महापर्व छठ च्या समारोपानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, की आज सकाळी भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करून चार दिवसांच्या या महोत्सवाची सांगता झाली. ते म्हणाले की, या महोत्सवाच्या काळात, भारताच्या वैभवशाली छठ पूजेच्या परंपरेचे दिव्य वैभव दिसून आले.
या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व भाविकांना आणि त्यांच्या कुटुंबांना शुभेच्छा देऊन, छठी मातेच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांची आयुष्ये प्रकाश आणि आनंदाने भरून जावोत अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“सकाळी भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करून आज या महोत्सवाची सांगता झाली. चार दिवसांच्या या महोत्सवाच्या काळात, आपल्या वैभवशाली छठ पूजेच्या परंपरेचे दिव्य वैभव दिसून आले. सर्व व्रतधारी आणि भाविकांसह या पवित्र पर्वामध्ये सहभागी झालेल्या सर्व कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन! छठी मातेच्या असीम कृपेने तुम्हा सर्वांचे जीवन सदैव उजळलेले राहो.”
भगवान सूर्यदेव को प्रात:कालीन अर्घ्य के साथ आज महापर्व छठ का शुभ समापन हुआ। चार दिवसीय इस अनुष्ठान के दौरान छठ पूजा की हमारी भव्य परंपरा के दिव्य दर्शन हुए। समस्त व्रतियों और श्रद्धालुओं सहित पावन पर्व का हिस्सा बने अपने सभी परिवारजनों का हृदय से अभिनंदन! छठी मइया की असीम कृपा से…
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2025


