in terms of cost; our talent and the risk-taking capacity of our people is also very high: PM

प्रधानमंत्री - आपने एक नए क्षेत्र में साहस दिखाया है, सबसे बड़ी बात है कि आपने सरकार की बात पर भरोसा किया। मेरा एक मत रहा कि जो भी हम निर्णय करें, हम उसमें कंसिस्टेंट रहें, हम बार-बार उसमें बदलाव ना करें, ताकि कोई भी रिस्क लेना चाहता है, तो उसको भरोसा रहे कि भाई ठीक है मेरी गलती के कारण कुछ गड़बड़ होगा तो ठीक है, लेकिन कोई मेरा हाथ नहीं छोड़ देगा। और ये विश्वास पैदा करने का हमारा प्रयास था।

CEO –We are India’s first Space Tech Unicorn. अभी July, 18 को हम भारत का पहला प्राइवेट रॉकेट सक्सेसफुली सैटेलाइट्स को इजेक्ट करके लॉन्च किया था। And, this is just the beginning. Generally, we say that just warm up for Skyroot, अभी शुरुआत है। एंड नेक्स्ट ईयर मिड तक हम एक लॉन्च per month हम कर रहे हैं। And also like thanks to you sir for opening up the sector. तीन फैक्ट्री बन चुका है। एक रॉकेट per month का कैपेसिटी है ऑलरेडी। And, this is just the beginning. अभी फ्यूचर ड्रीम है कि एक लॉन्च per week करना है और several launches per day.

CEO – एक ऐसा इंजन बनाया जो दुनिया का सबसे आधुनिक इंजनों में से आता है। सर इसको अभी हमने तैयार किया है, इसकी टेस्टिंग जारी है।

प्रधानमंत्री - उनका कॉन्फिडेंस है, इन्वेस्टर्स का?

CEO – सर,स्काई रूट का जो लॉन्च हुआ है फर्स्ट, उसके बाद से बढ़ गया है।

प्रधानमंत्री –अच्छा। वो रूट आपको काम आ रहा है?

CEO – वो बहुत काम आ रहा है।

प्रधानमंत्री –दुनिया अब भारत के स्टार्टअप को खोजती होगी, भई कौन है इसमें? क्योंकि एक जब ब्रेक थ्रू होता है, तो तुरंत लोगों का ध्यान जाता है।

CEO – I think, स्पेस इंडस्ट्री ओपन होने के बाद हमने एक बहुत अच्छी सी ट्रेंड देखी है। हमारे जितने सिटीजंस यूएस और यूरोप में हैं वे वापस आकर हमारे साथ काम करना चाह रहे हैं।

प्रधानमंत्री –बहुत लोगों को हमें जोड़ना है और जैसा मेहता ने कहा कि भई अब विदेश से लोग गए हुए वापस आ रहे हैं। मैं समझता हूं कि हमें ऐसा एक aura खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनियाभर के लोगों को लगे कि भई जिंदगी बनानी है, तो हिंदुस्तान जाओ। भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ। भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है, एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।

CEO –हमारा विज़न है कि नेक्स्ट 18 months में हम ग्लोबल ग्राउंड स्टेशन नेटवर्क लगाना चाहते हैं।

CEO –हम जो सैटेलाइट्स का इंजन होता है, जो सैटेलाइट को एक जगह से दूसरा जगह ले जाता है स्पेस में। 5 साल या 15 साल तक ले जाता है सैटेलाइट्स को, वो इंजंस बनाते हैं सर। ग्लोबली बहुत अच्छा ट्रैक्शन मिला है एंड ये भी आपका एफर्ट भी इसमें बहुत है सर कि इंडिया का कंपनीज़ अभी एक्सपोर्ट करने के लिए गवर्नमेंट का सपोर्ट है।

प्रधानमंत्री –कॉस्ट में हम बहुत कॉम्पिटिटिव हैं, टैलेंट में तो कोई प्रश्न ही नहीं उठता है और रिस्क टेकिंग कैपेसिटी हमारे देश के लोगों की वैसे भी ज्यादा होती है। और उसके कारण हम बहुत तेजी से अपनी जगह बना सकते हैं।

CEO –This robotic spacecraft will go to space, physically capture the dead satellite and remove it from the orbit.

CEO –We are the first Indian company working on the docking under refueling technologies with the vision of establishing a fuel station in space.

CEO – मेरा नाम अंतरिक्ष है, my co-founder Monika is also here. सर हम इंडिया का फर्स्ट स्पेस फार्मा स्टार्टअप हैं। हम ऐसे सेटेलाइट्स बना रहे हैं, जो स्पेस में जाके Pharmaceuticals मैन्युफैक्चर कर सके और उसे वापस ले आ सके अंतरिक्ष से।

प्रधानमंत्री –आपका नाम अंतरिक्ष रखा है, आपके परिवार के लोग इसमें थे पहले से?

CEO – जी सर, नहीं मेरी मम्मी ने रखा था सर।

CEO – एक लॉन्च के बाद last one month में आठ लॉन्च कॉन्ट्रैक्ट मिला।

प्रधानमंत्री – अच्छा, अच्छा।

CEO – और मोस्टली इंटरनेशनल हैं।

CEO – सर अभी तो 10 लाख फार्मर के साथ we are planned to launch this innovation.

CEO – सर ये आपके लिए ताकि एक याद बनी रहेगी।

प्रधानमंत्री – वाह।

CEO – ये ओपनिंग, जो आपने ओपन किया था प्राइवेट सेक्टर को, उससे जो private सैटेलाइट है, उससे भारत की ब्यूटी जो दिख रही है।