पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एनएसजी जवानांच्या अतुलनीय शौर्य आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. "दहशतवादाच्या धोक्यापासून देशाचे संरक्षण करण्यात, आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि महत्वपूर्ण राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करण्यात एनएसजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले:
"राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त, मी सर्व एनएसजी जवानांना हार्दिक शुभेच्छा देतो. या दलाने आपल्या अतुलनीय शौर्य आणि समर्पणाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दहशतवादाच्या धोक्यापासून देशाचे संरक्षण करण्यात, आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि महत्वपूर्ण राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करण्यात एनएसजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
On the occasion of National Security Guard's Raising Day, I extend my best wishes to all NSG personnel. This force has made a mark for its unmatched valour and dedication. NSG has played a vital role in safeguarding the nation from the menace of terrorism, ensuring the security… pic.twitter.com/vouIgNmd69
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2025


