पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बातमधून लॅव्हेंडरबाबत सांगणारी एक क्लिप सामायिक केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लॅव्हेंडरच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले.
"जम्मू आणि काश्मीरमध्ये लॅव्हेंडर लोकप्रिय होत असल्याचे पाहून आनंद झाला. नुकत्याच झालेल्या मन की बात #MannKiBaat कार्यक्रमादरम्यान मी हा विषय अधोरेखित केला होता. youtu.be/kkbQzipkqrA"
Good to see Lavender becoming popular in Jammu and Kashmir. I had highlighted this topic during a recent #MannKiBaat programme as well. https://t.co/V6Zs2665rp https://t.co/AjvT1nFbcO
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2023


