+डिजिटल इंडियाच्या 11 वर्षांच्या वाटचालीच्या माध्यमातून जनतेच्या जीवनात घडलेले परिवर्तन पंतप्रधानांनी केले अधोरेखित

तंत्रज्ञानाची प्रगती आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यामध्ये बजावत असलेल्या मध्यवर्ती भूमिकेबद्दल भारताच्या युवा नवोन्मेषकर्त्यांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. गेल्या 11 वर्षात नवोन्मेषाचा वापर करण्यासाठी डिजिटल इंडियाने युवा वर्गाला सक्षम केले आहे, ज्यामुळे तंत्रज्ञानसंपन्न केंद्र असे भारताचे स्थान आणखी भक्कम झाले आहे.

गेल्या 11 वर्षांपासून तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर केल्याने भारतातील लोकांना अगणित फायदे मिळाले आहेत, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. सेवांचे वितरण आणि पारदर्शकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

एक्सवरील मायगव्हइंडियाच्या पोस्टला प्रतिसाद देताना मोदी यांनी नमूद केलेः

“भारतातील युवकांच्या बळावर, आपण नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या वापरात लक्षणीय प्रगती करत आहोत. हे बळ आपल्याला आत्मनिर्भर बनवण्याच्या आणि जागतिक तंत्रज्ञानाचे संपन्न केंद्र बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना देखील बळकटी देत आहे.
#11YearsOfDigitalIndia”

“ तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर केल्याने लोकांना अगणित फायदे मिळाले आहेत. सेवा वितरण आणि पारदर्शकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. त्याशिवाय, तंत्रज्ञान हे गरिबातील गरीब लोकांचे जीवन सक्षम करण्याचे साधन बनले आहे.
 

#11YearsOfDigitalIndia”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cotton duty relief: Textile industry welcomes import tax waiver, sees boost for exports and MSMEs

Media Coverage

Cotton duty relief: Textile industry welcomes import tax waiver, sees boost for exports and MSMEs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 मे 2026
May 31, 2026

India’s Golden Chapter: Maritime Might, Digital Revolution & Nari Shakti Under PM Modi