पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज #NextGenGST सुधारणांचा भारतातील सार्वजनिक आरोग्य आणि पोषण परिसंस्था मजबूत करण्यातील परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केला. आवश्यक अन्नपदार्थ, स्वयंपाकाच्या आवश्यक वस्तू आणि प्रथिनेयुक्त उत्पादनांवरील कर दर कमी करून, या सुधारणा देशभरातील कुटुंबांसाठी अधिक किफायतशीर आणि आहारातील उपलब्धतेत थेट योगदान देतात.
हे उपाय आयुष्मान भारत आणि पोषण अभियान सारख्या पथदर्शी उपक्रमांना पूरक आहेत, जे प्रत्येक नागरिकासाठी समग्र कल्याण, संतुलित पोषण आणि जीवनमानाची गुणवत्ता वाढविण्याच्या सरकारच्या बांधिलकीला बळकटी देतात.
चंद्रा आर. श्रीकांत यांच्या एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना, मोदी म्हणाले:
"#NextGenGST उपाययोजना संपूर्ण भारतातील कुटुंबांसाठी आवश्यक अन्नपदार्थ, स्वयंपाकाच्या आवश्यक वस्तू आणि प्रथिनयुक्त उत्पादने अधिक परवडणारी बनवून 'स्वस्थ भारत' चा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात.
आयुष्मान भारत आणि पोषण अभियान सारख्या उपक्रमांसह, या सुधारणा प्रत्येक नागरिकासाठी चांगले आरोग्य, संतुलित पोषण आणि सुधारित जीवनमानाची आपली बांधिलकी बळकट करतात."
A big push towards health
— Chandra R. Srikanth (@chandrarsrikant) September 3, 2025
More emphasis on proteins
Carbonated drinks, tobacco, cigarettes get the axe
GST on food items, drinks, cooking items ⏬⏬
Graphics via @moneycontrolcom pic.twitter.com/nAT4dnNVpN


