हवाई दल सैनिकांच्या पत्नींची कल्याणकरी संघटना, एफडब्ल्यूडब्ल्यूए च्या देशभरातील सर्व महिलांनी लोकरीच्या टोप्या विणण्याचा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ह्या टोप्या देशातील दुर्बळ, गरीब लोकांना मोफत दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत, या महिलांनी 41541 टोप्या विणल्या आहेत.
या उपक्रमाची माहिती देणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे-
"कौतुकास्पद प्रयत्न"
Commendable effort. https://t.co/niXVc9Fpiu
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2022


