हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 100 वे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या चमूचे कौतुक केले.

 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदके! हा एक अतुलनीय आनंदाचा क्षण आहे. हे यश आपल्या खेळाडूंच्या अतुलनीय पराक्रम, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे फळ आहे.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे आमचे हृदय अभिमानाने भरून आले आहे. मी, आपले प्रतिभावान खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्यासोबत काम करणार्‍या संपूर्ण चमूचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो.  

ही ऐतिहासिक कामगिरी आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. या खेळाडूंची कामगिरी आपल्याला नेहमी स्मरण करून देत राहील की, आपल्या तरुणांसाठी कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Built for tomorrow's wars: How India's new turbojet engine changes the missile and drone equation

Media Coverage

Built for tomorrow's wars: How India's new turbojet engine changes the missile and drone equation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026